हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या हजारो वाटा उपलब्ध आहेत. तुमच्याकडे जे कौशल्य आहे, त्याचा कल्पक वापर केलात तर नोकरी आणि संधी दोन्हीची कमी नाही. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या शहरांतून हल्ली एफएमचे प्रस्थ आणि प्रसार वाढला आहे. या एफएम वाहिन्यांवर लागणाऱ्या गाण्यांसोबतच आपले लक्ष (खरे तर कान) वेधून घेतात ते आरजे अर्थात रेडिओ जॉकी. तुमच्याकडे उत्तम आवाज, संवादकौशल्य आणि उत्स्फूर्तता असेल तर हे क्षेत्र तुमचेच समजा.
रेडिओ वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करताना रेडियो जॉकीजना विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. कारण अंतिम ध्येय हे तो कार्यक्रम यशस्वी करण्याचे असते. या करिअर क्षेत्रात शिक्षणाची विशिष्ट अट नाही; परंतु कोणत्याही शाखेतली पदवी असणे, महत्त्वाचे ठरते.
इथे यशस्वी होण्यासाठी रीतसर प्रशिक्षण गरजेचे आहे. सोबतच स्पष्ट आणि शुद्ध शब्दोच्चारण, पुरेसा मोठा, मोकळा पण श्रवणीय आवाज, आपल्या आवाजावर आणि भाषेवर विशेषत बोलीभाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचे म्हणजे रेडिओ जॉकीला अवतीभोवतीच्या घटनांचे, चालू घडामोडींचे ज्ञान आणि भान असायला हवे. प्रसंगाला साजेसे भाष्य करण्यासाठी बरीच माहिती हवी तसेच बोलण्यात उत्स्फूर्तता, समयसूचकता असणे आवश्यक आहे. आरजेना थेट लोकांशीच संपर्क साधायचा असतो. नाते जोडायचे असते. त्यासाठी जनसंपर्काची आवड हवी. त्यांच्या डोक्यात सतत नवनव्या कल्पना यायला हव्यात. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञान. रेडिओ वाहिन्यांवर वापरले जाणारे तंत्रज्ञान, साधनांची तांत्रिक माहिती, त्याचा उपयोग, संगीताची आवड आणि त्यातील माहिती, बहुविध कार्यकुशलता अर्थात एकाच वेळी अनेक कामे अथवा जबाबदाऱ्या पेलण्याची तयारी असायला हवी. आरजेना दिवसाच्या कोणत्याही वेळी काम करावे लागू शकते.
याशिवायही अनेक संस्था या विषयाचे प्रशिक्षण देतात. त्याची माहिती इंटरनेटवर मिळेलच; परंतु कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याआधी त्या संस्थेचे प्रत्यक्ष कामकाज, तेथील माजी विद्यार्थ्यांचा अनुभव पाहून मगच प्रवेश घ्यावा.
यासंबंधीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही संस्था
स्कूल ऑफ ब्रॉडकािस्टग आणि कम्युनिकेशन, अंधेरी, मुंबई. http://www.sbc.ac.in (सर्टििफकेट कोर्स इन रेडिओ जॉकी, व्हॉइसिंग)
झेवियर्स इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेशन, मुंबई. www.xaviercomm.org (सर्टििफकेट कोर्स इन रेडिओ जॉकी)