मला गणित विषय घेऊन बी. एसस्सी  करायची इच्छा आहे. पण त्यानंतर करिअर म्हणून महाविद्यालयात प्राध्यापक होणे, इतकाच पर्याय आहे का? दुसरे पर्याय कोणते? त्यासाठी काय करावे लागेल?

हेमंत सोनवणे

गणित विषयात अभ्यास करणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषयात करिअरच्या विविध संधीही आहेत. इंडियन इकॉनॉमिक सव्‍‌र्हिस/ इंडियन स्टॅटिस्टकल सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन देऊन भारत सरकारच्या अर्थ विभागात उच्च पदांवर जाऊ  शकतोस. बिग डेटा अ‍ॅनालिटिक्ससारख्या सध्या अधिकाधिक मागणी असलेल्या विषयांमध्ये स्पेशलाझेशन करू शकतोस. परदेशात जाऊन स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथेमॅटिक्समध्ये संशोधन वा एम. एस करू शकतोस. मोठय़ा कंपन्या व कॉर्पोरेट्सना विविध सांख्यिकी विश्लेषणासाठी उत्तम गणितज्ज्ञांची गरज भासत असते. तिथेही तुला काम करता येईल.

करिअरसंबंधीचे प्रश्न पाठवा career.vruttant@expressindia.com 

Story img Loader