आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान या विषयामध्ये –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

*    प्राणीशास्त्र (Zoology),

*    वनस्पतीशास्त्र (Botany),

*    रसायनशास्त्र (Chemistry)

*    भौतिकशास्त्र (Physics)

*    आरोग्यशास्त्र (Hygiene)

या पाच विषयांचा समावेश होतो. पैकी प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या विषयांचा गटाने अभ्यास केल्यास तुलनात्मक अभ्यास केल्यास फायदा तर होईलच. शिवाय संकल्पना लक्षात राहतील आणि वेळही वाचेल. आजच्या लेखात आपण याच दोन विषयांचा अभ्यास कसा करावा ते पाहूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१३ नंतरच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार वरील दोन्ही विषयांचे महत्त्व वाढले आहे. प्रश्नांची संख्या, स्वरूप पाहिल्यास त्यात संकल्पनांची स्पष्टता व वस्तुनिष्ठता या दोहोंना सारखे महत्त्व दिल्याचे दिसून येते.

*    सजीवांचे वर्गीकरण

वर्गीकरण शास्त्राला टॅक्झोनॉमी (Taxonomy) म्हणतात. प्राण्यांचे सर्वप्रथम वर्गीकरण अरिस्टोटल (Aristotal) याने केले. वनस्पतीचे सर्वप्रथम वर्गीकरण अ‍ॅरिस्टोटलचा शिष्य थिऑफ्रॅट्स (Thiofratas) याने केले. वर्गीकरणामधील सर्वात महत्त्वाची पद्धती म्हणजे ‘कोरोलस लिनीयस’ याचा जनक कार्ल लिनी हा असून या पद्धतीला द्विनाम नाम पद्धती (Binomial nomenclature) असेही म्हणतात. यामध्ये जाती व प्रजाती नामाचा (Genus & species nam) समावेश होतो. याचे सर्वात मोठे एकक सृष्टी(Kingdom) असून सर्वात छोटे एकक( species) आहे.

पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत (Five Kingdom classification) आर एच व्हीटकर यांनी

१) सृष्टी मोनेरा (Kingdom Monera)

२) सृष्टी प्रोटेस्टा (Kingdom Protista)

३) सृष्टी कवक (Kingdom fungi)

४) सृष्टी वनस्पती (Kingdom Plantae)

५) सृष्टी प्राणी (Kingdom Animalia) यामध्ये सर्व सजीवांचे वर्गीकरण केले.

आयोगाच्या परीक्षेसाठी वनस्पती व प्राणी सृष्टीचा अभ्यास अधिक करणे आवश्यक आहे. बदलल्या परीक्षापद्धतीनुसार राष्ट्रीय/राज्य प्राणी, पक्षी, वृक्ष, फळ यांची जाती-प्रजाती नावे माहिती असणे महत्त्वाचे आहे.

पेशी > ऊती > अवयव संस्था

एकमेकांशी संबंधित असणाऱ्या या संकल्पना चढत्या क्रमाने प्राणी-वनस्पती यांच्या संबंधात अभ्यासल्यास त्यांचे कार्य आणि वस्तुनिष्ठ माहिती लक्षात ठेवणेदेखील सोपे जाते.

या शिवाय पेशीपटल, पेशींद्रव्य, केंद्रक, गोल्जिपिंड, तंतुकणिकाचे कार्ये अभ्यासने आवश्यक

*    रक्ताभिसरण संस्था

रक्त व रक्तगट, रक्ताची कार्ये, रक्ताचे महत्त्वाचे घटक (WBC, प्लास्मा,) रक्ताभिसरण संस्थेचे अवयव हृदय- कार्य, कप्प्यांची संख्या, प्रति मिनिट अभिसरण क्षमता, शिरा-धमनी यामधील फरक पाहणे.

*    उत्सर्जन संस्था

शरीरातील टाकाऊ  पदार्थ बाहेर टाकण्यासाठी इतर प्राण्यांमधील पद्धतीचा अभ्यास इथे महत्त्वपूर्ण आहे. या संस्थेशी संबंधित अवयव त्यांचे कार्य विशेषत: बावमान कॅप्सूल, मदत शोषण व पुनशरेषण करणारे घटक यावर नेहमी प्रश्न अपेक्षित असतातच.

*    प्रजनन संस्था

प्रजननाच्या पद्धती सस्तन, अंडज प्राण्यांमधील फरक, संबंधित अवयव, आवश्यक संप्रेरके. शरीरातील सर्व संप्रेरकांचा अभ्यासदेखील या ठिकाणी करता येईल.

*    पचन संस्था

या संस्थेमधील अवयवांचा क्रम, पचनाची सुरुवात कोठे होते, संपूर्ण पचन कोठे होते, पचलेल्या अन्नाचे सत्मीकरण कोठे होते, प्रत्येक अवयवाचे कार्य काय आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ  शकतात.

*    अस्थीसंस्था

एकूण हाडांची संख्या, हातातील-पायातील हाडांची नावे त्यांचा क्रम लक्षात ठेवावे, मानवी अस्थीसंस्था कोणत्या प्राण्यांशी मिळतीजुळती आहे, याचा अभ्यासदेखील गुण मिळवून देतो.

*     डीएनए/आरएनए

सर्वात शेवटचा तसेच महत्त्वाचा घटक शोध लावणारे शास्त्रज्ञ प्रतिकृती तयार करणारे शास्त्रज्ञ, महत्त्वाचे घटक DNA-RNA मधील पूरक जोडी, त्यातील महत्त्वाचे घटक त्यांचे कार्य याचा अभ्यास करावा.

यापुढील लेखामध्ये आपण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांचा अभ्यास करणार आहोत.