सेन्ट्रल मेकॅनिकल इंजिनीअिरग रिसर्च इन्स्टिटय़ूट, दुर्गापूर

पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूर हे शहर आकाराने छोटे आहे. मात्र इथे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी (एनआयटी) आणि राष्ट्रीय वीज प्रशिक्षण संस्था (एनपीटीआय) यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील संस्था असल्यामुळे शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात या शहराची वेगळी ओळख आणि दबदबा आहे. सेन्ट्रल मेकॅनिकल इंजिनीअिरग रिसर्च इन्स्टिटय़ूट ही मेकॅनिकल इंजिनीअिरगमध्ये संशोधन करणारी भारतातील राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संशोधन संस्था आहे.

Auction of Walmik Karad flat averted in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवमधील वाल्मिक कराडच्या फ्लॅटचा लिलाव तूर्तास टळला; वाल्मिकचे दोन फ्लॅट असल्याचं झालं होतं उघड
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ISKCON temple kharghar history
नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन… इस्कॉनचा इतिहास काय? ही संस्था कशी चालविली जाते?
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
boom in the office space market in Pune
उद्योगांमध्ये पुण्याचे पाऊल पडते पुढे…!
Salary of hourly professors at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University is overdue
नागपूर विद्यापीठाच्या तिजोरीत ठणठणाट? तासिका प्राध्यापकांचे वेतन थकले
Job Opportunity Recruitment at State Bank
नोकरीची संधी: स्टेट बँकेत भरती
HMPV, Thane Municipal Corporation, Special room,
‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका सतर्क, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार

संस्थेविषयी –

सेन्ट्रल मेकॅनिकल इंजिनीअिरग रिसर्च इन्स्टिटय़ूट या संशोधन संस्थेला सीएसआयआर-सीएम आरआय दुर्गापुर या नावानेही ओळखले जाते. संस्थेची स्थापना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) मान्यतेनुसार फेब्रुवारी १९५८ मध्ये झाली. राष्ट्रीय स्तरावर यांत्रिक अभियांत्रिकीमधील दर्जात्मक व गुणात्मकदृष्टय़ा सरस असलेले संशोधन व तंत्रज्ञानाची निर्मिती व्हावी आणि तत्कालीन भारतीय उद्योगांना या तंत्रज्ञानाची मदत व्हावी या हेतूंनी या संशोधन संस्थेची स्थापना केली गेली. सीएमईआरआयचे दुर्गापूरमध्येच मुख्य केंद्र असून त्यापैकी एक कार्यालयीन परिसर आणि तीन निवासी परिसर आहेत. संस्थेचे एकच विस्तार केंद्र असून तेसुद्धा पश्चिम बंगालमधील औद्योगिक शहर असलेल्या बरदवान जिल्ह्य़ात स्थित आहे. ऑफिस कॅम्पस हा सुमारे ८१ एकर जागेमध्ये पसरलेला असून यामध्ये एकूण सोळा इमारती आहेत. दुर्गापूर रेल्वे स्टेशनपासून आणि सिटी सेंटरपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा परिसर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी आणि राष्ट्रीय वीज प्रशिक्षण संस्था या दोन्ही संस्थांपासूनही जवळ आहे. पहिल्या दशकात, सीएमईआरआयने मुख्यत्वेकरून मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील तंत्रज्ञान राष्ट्रीय पातळीवर विकसित कसे करता येईल या आणि आयात प्रतिस्थापनेच्या दिशेने आपले प्रयत्न केंद्रित केले.

सध्या सीएमईआरआय रोबोटिक्स, मेकॅट्रोनिक्स, मायक्रोसिस्टम, सायबरनेटिक्स, मॅन्युफॅक्चिरग, प्रिसिजन अ‍ॅग्रिकल्चर, एंबेडेड सिस्टीम, नियर नेट शेप मॅन्युफॅक्चिरग आणि बायोमिमेटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकासाचे (आर अ‍ॅण्ड डी)  कार्य करत आहे. मेकॅनिकल इंजिनीअिरगमधील वर उल्लेख केलेल्या विषयांमधील अत्याधुनिक संशोधनाबरोबरच संस्था सध्या देशातील दारिद्रय़ निर्मूलन, सामाजिक सुधारणा, ऊर्जा सुरक्षा, अन्न सुरक्षा, एरोस्पेस, खाणकाम, ऑटोमोबाइल आणि संरक्षण यांसाठी उपयुक्त विविध तांत्रिक उपाय उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र कार्यरत आहे.

