* मी मेकॅनिकल इंजिनीअरिंग २०१६ साली पूर्ण केले आहे. १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे माझे विषय होते. मला ऑटोमोबाइल उद्योगात विशेषत व्होक्सवॅगन या कंपनीत नोकरी करायची आहे. पण माझी या कंपनीत काहीच ओळख नाही.
मी काय करायला हवे? – विशाल जाधव
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कॅम्पस प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळतेच. शिवाय वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करण्याच्या अनुषंगाने ओळखी म्हणजेच रेफरन्सचा निश्चितच उपयोग होऊ शकतो. तथापि ही सुविधा नसेल तरी निराश होऊ नये. तुम्हाला पदविका परीक्षेत उत्तम गुण असतील, तुमच्या अभियांत्रिकी विषयाच्या संकल्पना स्पष्ट असतील तसेच तुमच्याकडे सादरीकरण कौशल्य उत्तम असेल तर तुम्ही या कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभाग किंवा आस्थापना विभागाकडे अर्ज करून ठेवावा. कंपनीस वेळोवळी मनुष्यबळाची गरज भासत असते. त्यासाठी जागा भरल्या जातात. त्याची माहिती कंपनीच्या संकेतस्थळावर दिली जाते. त्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावे लागेल.
* मी बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षांला आहे. बी.कॉम.नंतर माझ्यासाठी काय उत्तम राहील ? – समीर जोशी
बी.कॉम.ची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर विविध प्रकारच्या संधी मिळू शकतात. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश करता येईल.
१) एमबीए इन फायनान्स हा अभ्यासक्रम करून बँका व वित्तीय संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते.
२) केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन राजपत्रित अधिकारी होऊ शकता.
३) स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा देऊन केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नोकरी मिळवता येईल.
४) चार्टर्ड अकाऊंटन्सी, कंपनी सेक्रेटरीशिप हे अभ्यासक्रम करून कॉर्पोरेट क्षेत्रात जाता येते.
५) एम.कॉम. आणि त्यानंतर पीएच.डी. करून अध्यापन क्षेत्रात जाण्याची संधी मिळते.
६) विविध बँकांच्या लिपिक संवर्गीय किंवा अधिकारी संवर्गीय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊन बँकिंग क्षेत्रात करिअर करता येते.
७) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज एज्युकेशन या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेले विविध छोटे अभ्यासक्रम करून स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड, गुंतवूणक सल्लागार या क्षेत्रात कार्यरत होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते.
८) अकाऊंटन्सीमध्ये गती असल्यास या क्षेत्रातील मोठय़ा फम्र्स/ दुकाने/ आस्थापना यासाठी सेवा देऊ शकता.