ग्वाल्हेर येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझम विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
’ बीबीए (ऑनर्स) टुरिझम : अर्जदारांनी १०+२ अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गट- ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.
’ एमबीए टुरिझम: अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी अभ्यासक्रम किमान ५० टक्के गुणांसह (राखीव गट- ४५ टक्के) उत्तीर्ण केलेली असावी.
वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी सीएटी, एमएटी, सीएमएटी, जीएमएटी, एटीएमए वा एक्सएटी यांसारखी प्रवेश पात्रता परीक्षाही दिलेली असावी.
अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क : प्रवेश अर्जासोबत शुल्क म्हणून खुल्या गटातील अर्जदारांनी प्रवेश अर्जासह १,००० रुपयांचा (राखीव गटातील उमेदवारांनी ५०० रु.) डायरेक्टर-आयआयटीटीएम यांच्या नावे असणारा व ग्वाल्हेर येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : संस्थेच्या www.iittm.nat या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत : अर्ज कागदपत्रे व डिमांड ड्राफ्टसह डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, गोविंदपुरी, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश- ४७४०११ या पत्त्यावर १० जून २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा