प्रा. सुचित्रा राजगुरू
फॅशन डिझायनिंग म्हणजे काय, त्या अभ्यासक्रमांबद्दलची माहिती आपण कालच्या लेखात वाचली. कपडय़ांच्या पलीकडे यामध्ये काय करिअर आहे, याची माहिती आज घेऊ या.
फॅशन डिझायनिंगच्या अंतिम टप्प्यात किंवा अंतिम वर्षांला आल्यावर आपल्याला नेमका कशामध्ये रस आहे, हे लक्षात येते. म्हणूनच हे शिक्षण सुरू असताना तुम्ही आवडीच्या विषयातील एखादा डिप्लोमाही करू शकता. त्यामुळे महाविद्यालयातून बाहेर पडताना तुमच्याकडे एकाच वेळी दोन पदव्या हातात असतात.
शिवण (स्टिचिंग) – शिवणाचा पदविका अभ्यासक्रम हाही फॅशन डिझायनिंगचाच एक भाग आहे. एखादा कपडा तयार झाल्यानंतर त्याच्या बाजूला जी शिलाई असते. त्याचा अभ्यास यात होतो. पुरुष, स्त्रिया, लहान मुले, पारंपरिक कपडे, पाश्चिमात्य कपडे, अंतर्वस्त्रे, समुद्रावर घालायचे पोशाख अशा विविध प्रकारांप्रमाणे त्यांची शिलाई बदलत जाते. यातल्या प्रत्येक प्रकारामध्ये उच्चशिक्षण घेता येते.
इलेस्ट्रेशन – कोणतीही डिझाइन ही आधी कागदावर साकारली जाते. मग ती स्टिचिंग आणि ड्राफ्टिंगच्या माणसाकडे जाते. अनेकदा कागदावर साकारलेले डिझाइन प्रत्यक्षात कपडय़ावर तेवढेच चांगले दिसेल असे नाही. त्यामुळे इलेस्ट्रेटर आणि ड्राफ्टिंग यांचे काम खूप महत्त्वाचे आहे. पण ज्यांना स्टिचिंगची आवड आहे त्यांना इलेस्ट्रेट करायला आवडेलच असे नाही. तेव्हा ज्यांना इलेस्ट्रेशन आवडते त्यांनी आणि स्टिचिंगची आवड असलेल्यांनी एकत्र येऊन काही व्यवसायही सुरू करता येईल. काही वेळा मोठय़ा डिझायनर्सकडे इल्युस्ट्रेटर नोकरीला असतात. सुरुवातीला तुम्हाला अशा प्रकारच्या संधीही मिळतील.
र्मचडायझिंग – हेही एक संपूर्णपणे वेगळे करिअर आहे. डिझाइन बनवल्यावर डिझायनर त्यासाठी नेमके काय काय सामान लागेल, याची यादी र्मचडायझरकडे देतात. एखाद्या लहानशा बटणापासून विशिष्ट प्रकारच्या कापडापर्यंत सगळ्या गोष्टी आणून द्यायचे काम र्मचडायझरचे असते. ही एक व्यक्ती असू शकते किंवा अनेक. कपडय़ांचा कच्चा माल आणण्यापासून ते कपडे तयार झाल्यावर इस्त्री, पॅकिंग, शिपिंग इथपर्यंत कामे र्मचडायझर करतो.
व्हिज्युअल र्मचडायझिंग – मोठमोठय़ा कपडय़ांच्या ब्रँडेड दुकानांमध्ये बाहेरच्या दर्शनीय भागात काही पुतळ्यांना कपडे लावून ठेवलेले असतात. ते कोणते आणि कसे लावावेत हे काम व्हिज्युअल र्मचडायझरचे असते. यातील बहुतांश ब्रँडचा विंडो डिस्प्ले त्यांच्या देशभरातील दुकानांमध्ये सारखाच असतो. तो कसा असावा, हे ठरवण्यासाठी एक खास तज्ज्ञ व्यक्ती असते. ग्राहकांना दुकानामध्ये आकर्षित करण्यासाठी या कपडय़ांची रचना केली जाते. त्यात फारशी गर्दी न करता मोजकेच परंतु आकर्षक कपडे मांडले जातात. हासुद्धा फॅशन डिझायनिंगचाच एक भाग आहे. याशिवाय दुकानांमध्ये पुतळ्यावर आकर्षक पद्धतीने दागिने घातलेले असतात. ते पाहून आपल्याला वाटते की, अमुक तो दागिना मलाही छान दिसेल. हीच व्हिज्युअल र्मचडायझिंगची किमया असते.
टेक्स्टाइल – फॅशन डिझायनिंग म्हणजे फक्त कपडे बनवणे नाही. यात टेक्स्टाइलही येते. डिझायनर तयार कपडय़ावर आपले डिझाइन करून कपडे बनवतात. पण टेक्स्टाइलमध्ये डिझाइनच्या अनुषंगाने कापड बनते. टेक्स्टाइल डिझायनर ते मूळ कापड बनवतात. याचा एक वेगळा कोर्स असतो. यात टेक्स्टाइल इंजिनीअरही येतात. त्यांना बी.डी. फार्म ही डिग्री घ्यावी लागते. टेक्स्टाइल डिझायनर फॅशन डिझायनर बनू शकतो, पण फॅशन डिझायनर कधीही टेक्स्टाइल डिझायनर बनू शकत नाही. कारण या दोन्ही फार वेगळ्या गोष्टी आहेत.