गौतम ठक्कर
सोशल मीडिया हे माध्यम दृष्य आणि लिखाण यांचे मिश्रण आहे. त्यामुळेच एखादे कॅम्पेन लोकप्रिय होण्यासाठी अनेक घटक भूमिका बजावतात. कधी कधी त्याचे डिझाइन लोकांना आवडते, कधी धोरण अनेकदा नवीन उत्पादन किंवा सेवाच उचलून धरली जाते. पण या सगळ्यामध्ये असा एक घटक आहे जो लोकांना चटकन आकर्षून घेऊ शकतो. हा घटक म्हणजे कॉपी. अर्थात मजकूर. जो लोक वाचतात. त्यामध्ये ब्रँड आणि उपभोक्ता किंवा ग्राहक यांना जोडून ठेवण्याची शक्ती असते. जनमत तयार करण्याची ताकद लिखाणामध्ये असते. उदाहरणच द्यायचे झाले तर भारतीय स्वातंत्र्य लढय़ाच्या वेळी प्रादेशिक भाषांमधील प्रसारमाध्यमांनी जनमत तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच उत्तम प्रकारचे लिखाण, मजकूर हे कुठल्याही ब्रँड किंवा सेवेसाठी महत्त्वाचं असतं. म्हणूनच कंटेंट रायटिंग हा सोशल मीडिया मार्केटिंगमधला एक महत्त्वाचा भाग आहे.
कामाचे स्वरूप
वर म्हटल्याप्रमाणे उत्तम लिखाणामुळेच ब्रँड आणि ग्राहक यांच्यातले नाते तयार होत असते. त्यावरच ते अवलंबून असते. अनेक कंपन्या मोठय़ा कॉपीला प्राधान्य देतात. माहिती विस्तृतपणे सांगणे आणि तिचा प्रसार करणे, जेणेकरून ग्राहकांना ती समजायला सोपी जाईल, हा विचार त्यामागे असतो. याविरुद्ध काही कंपन्या मजकूर कमी ठेवण्यावर भर देतात. कमी मजकूर म्हणजे कमीतकमी शब्दात म्हणणे मांडणे हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळेच मग तो मजकूर अधिकाधिक प्रभावी कसा होईल, असेल याकडे विशेष लक्ष द्यावे लागते.
वेबसाइटसाठी कंटेंट लिहिणे आणि सोशल मीडियासाठी कॉपी लिहिणे हे दोन कंटेंट रायटिंगमध्ये मोडणारे मुख्य प्रकार आहेत. ब्रँड तसेच सेवेविषयीची इत्थंभूत माहिती असणेही लिखाणासाठी गरजेचे असते. मार्केटिंगसाठी कंटेंट रायटिंग हा सर्वात महत्त्वाचा पैलू समजला जातो. लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या प्रकारची भाषा वापरली जाते यावरच कंपनी, ब्रँड किंवा सेवेचे भवितव्य अवलंबून असते. आजही आपण पाहिले तर अनेक अशी कॅम्पेन्स आहेत जी त्यांच्यातल्या विशिष्ट मजकुरामुळे, लिखाणामुळे लक्षात राहतात. थोडक्यात आपला संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आणि आपल्या ब्रँडची लोकांना सवय लावणे हे कुठल्याही कंपनीसाठी महत्त्वाचे असते.
पात्रता
कंटेंट रायटिंगसाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. भाषेवर प्रभुत्व, उत्तम व्याकरणकौशल्य आणि कल्पकता. लिखाण ही अशी गोष्ट आहे ज्यात कल्पकतेने शब्दांची अर्थपूर्ण जुळवाजुळव केली जाते. कंटेंट रायटिंग या क्षेत्रात उतरायचे असेल तर या तीन गोष्टी असणे अत्यंत गरजेचे आहे. सरावाने लिखाण परिपक्व होत जाते. तसेच वाचनामुळे शब्दसंपदा वाढते. कंटेंट रायटिंग हे क्षेत्र म्हणूनच थोडेसे साहित्याकडे वळणारे क्षेत्र आहे.
अभ्यासक्रम
मीडियाविषयीचे जे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये कॉपी रायटिंग हा विषय शिकवला जातो. बीएमएम हा पदवी अभ्यासक्रम किंवा संज्ञापन आणि पत्रकारितेचे पदव्युत्तर अभ्यासक्रम यासाठी उपयुक्त ठरतात. पण मुळातच लेखन ही एक कला आहे आणि तिचे ठोस असे प्रशिक्षण घेता येत नाही. जितके जास्त वाचन तितके उत्तम लिखाण. तुमच्या लेखनावर तुम्हाला विश्वास असेल तर या क्षेत्रात खूप संधी आहेत. वेबसाइट्सपासून ते वार्षिक अहवालांपर्यंत अनेक कारणांसाठी कंपन्यांना कंटेंट रायटर्सची आवश्यकता भासत असते.
(लेखक एव्हरीमीडिया टेक्नॉलॉजी या कंपनीचे सीईओ आहेत.)