अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी मराठी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट तर इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनिट पात्रता व त्याशिवाय एमएस-सीआयटी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी महाराष्ट्र शासनाचा http://www.maharashtra. gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज व्यवस्थापक, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, ५ फायनान्स रोड, पुणे ४११००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१३.

संरक्षण मंत्रालयात असिस्टंट फोरमन- मेकॅनिकलच्या
११ जागा  
उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली असावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०१४.

eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
expert answer on career advice questions career advice tips
कराअर मंत्र

बोकारो पॉवर सप्लाय कंपनीमध्ये मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल ऑपरेटर्सच्या ४२ जागा
उमेदवारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
३० नोव्हेंबर- ६ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली बोकारो पॉवर सप्लाय कंपनीची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.bpscl.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जानेवारी २०१४.

स्टेट बँक ऑफ हैद्राबादमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्हजच्या ४६ जागा
अर्जदारांनी व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, फायनान्स विषयातील पदव्युत्तर पदविका, एमकॉम, एमए- अर्थशास्त्र, सीए, आयसीडब्ल्यूए, कंपनी सेक्रेटरी यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोगट- ३३ ते ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टेट बँकेची जाहिरात पाहावी अथवा http://www.statebankofindia.com अथवा http://www.sbi.co.in  या बँकेच्या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जानेवारी २०१४.

आयुध निर्माणी- डेहराडून येथे कुशल कामगारांच्या ८० जागा
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी फिटर, ऑप्टिकल वर्कर मशिनिस्ट, टर्नर, एक्झामिनर, मिलर, इलेक्ट्रिशियन, सुतारकामविषयक पात्रता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर- ६ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- डेहराडूनची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, रायपूर जि. डेहराडून २४८००८ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
४ जानेवारी २०१४.

भारत प्रतिभूती मुद्रणमध्ये डेप्युटी मॅनेजर अकाऊंटस्च्या
७ जागा
अर्जदारांनी सीए, आयसीडबल्यूए अथवा एमबीए- फायनान्स यांसारखी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत प्रतिभूती मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगमची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डीजीएम (पर्सोनेल) सिक्युरिटी प्रिंटिंग अ‍ॅण्ड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., १६ वा मजला, जवाहर व्यापार भवन, जनपथ, नवी दिल्ली ४११०११ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ जानेवारी २०१४.