मी, सध्या रासायनिक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम करत आहे. मला पुढे भूदल, नौदल किंवा वायुदलामध्ये जायचे आहे. या क्षेत्रात कशा प्रकारे मुलींना संधी मिळू शकते?
– प्रणाली जोशी
कम्बाइन्ड डिफेन्स सव्र्हिस एक्झामिनेशनद्वारे तुम्हाला अपेक्षित असलेली संधी मिळू शकते. ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाते. पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांला असलेले किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेद्वारे ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडेमीमध्ये मुलींना शॉर्ट सव्र्हिस कमिशन-नॉन टेक्निकल या पदासाठी निवडले जाते.
मी डी. फार्म तसेच बी फार्मही केले आहे. मी एम.एस्सी करू शकतो का? जर असे शक्य असल्यास कोणत्या विषयात?
–श्रीकांत धोंडे
खरेतर आपण डी.फार्म आणि बी.फार्म करण्यासाठी सहासात वर्षे घालवली आहेत. त्यामुळे यापुढे एम. एस्सी करण्याचे नक्की कारण काय, ही बाब स्पष्ट होणे आवश्यक ठरते. तुम्हाला पुढे शिकायचेच असेल तर एम.फार्म आणि त्यानंतर तुझ्या आवडीच्या विषयात पी. एचडी करणे श्रेयस्कर ठरेल. त्यातून तुम्हाला औषधीनिर्माण शास्त्रात उत्तम करिअर घडवता येऊ शकते. तसेच एमबीए इन फार्मा हा अभ्यासक्रम केल्यास औषधीनिर्माण कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदांवर संधी मिळू शकते.
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.