युनिव्हर्सटिी ग्रॅन्ट्स कमिशन (यूजीसी) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा – २०१७ दि. २२ जानेवारी २०१७ रोजी घेणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यातून साहाय्यक प्राध्यापक किंवा ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी निवड केली जाईल.

पात्रता – भाषा, सामाजिक विज्ञान, इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/इमावसाठी ५० टक्के गुण आवश्यक)

वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०१७ रोजी) ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी २८ वष्रेपर्यंत (अजा/अज/इमाव/महिला – ३३ वष्रे). साहाय्यक प्राध्यापक पदासाठी वयाची अट नाही.

परीक्षा शुल्क – रु. ६००/- (इमाव – रु. ३००/-, अजा/अज – रु. १५०/-)

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सीबीएसई संकेतस्थळ www.cbsenet.nic.in वर दि. १६/११/२०१६ पर्यंत करावेत.

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन अंतर्गत जनरल रिझव्‍‌र्ह इंजिनीअर फोर्समध्ये एकूण २१७६ पदांसाठी पुरुष उमेदवारांची भरती.

जाहिरात क्र. ०१/२०१६

(१) ड्राफ्ट्समन (५२ पदे),

(२/३) पर्यवेक्षक भांडार/नìसग (प्रत्येकी ६ पदे),

(४) िहदी टायपिस्ट (८ पदे),

(५) वाहन मेकॅनिक (१३३ पदे),

(६) वेल्डर (१३ पदे),

(७ ते १३) मल्टिस्किल्ड वर्कर – पायोनियर (२०३ पदे)/मेस वेटर (१६ पदे)/नìसग साहाय्यक (६५ पदे)/सफाईवाला (११९ पदे)/ड्रायव्हर इंजिन स्टटिक (३८४ पदे)/गवंडी (१५४ पदे)/कुक (३३० पदे),

(१४) ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट

(४७५ पदे),

(१५) ड्रायव्हर रोड रोलर (७३ पदे),

(१६) उत्खनन यंत्र चालक (१३९ पदे)

पात्रता –

पद क्र. (१) बारावी  आíकटेक्चर/ड्राफ्ट्समन आयटीआय

(२) पदवी मटेरियल्स मॅनेजमेंटमधील कोर्स

(३) बारावी नìसग कोर्स  ३ वर्षांचा अनुभव

(४) बारावी िहदी टायिपग ३० श.प्र.मि.

(५) आणि (६) दहावी  संबंधित ट्रेडचा आयटीआय

पद क्र. (७) ते (१३) दहावी उत्तीर्ण संबंधित आयटीआय किंवा कामांचा अनुभव

पद क्र. (१४) ते (१६) – दहावी  वाहन चालविण्याचा परवाना

पद क्र. (१) ते (६) आणि (१४) ते (१६) पदांना वयाची अट – १८ ते २७ वष्रे. पद क्र. (७) ते (१३) साठी १८ ते २५ वष्रे

परीक्षा शुल्क रु. ५०/- (अजा/अजसाठी फी माफ)

शारीरिक मापदंड – उंची – १५७ सें.मी., छाती – ७५-८० सें.मी., वजन – ५० कि. निवड पद्धती – (१) शारीरिक क्षमता चाचणी, (२) प्रॅक्ट्रिकल/ट्रेड टेस्ट, (३) लेखी परीक्षा – वस्तुनिष्ठ बहुपर्यायी – सामान्य ज्ञान, इंग्रजी, िहदी, अंकगणित, विश्लेषण आणि संख्यात्मक कौशल्य यावर आधारित.

विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा नमुना

(ज्याची िपट्र ए-४ साईज ७५ जीएसएम कागदावर काढावी.) www.bro.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विहित नमुन्यातील िहदी/इंग्रजीत पूर्ण भरलेला अर्ज आणि अ‍ॅडमिट कार्ड आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या प्रतींसह ‘कमांडंट, जीआरईएफसेंटर, दिघी कँप, पुणे -४११ ०१५

या पत्त्यावर रजिस्टर्ड पोस्टाने (पोहोच पावतीसह) दि. २५ नोव्हेंबर २०१६ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

 

ग्रॅज्युएट ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (ॠं३ी) स्कोअरच्या आधारे भारत सरकारच्या अंगीकृत उपक्रमांमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी भरती.

(१) न्युक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल) मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इन्स्ट्रमेंटेशन किंवा सिव्हिल विषयांत.

(२) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन

लिमिटेड (एनटीपीसी) इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रमेंटेशन विषयांत.

(३) भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (बीबीएनएल) इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी विषयात.

पात्रता – संबंधित विषयांतील अभियांत्रिकी पदवी आणि जीएटीई – २०१७ स्कोअर.

अर्ज कसा करावा – ज्या उमेदवारांनी ॠं३ी-२०१७ साठी रजिस्ट्रेशन केले आहे अशांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने.

(१) साठी http://www.npcilcareers.co.in/ वर जानेवारी २०१७ ते फेब्रुवारी २०१७ (दुसरा आठवडा) दरम्यान करावेत.

(२) साठी  http://www.ntpccareers.net/ वर दि. १० जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०१७ पर्यंत करावेत.

(३) साठी  http://www.bbnl.nic.in/ वर दि. १५ जानेवारी २०१७ ते २७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government job opportunities