मी बारावीची परीक्षा दिली आहे. मला र्मचट नेव्हीमध्ये करिअर करायचे आहे. मार्गदर्शन करावे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

-धीरज वाघ

धीरज, र्मचट नेव्हीमध्ये करिअर हे बी.टेक इन मरिन इंजिनीअरिंग किंवा बी.एस्सी इन नॉटिकल सायन्स हे अभ्यासक्रम केल्यावर करता येऊ  शकतात. मात्र त्यासाठी १२वी मध्ये विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,  गणित हे विषय घेणे आवश्यक आहे. इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटीमार्फत या दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कॉमन एंट्रंस टेस्ट घेतली जाते. त्याद्वारे या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये व मान्यताप्राप्त खासगी संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो.

संपर्क संकेतस्थळ-  http://www.imu.edu.in/

मी बी. कॉम. आणि सीए केले आहे. गेली ४ र्वष बँकिंग क्षेत्रात काम करतो आहे. माझ्यामध्ये उद्योजकीय गुण विकसित होतील असे आणि वित्त विषयात अधिक उच्च दर्जाचे पुढील शिक्षण घ्यायचे आहे. पण सीएफए, सीपीए हे अभ्यासक्रम सोडून. मला एमबीए करण्यासाठी आघाडीच्या संस्थांची नावे सुचवाल का? एमबीए फायनान्सला दुसरा काही पर्याय आहे का? की मास्टर ऑफ फायनान्स करावे?

-अक्षय तिगाडे

अक्षय, जमनालाल बजाज इन्सिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेतील एम.एस्सी इन फायनान्स हा अभ्यासक्रम वित्तीय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी उपयुक्त समजला जातो. एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटमधील एमबीए फायनान्स हा अभ्यासक्रम उच्च दर्जाचा समजला जातो. इंडियन इन्स्टियूट ऑफ मॅनेजमेंटच्या अहमदाबाद, बेंगळुरू आणि कोलकता कॅम्पसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटला प्रवेश मिळाल्यावर फायनान्स हे स्पेशलायझेशन निवडावे. याद्वारे तुला अपेक्षित असणारे करिअर घडवता येणे शक्य आहे.

मी बीएच्या अंतिम वर्षांला आहे. माझे विषय इतिहास आणि इंग्रजी आहेत. पण मला आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र आणि संबंध या विषयात एमए करायचे आहे. मी ते करू शकतो का? मी अनुसूचित जमाती या संवर्गात येतो. मला काही शिष्यवृत्ती मिळतील का?

-विपुल मरस्कोले

विपुल, आपल्याकडे साधारणत: ज्या विषयांमध्ये पदवी घेतली असेल त्यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो. मात्र अधिकृत मुक्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम मात्र कोणत्याही विषयातील पदवीधराला करता येतात. सिम्बॉयसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज या संस्थेने एम.ए इन इंटरनॅशनल स्टडीज हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही विषयातील पदवीधरास करता येतो. संपर्क  http://www.ssispune.edu.in