मी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. मला रॉ, आयबी अशा गुप्तचर संस्थांमध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी मला काय करावे लागेल? कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जयदीप पराग काणे

जयदीप रॉ, आयबी या गुप्तचर संस्थांमध्ये थेट भरती केली जात नाही. साधारणत: भारतीय पोलीस विभागातील गुणवत्तापूर्ण अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना आपली गुणवत्ता अत्यंत कसून चाचण्यांमधून सिद्धही करावी लागते. त्यामुळे तुला आधी नागरी सेवा परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेमध्ये दाखल व्हावे लागेल. या सेवेत दाखल झाल्यावर उच्च दर्जाची कामगिरी बजावली तरच या संधींची द्वारे तुझ्यासाठी खुली होतील.

मी बारावीचे शिक्षण घेतलेले आहे. मला विचारायचे होते की, सौरशक्तीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्या संधी मिळतील? त्यासाठी चांगल्या महाविद्यालयांची नावे सांगाल का? पुढे मला कितपत वाव आहे?

निरंजन लाले

निरंजन, तुला सौरशक्तीच्या क्षेत्रात जायचे आहे, असे जरी तू प्रश्नात नमूद केले असलेस तरीही तुला नेमक्या कोणत्या क्षेत्रात, कशा प्रकारे काम करायचे आहे, हे तुझ्या प्रश्नावरून स्पष्ट होत नाही. सौरशक्तीच्या क्षेत्रात मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल शाखेतील अभियंत्यांना संधी मिळू शकते. अभियांत्रिकी स्वरूपाच्या कामासोबतच या ऊर्जेची विक्री, कार्यालयीन व्यवस्थापन, वित्तीय बाजू सांभाळणारे मनुष्यबळ अशा व्यक्तींचीही गरज भासते. तू यापैकी कोणत्या गटात मोडतोस, ही बाब लक्षात घे. त्याप्रमाणे तुला पुढील शिक्षण घ्यावे लागेल. अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे असल्यास तुला इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल अभियांत्रिकी अभ्यासक्रम करावा लागेल. दुसऱ्या गटात काम करायचे असल्यास, वाणिज्य, व्यवस्थापन या ज्ञानशाखेचे पुढील शिक्षण घ्यावे लागेल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.)