सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट, चेन्नई
तामिळनाडू राज्यातील चेन्नईस्थित असलेली सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएलआरआय) म्हणजेच केंद्रीय चर्म संशोधन संस्था ही चर्मशास्त्र या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना २४ एप्रिल १९४८ साली झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या सेवेमध्ये असणाऱ्या या संस्थेने चर्मशास्त्रातील तंत्रज्ञानाची निर्मिती आणि त्या तंत्रज्ञानाचा तळागाळाच्या घटकांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे सीएलआरआय हीदेखील एक सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.
* संशोधन संस्थेविषयी –
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये संशोधन विकास व औद्योगिकीकरणाच्या मर्यादांमुळे निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंपेक्षा आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंचीच संख्या अधिक असे. मात्र, त्यावेळीही भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये कच्च्या चामडय़ाचा समावेश होता. भारताच्या त्यावेळच्या एकूण आर्थिक परिस्थितीनुसार चर्मोद्योग हा निर्यातीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून देशाच्या आर्थिक विकासाला जसा हातभार लावत होता तसाच तो देशांतर्गत रोजगारनिर्मितीचा एक महत्त्वाचा स्रोतही होता. अर्थातच तेव्हा कोणत्या गोष्टीची कमी असेल तर ती या क्षेत्रातील उपलब्ध असलेले व येणारे नवीन तंत्रज्ञान. ही कमतरता केंद्रीय चर्म संशोधन संस्थेने (सीएलआरआय) भरून काढली. चर्म उद्योगाच्या सर्व पैलूंना पडताळून पाहून संशोधनाच्या माध्यमातून चर्मोद्योग क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाची निर्मिती करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे विविध पैलू आत्मसात करणे आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी संशोधन राबवणे या उद्दिष्टांनी सीएलआरआयची स्थापना करण्यात आली. सध्या सीएलआरआयची अहमदाबाद, जालंधर, कानपूर व कोलकाता येथे विभागीय केंद्रे आहेत.
* संशोधनातील योगदान –
सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीएलआरआय) ही संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे. चर्मशास्त्र या विषयातील शोधनिबंध प्रकाशित करणारी व त्या क्षेत्रातील पेटंट्स मिळवणारी जगातली सर्वात मोठी चर्म संशोधन संस्था म्हणून सीएलआरआय नावाजली गेलेली आहे. गेली कित्येक वर्षे सीएलआरआय चर्म संशोधनामध्ये अभिनव प्रयोग करत आहे. त्यामध्ये मग नवीन चामडय़ाला दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या पद्धती निर्माण करणे, चामडय़ाला रंगवण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करणे, चामडय़ाच्या टॅनिंग व फिनिशिंग तंत्राचा विकास, चामडय़ामुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाचे नियंत्रण व वस्त्रोद्योगांचे डिझाइन आणि विकास यांच्याशी निगडित संरचनेच्या पद्धती यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. चर्म क्षेत्रांमधील संशोधनाव्यतिरिक्त सीएलआरआय या क्षेत्रातील एक अनुभवी सल्लागार संस्था म्हणूनही नावारूपास आलेली आहे. त्यामुळेच चर्मोद्योगाशी संबंधित विविध बाबींमध्ये जसे की डिझाइन विकास, नमुना तयार करणे आणि फॅब्रिकेशन, व्यवहार्य व्यवसाय अहवाल तयार करणे, गुणवत्ता नियंत्रण आणि इतर विविध उपक्रमांमधील प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादींद्वारे सीएलआरआयकडून तांत्रिक साहाय्य पुरवले जाते.
सीएलआरआय ही चर्मशास्त्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मात्र या संस्थेने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, माहितीशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) सातत्याने केलेले आहे. आजघडीलासुद्धा संस्थेमध्ये लेदर प्रोसेसिंग, ‘शू अँड प्रॉडक्ट डिझाईन सेंटर’, ‘सेंटर फॉर अनालिसिस, टेस्टिंग, इव्हॅल्युएशन अँड रिपोर्टिग सव्र्हिसेस’ हे चर्मशास्त्रामध्ये संशोधन करणारे महत्त्वाचे विभाग, तसेच पॉलिमर सायन्स अँड टेक्नॉलॉजी व इनऑर्गनिक अँड फिजिकल केमिस्ट्री हे रसायनशास्त्राचे विभाग तर बायोकेमिस्ट्री अँड बायोटेक्नॉलॉजी व बायोलॉजिकल मटेरियल्स लॅबोरेटरी हे जीवशास्त्रातील विभाग आणि अभियांत्रिकी शाखांमधील संशोधन समन्वयाने चाललेले असते. या सर्व विभागांच्या साहाय्याने संस्थेने चर्मोद्योगातील देश-विदेशातील अनेक प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. सीएलआरआय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक आघाडीच्या संस्थांशी जसे की UNIDO; FAO; UNDP; TNO (The Netherlands); the British Leather Confederation (BLC), UK; CTC, France; CESECA, Italy; IRDLAI, Indonesia; SATRA, UK and IDRC, Canada, CSID, Australia, University of Amsterdam इत्यादी संस्थांशी विविध करारांच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे. सीएलआरआयमधील अनेक नामवंत शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांनी सुदान, नायजेरिया, इराण, श्रीलंका, बांग्लादेश आणि इथिओपियासारख्या इतर विकसनशील देशांमध्ये आपल्या ज्ञान व कौशल्याच्या बळावर स्थानिक लेदर उद्योगांना स्थिरस्थावर होण्यास मोलाची मदत व मार्गदर्शन केलेले आहे. या संस्थेने नायजेरिया आणि इराण या दोन्ही देशांतील लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूटची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
* विद्यार्थ्यांसाठी संशोधनातील विविध संधी –
सीएलआरआयने विद्यार्थ्यांसाठी पदवी, पदविका, पदव्युत्तर व पीएचडी या प्रत्येक स्तरावर स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यामध्ये मग लेदर टेक्नॉलॉजीमधील बी.टेक.,एम. टेक. व पीएचडी, फूटवेअर सायन्सेसमधील एम. टेक. व पीएचडी, एम.एस.(रिसर्च) इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार सीएलआरआयमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी अनेक अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.
संपर्क –
सेन्ट्रल लेदर रिसर्च इन्स्टिटय़ूट, अडय़ार, चेन्नई, तामिळनाडू -६०००२०.
दूरध्वनी ०४४ -२४९१०८९७/२४९१०८४६ .
ईमेल director@clri.res.in, directorclri@gmail.com
संकेतस्थळ – http://www.clri.org/
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com