अर्हता- पदवीधर, प्रादेशिक भाषांसह संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २८ ते ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ibps.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर २८ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.
भारत हेवी इलेक्ट्रिकलमध्ये सुपरवायझर ट्रेनी (फायनान्स)च्या ५० जागा :
अर्हता- बीकॉम पदवी ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा २७ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकलची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://careers.bhel.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ जुलै २०१५ पर्यंत अर्ज करावा.
ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी, नवी दिल्ली येथे स्टेनोग्राफर्सच्या ४ जागा : अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ जून २०१५ च्या अंकातील ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीची जाहिरात पाहावी अथवा ब्युरोच्या http://www.beeindia.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज दि सेक्रेटरी, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी, चौथा मजला, सेवा भवन, आर. के. पुरम्, सेक्टर- १, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर १ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
आयुध निर्माणी- देहू रोड येथे एक्झामिनर (फिलिंग)च्या २२ जागा:
वयोमर्यादा ३२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जुलै २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- देहू रोडची जाहिरात पाहावी अथवा http://www.ofdr.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, देहू रोड, पुणे- ४१२१०१ या पत्त्यावर २ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.
सीमा सुरक्षा दलात सब-इन्स्पेक्टर (स्टेनोग्राफर्स)च्या २५ जागा :
अर्हता- बारावी उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम, लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी
आणि हिंदी टंकलेखनाची विहित पात्रता प्राप्त. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० जुलै २०१५ च्या अंकातील सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी. एसएसबीच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने ३ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.
जलस्रोत व नदी-जोड विभाग, नागपूर येथे कुशल कामगारांसाठी १७ जागा :
अर्हता- शालांत परीक्षा उत्तीर्ण. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण. वयोमर्यादा ३० वर्षे. तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ४ ते १० जुलै २०१५ च्या अंकातील जलस्रोत मंत्रालय, नागपूरची जाहिरात पाहावी. http://www.cwc.gov.in ”RECRUTMENTS” या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज सुपरिटेंडिंग इंजिनीअर (सी) मॉनिटरिंग सेंट्रल ऑर्गनायझेशन, सेंट्रल वॉटर कमिशन, ब्लॉक सी- तिसरा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, नागपूर-४४०००६ या पत्त्यावर ३ ऑगस्ट २०१५ पर्यंत पाठवावेत.