* मी सध्या बी.एस्सीच्या दुसऱ्या वर्गाला आहे. भौतिकशास्त्र या विषयात पुढे काय संधी आहेत?
– अजिंक्य कोलंबिकर
भौतिकशास्त्र या विषयात पदवी /पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना सॅटेलाइट इंजिनीअर, साऊंड इंजिनीअर, सोलर एनर्जी फिजिसिस्ट, टनेल इंजिनीअर, लेसर फ्युजन सायंटिस्ट, ग्रॅव्हिटी रिसर्चर, कोस्टल सायंटिस्ट, सोलर एनर्जी फिजिसिस्ट, क्लिनिकल सायंटिस्ट, कॉम्प्युटर गेम डिझायनर, वेदर फोरकास्टर, एरोस्पेस, ऊर्जा, तेल आणि वायू संशोधन, अंतराळ विज्ञान, टेलिकम्युनिकेशन, मेटॅलर्जिस्ट, रेडिएशन प्रोटेक्शन प्रॅक्टिशनर, जिओफिजिस्ट, फिल्ड सेस्मॉलॉजिस्ट, सेस्मिक इंटरप्रीटर अशा संधी मिळू शकतात. अॅस्ट्रोफिजिक्स, क्वांटम फिजिक्स, पार्टिकल फिजिक्स, मॅथेमॅटिकल फिजिक्स, थर्मोडायनामिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी अशा विषयांत स्पेशलायझेशन केल्यास उच्च श्रेणीचे करिअर घडवता येणे शक्य आहे.
* माझे एम.एस्सी. (जैवतंत्रज्ञान) गोंडवाना विद्यापीठातून झाले आहे. मला कुठे आणि कशा प्रकारची नोकरी मिळू शकेल? नागपूरमध्ये कोणत्या कंपन्यांमध्ये प्रयत्न करू शकतो?
– सूरज कुंचमवार
नक्कीच या विषयात अनेक संधी आहेत. सीनिअर पेटंट अनॅलिस्ट, रिसर्च ऑफिसर, रिसर्च असोशिएट, असोशिएट प्रोजेक्ट मॅनेजमेंट, न्यूट्रिजेनोमिक्स एक्सपर्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, लॅब रिसर्च असिस्टंट, अॅग्रिगेट रिपोर्टिग प्रोफेशनल, मॅनेजर क्वालिटी कंट्रोल, प्रॉडक्शन असिस्टंट, एरिआ अँड रिजनल मॅनेजर, अॅप्लिकेशन स्पेश्ॉलिस्ट, फाम्र्युलेशन डेव्हलपमेंट सायंटिस्ट, पब्लिकेशन क्वालिटी स्पेश्ॉलिस्ट आदी संधी तुम्हाला मिळू शकतात. पुढील काही कंपन्या या जैवतंत्रज्ञान विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांना करिअर संधी देत असतात – युनायटेड हेल्थ ग्रुप नॉयडा, मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल्स मुंबई, टेक्स बायोसायन्सेस चेन्नई, बायोजिऑनॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड ठाणे, इंव्हेस्को हैदराबाद, फोर्टिस हेल्थकेअर वाशी, मुंबई, इगल ग्रुप हडपसर पुणे, कॅक्टस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड, जनरेशन नेक्स्ट रायगड, सिस्टम इंडिया पुणे, भारत सेरम अँड व्हॅकसिन्स लिमिटेड, इव्हेंटुरुस नॉलेज सोल्यूशन, नवी मुंबई, जेब्स हेल्थकेअर सोल्यूशन्स नवी मुंबई, आयडिया इंटरनॅशनल दिल्ली एनसीआर, सेलेरिस जेनोमिक्स हैदराबाद, भट बायोटेकड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद, सिस्टम इंडिया पुणे, नागपूर, टीसीएस-बीपीएस मुंबई, एसआरएल डायग्नोस्टिक मुंबई, जेनकॉर्प मुंबई, रिजनरेटिव्ह मेडिकल सव्र्हिसेस मुंबई, रिसर्चवायर नॉलेज सोल्यूशन्स नवी मुंबई, अॅसपिरा पॅथलॅब मुंबई. या कंपन्यांमधील पदांची माहिती नोकरी देणाऱ्या विविध संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येते. कृपया त्याकडे लक्ष ठेवावे.
* माझे बी.कॉम. पूर्ण झाले आहे. यापुढे मी वाणिज्य शाखेत कोणते अभ्यासक्रम करू? पदविका करू शकतो का?
– सिद्धांत खंदारे
तुमच्यासाठी पुढील पर्याय असू शकतील.
(१) एम.कॉम. हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
(२) कंपनी सेक्रेटरीशिपचा तीन वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम. संपर्क- http://www.icsi.edu/ या संकेतस्थळावरील Student/CSIntegratedCourse.aspx पुढील लिंकवर माहिती मिळेल.
(३) चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यासक्रम.
संपर्क- http://www.icai.org
(४) एमबीए फायनान्स केल्यास तुझ्या आतापर्यंतच्या अभ्यासक्रमाचा लाभ त्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी होऊ शकतो.
(५) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज एज्युकेशन लिमिटेड या संस्थेने सुरू केलेले पुढील लघु आणि दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम वाणिज्य या ज्ञानशाखेची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी फायदेशीर ठरु शकतात. अभ्यासक्रम- पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बँकिंग अँड फायनांस, पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन बिझनेस जर्नालिझम, ग्लोबल फायनान्शिअल मार्केट्स प्रोग्रॅम, मास्टर्स इन ग्लोबल फायनान्शिअल मार्केट्स प्रोग्रॅम, मास्टर्स इन फायनान्शिअल टेक्नॉलॉजी, बेसिक कोर्स इन स्टॉक मार्केट, अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम इन स्टॉक मार्केट, फायनान्शिअल स्टेटमेंट अनॅलिसिस, हाऊ टू रिड म्युच्युअल फंड फॅक्टशिट, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कॅपिटल मार्केट, सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन कमोडिटी अँड करन्सी मार्केट्स, मास्टर ऑफ फायनान्स, मास्टर ऑफ अप्लाइड फायनान्स इत्यादी. संपर्क- http://www.bsebti.com
(६) द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अकाऊंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केलेला अभ्यासक्रम कॉस्ट मॅनेजमेंट अकाऊंटिंग हा अभ्यासक्रम करायला हरकत नाही. संपर्क- http://icmai.in/