संशोधनातील योगदान 

ही यांत्रिक अभियांत्रिकी या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधनाबरोबरच संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) प्राधान्य देत इतर शाखांमधील मूलभूत संशोधनाशी योग्य समन्वय साधलेला आहे. त्यामुळेच सीएमईआरआयने आपल्या संशोधनाच्या माध्यमातून अनेक उत्पादने आणि प्रक्रिया (प्रोडक्ट्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस) विकसित केलेल्या आहेत. त्यापैकी २६ उत्पादने अथवा प्रक्रियांना प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. संस्थेने शंभराहून अधिक पेटंट्स दाखल केले आहेत. तसेच, आतापर्यंत एकशे वीसपेक्षा जास्त परवानाधारकांनी संस्थेच्या उत्पादनांमधून विविध व्यावसायिक प्रक्रिया शिकलेल्या आहेत. साठच्या दशकात हरितक्रांतीमुळे देशामध्ये शेतकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सुरू झाला. ट्रॅक्टरच्या या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, सीएमईआरआयने १९६५साली ३५ एचपी ट्रॅक्टरच्या आरेखन आणि विकासासाठी एक प्रकल्प सुरू केला. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी संस्थेने विकसित केलेल्या ट्रॅक्टरचे नाव ‘स्वराज’असे ठेवले. संस्थेच्या संशोधन कार्यातील ‘स्वराज’ हे निश्चितच एक महत्त्वाचे पाऊल मानता येईल.

अलीकडे शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने संस्थेने सीएसआयआर-८०० या सामुदायिक संशोधन प्रकल्प कार्यक्रमाअंतर्गत सलेकशॉ इलेक्ट्रिक रिक्षा विकसित केली. याबरोबरच संस्थेने पश्चिम बंगाल नूतनीकरणक्षम ऊर्जा विकास एजन्सी (डब्ल्यूबीआरडीएए) च्या सहकार्याने नूतनीकरण ऊर्जा स्रोतांच्या वापरासाठी स्मार्ट कार्ड आधारित प्रीपेड ऊर्जा मीटर विकसित केले. संस्थेच्या शास्त्रज्ञांनी एकाच आकारमनाचे क्रिकेट चेंडू असावेत आणि चेंडूच्या कार्यक्षमतेत निरंतरता आणण्यासाठी भारतातील पहिले क्रिकेट बॉल शिलाई मशीन तयार केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी विविध संधी

सीएमईआरआयने विद्यार्थ्यांसाठी मेकॅट्रॉनिक्स आणि अप्लाइड अ‍ॅण्ड कॉम्प्युटेशनल मेकॅनिक्स या विषयांतील पदव्युत्तर- पीएचडी या स्तरावरील अभ्यासक्रम तयार केलेला  आहे. सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार सीएमईआरआयमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पदव्युत्तर पदविका, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. नुकताच संस्थेने विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स, मेंटेनन्स इंजिनीअिरग आणि अ‍ॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चिरग टेक्नोलॉजी यांसारख्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे.

सीएमईआरआय भारतातील अनेक विद्यापीठांशी विज्ञान, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीतील संशोधनासाठी संलग्न आहे. दरवर्षी अनेक गुणवत्ताप्राप्त जेआरएफ वा एसआरएफ विद्यार्थी सीएमईआरआयमध्ये पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  संस्था वर्षांतून दोनदा संधी बहाल करते.

*     संपर्क 

सेन्ट्रल मेकॅनिकल इंजिनीअिरग रिसर्च इन्स्टिटय़ूट, महात्मा गांधी अ‍ॅव्हेन्यू,

सिटी सेंटर, दुर्गापूर, पश्चिम बंगाल – ७१३२०९

दूरध्वनी   +९१-३४३- २५४६४०१.

संकेतस्थळ  –  http://www.cmeri.res.in

itsprathamesh@gmail.com

Story img Loader