तुमच्याकडे प्रभावी आवाज असेल तर संधीचे आणखी एक दार तुमच्यासाठी खुले होऊ शकते. ते म्हणजे सूत्रसंचालन, निवेदन. सुप्रसिद्ध सूत्रसंचालक मंगला खाडिलकर एका लेखात म्हणाल्या होत्या, निवेदक म्हणजे गजऱ्यातल्या दोऱ्यासारखा असायला हवा. त्याने फुलेही उत्तम गुंफायला हवीत शिवाय दोर दिसताही कामा नये. कोणत्याही कार्यक्रमात निवेदक आणि सूत्रसंचालक या दोन्हींचे महत्त्व मोठे असते. हल्ली अनेक कार्यक्रमांत या दोन्ही भूमिका एकच व्यक्ती पार पाडताना दिसते. कार्यक्रम नेमका काय आहे, त्यात कोणकोण आलेले आहे, वक्ते कोण, मान्यवर कोण, हेतू काय या साऱ्याबद्दल प्रेक्षकांना वा श्रोत्यांना माहिती करून देण्याचे काम सूत्रसंचालक वा निवेदक करतो. पण हे नुसतेच कोरडे बोलणे असून चालत नाही, तर त्यामुळे रसिक खिळून राहिले पाहिजेत.

अनेक विषयांचे ज्ञान, ओघवती वाणी, बोलण्यातील चातुर्य या गोष्टी निवेदकाकडे असायला हव्यात. हे गुण असतील तर निवेदनासोबतच दूरदर्शन किंवा अन्य खासगी वाहिन्यांवरील विशेष कार्यक्रमांतूनही निवेदनाची संधी मिळू शकते. अर्थात त्यासाठी संपूर्णत: वेगळी तयारी करावी लागते. यासोबतच या क्षेत्रातल्या अनुभवामुळे तुम्ही मुलाखतकार म्हणूनही आपले करिअर घडवू शकता.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

या क्षेत्रातील प्रवेशासाठी विशिष्ट शिक्षणाची अट नाही. परंतु पदवीधर असल्यास त्याचा अनेक स्तरांवर फायदा होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे निवेदकाचे किंवा सूत्रसंचालकाचे वाचन चौफेर असायला हवे. ज्यातून त्याला अधिकाधिक ज्ञान मिळेल, ज्याचा व्यासपीठावर उपयोग होऊ शकेल. स्पष्ट उच्चार, अचूक आणि प्रभावी शब्दफेक, वाक्चातुर्य, संवाद कौशल्य, उत्साही आणि खेळकर वृत्ती असणे गरजेचे आहे. सोबतच निवेदकाला जनसंपर्काची आवड असायला हवी. आपण जो कार्यक्रम करणार आहोत, त्याबद्दल ज्ञान, तांत्रिक माहिती असणे किंवा ती मिळवणे महत्त्वाचे असते.

सूत्रसंचालन किंवा निवेदनासाठी कोणतेही खास वेगळे अभ्यासक्रम चालवले जात नाहीत. परंतु अनेक वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सूत्रसंचालन किंवा निवेदनाचा समावेश केलेला असतो. उदा. पत्रकारिता, मास मीडिया, व्हॉइस कल्चर या विषयीचे अभ्यासक्रम. या क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवरही याबद्दल वेगवेगळ्या कार्यशाळा घतात. त्याचाही इच्छुकांना निश्चित फायदा होऊ शकतो.

Story img Loader