* मी मराठी विषय घेऊन बी.ए झालो आहे. मी मराठी आणि इंग्रजी टंकलेखनही केले आहे. मला कोणती तरी नोकरी सुचवा. मला त्याची गरज आहे. मला कोणताही अनुभव नाही. मी काय करू?
– निखिल लोखंडे
निखिल, तू इंग्रजी आणि मराठी टंकलेखनात अधिकाधिक सराव करून त्यात तज्ज्ञता मिळवायचा प्रयत्न करावास. अनेक खासगी आस्थापनांना चांगल्या टंकलेखकाची गरज भासते. अशा आस्थापनांमध्ये जाऊन स्वत:च्या टंकलेखनाच्या तज्ज्ञतेबाबत लेखी वा तोंडी कल्पना द्यावी. शक्य झाल्यास प्रत्यक्ष टायपिंग करून दाखवावे. तुझ्या टंकलेखनाच्या कौशल्याने संबंधित आस्थापनामधील प्रमुख प्रभावित झाल्यास तुला लगेच नोकरी मिळू शकते.
प्रारंभी मनाजोगते वेतन मिळणार नाही. पण अनुभवासाठी अशी नोकरी करणे श्रेयस्कर ठरेल. राज्य लोकसेवा आयोगामार्फत साहाय्यक वा लिपिक संवर्गीय पदभरतीसाठी परीक्षा दिली जाते.
ही परीक्षा तू देऊ शकतोस. दरम्यान तू शॉर्ट हँड म्हणजे लघुटंकलेखन शिकून घेऊन त्यात कौशल्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. लघुलेखकांची खासगी व शासकीय क्षेत्रातील पदे सातत्याने भरली जातात.
* मी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. माझे शिक्षण बी.एस्सी नर्सिग आहे. मला विभागीय चौकशीबद्दल माहिती सांगावी. तसेच मला नर्सिग टय़ूटरबद्दलही माहिती द्याल का?
– स्नेहल बनसोडे
स्नेहल, आपल्या विभागातील विभागीय परीक्षेबाबत नेमकी माहिती विभागाच्या आस्थापनेमधूनच कळू शकेल. काही विभागीय परीक्षांची माहिती राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावरही दिली जाते. तसेच राज्य शासनाच्या ेंँं१ं२ँ३१ं.ॠ५.्रल्ल या संकेतस्थळावरही याची माहिती ठेवण्यात येते. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही संकेतस्थळावरील माहितीकडे लक्ष ठेवावे लागेल. नर्सिंग टय़ुटरबद्दल विस्तृत माहिती
१) /www.naukri.com/nursing-tutor-jobs
(२) http://www.careesma.in/jobs?q=bsc+nursing+tutor+maharashtra
(३) https://www.shine.com/job-search/nursing-tutor-jobs
(४) https://jobs. trovit.co.in/nursing-tutor-jobs
या संकेतस्थळांवर मिळू शकेल.