मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली आहे. माझा विषय इतिहास आहे. पण मला आता अर्थशास्त्रात एमए आणि डीलिट करायचे आहे. बहि:शाल विद्यार्थी म्हणून मी ते करू शकतो का? कोणत्या विद्यापीठातून करू?
– समीर लोहकरे
समीर, तू कोणत्याही अधिकृत मुक्त विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. करू शकतोस. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून या विषयात पीएचडीसुद्धा करू शकतोस.
अर्हता – संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी तुला https://onlineadmission.ignou.ac.in/entrancersunit या संकेतस्थळावरून ऑनलाइन चाळणी परीक्षा द्यावी लागेल.
संपर्क – स्कूल ऑफ सोशल सायन्स, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, मैदान घारी, नवी दिल्ली- ११००६८,
दूरध्वनी- ०११-२९५३ ४३३६,
संकेतस्थळ- http://www.ignou.ac.in/
मध्य प्रदेश राज्यातील भोज मुक्त विद्यापीठाने डी.लिट अभ्यासक्रम सुरू केला आहे.
अर्हता- संबंधित विषयातील पी.एचडी. आवश्यक. शिवाय १० दर्जेदार संशोधन पत्रिकांमध्ये उच्च दर्जाचे संशोधनपर लेख/ निबंध प्रसिद्ध झालेले असावेत किंवा उच्च श्रेणीचे संबंधित विषयातील संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित झालेले असावेत.
संपर्क – http://www.bhojvirtualuniversity.com
रोजगारक्षम अशा संगणक अभ्यासक्रमाची माहिती द्याल का?
– अजित देवकर
संगणकाशी संबंधित अनेक छोटे-मोठे
अभ्यासक्रम सध्या अनेक संस्थांमार्फत सुरू करण्यात आले आहेत. मात्र हे अभ्यासक्रम केल्यावर रोजगार मिळेलच याची शाश्वती
देता येत नाही. तथापि सीडॅकने (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग) सुरू केलेले पुढील अभ्यासक्रम हे रोजगार मिळवून देऊ शकतात. मात्र हे अभ्यासक्रम काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रम-
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मोबाइल कॉम्प्युटिंग
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आयटी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम अँड सिक्युरिटी
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जिओइनर्फमेटिक्स
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन एम्बेडेड सिस्टीम डिझाइन
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सॉफ्टेअर डेव्हलपमेंट
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्ज
- पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिग डेटा अनॅलिटिक्स.
संपर्क- सी-डॅक, इनोव्हेशन पार्क,
पंचवटी, पाषाण, पुणे- ४११००८,
दूरध्वनी- ०२०-२५५०३१००,
संकेतस्थळ- https://cdac.in
तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर पाठवा.)