*  मी बीएमएसमध्ये पदवी घेतली आहे. आता मी एमबीए प्रवेश परीक्षेची तयारी करत आहे. मी दिव्यांग आहे. मला पुढे कुठली करिअर संधी आहे?

-मैथिली गायकवाड

मैथिली, शासनाच्या नियमानुसार एमबीएचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये काही जागा दिव्यांगांसाठी राखीव असतात. त्यामुळे तू त्यादृष्टीने प्रयत्न करून चांगल्या एमबीए संस्थेत प्रवेश मिळव. त्यात फायनान्स किंवा ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयांत स्पेशलाझेशन केलेस तर ते नक्कीच उपयुक्त ठरेल.

या शिक्षणामुळे तुला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये संधी मिळू शकेल.

*  मी बीएससी इलेक्ट्रॉनिक्स केले आहे. मला यापुढे करिअरच्या कोणत्या संधी मिळतील? मला एमएससी इलेक्ट्रॉनिक्स करण्याची इच्छाही आहे. मी काय करावे?

-दिनेश बद्दवार

दिनेश, तुला दूरसंचार कंपन्यांमध्ये कनिष्ठ स्तरावरील नोकरी मिळू शकते. मात्र त्यासाठी या कंपन्यांमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा/मुलाखत द्यावी लागेल. इलेक्ट्रॉनिक्स विषयात एम.एससी केल्यावर तुला आणखी वरिष्ठ श्रेणीच्या नोकरी मिळू शकतात. काही पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स विषयातील बीई/बीटेक किंवा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील एम.एससी ही अर्हता ग्राह्य़ धरली जाते. एमएससी केल्यावर सैन्य दलातही तुला करिअर संधी मिळू शकते. तथापि एम.एससी केल्यानंतर लगेचच चांगली संधी मिळेल असे संभवत नाही. बीई/बीटेक केलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना कोअर इलेक्ट्रॉनिक्स शाखेत नोकरी न मिळता आयटी कंपन्यांमध्येच नोकरी मिळते ही बाब ध्यानात ठेवावी.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)

Story img Loader