भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था, लखनौ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवाबी शहर या नावाने भारतभर प्रसिद्ध असलेले आणि उत्तर प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या लखनौ येथे असलेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च (आयआयटीआर) म्हणजेच भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था.
विषह्ण हा शब्द म्हणजे तसा धडकीच भरवणारा, पण त्याचे विज्ञानातील महत्त्व मोठे आहे. म्हणूनच त्याविषयी संशोधन करण्यासाठी या संशोधन संस्थेची स्थापना १९६५ साली झाली आहे. तेव्हापासून देशाच्या सेवेमध्ये असणाऱ्या या संस्थेने टॉक्सिकॉलॉजी या विषयामध्ये वैविध्यपूर्ण व अभिनव संशोधन करून त्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) अनेक संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे आयआयटीआर हीदेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे.
संस्थेविषयी –
‘‘स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाच्या विकासासाठी औद्योगिकीकरण हे आवश्यक आहेच, मात्र त्या वेळी होत असलेल्या जलद औद्योगिकीकरणानंतर त्याचे प्रतिकूल परिणाम हे औद्योगिक कामगारांच्या आरोग्याशी निगडित असतील. तसेच, औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांचा एकूणच सर्वसामान्यांच्या आरोग्य व पर्यावरणावर होणारा परिणाम हा फक्त घातकच नसेल तर निश्चितच देशाच्या सर्वागीण विकासाला खीळ बसवणारा असू शकतो.’’ या सर्व गोष्टींची जाणीव असणारे द्रष्टे संशोधक प्रा. सिब्ते हसन झैदी यांना या सर्व प्रश्नांना संबोधित करण्याची गरज भासू लागली. त्यांच्या पुढाकाराने मग शाश्वत औद्योगिक विकासासाठी धोरणे विकसित व निश्चित करण्यासाठी व या सर्व बाबींचा आवश्यक तो अभ्यास होण्यासाठी आयआयटीआर या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था या संशोधन संस्थेची स्थापना दि. ४ नोव्हेंबर १९६५ रोजी झाली. सुरुवातीला संस्थेचे नाव इंडस्ट्रियल टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर असे होते. कालांतराने बदलून ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टॉक्सिकॉलॉजी रिसर्च असे करण्यात आले. संस्थेचे मुख्य केंद्र लखनौमध्ये असून दुसरे एक विस्तार केंद्र लखनौ-कानपूर महामार्गावरील घेरू नावाच्या खेडय़ाजवळ आहे. स्थापनेपासूनच संस्थेने पर्यावरण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांना संशोधनाच्या माध्यमातून सुरक्षा पुरवणे व औद्योगिक क्षेत्रासाठी आवशयक त्या व्यावसायिक सेवा देणे या हेतूने संशोधन करण्यास सुरुवात केली. संस्थेने टॉक्सिकॉलॉजीमधील मूलभूत व उपयोजित संशोधनास अक्षरश वाहून घेतलेले आहे. संस्थेमध्ये चालत असलेल्या प्रमुख संशोधन विषयांकडे जरी पाहिले तरी हे लक्षात येते.
संशोधनातील योगदान –
टॉक्सिकॉलॉजीमध्ये पाच दशकांहूनही अधिक काळ संशोधन करत असलेली भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था जागतिक स्तरावर आपली ओळख टिकवून आहे. संस्थेचे टॉक्सिकॉलॉजी या प्रमुख विषयातील एकूण ३,८०० शोधनिबंध आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत.
त्यासहितच संस्थेच्या नावावर एकूण २५ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. संस्थेकडे जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा असून तिच्या पायाभूत सुविधा अतिशय उत्तम आहेत. संस्थेने संशोधनातील विविध स्रोत वापरून बायोमार्कर डेव्हलपमेंट, अल्टरनेट टू अॅनिमल मॉडेल्स, मॅथॅमॅटिकल मॉडेिलग, डिटेक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट मेथड्स फॉर टॉक्सिन्स, इंजिनीअर्ड नॅनोमटेरियल्स, जेनेटिकली मॉडिफाइड प्रोडक्ट्स इत्यादी बाबींमध्ये तंत्रज्ञान विकसित करून कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.
ओईसीडी, यूएसईपीए, बीआयए आणि आयएसओ इत्यादी संस्थांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयआयटीआर ही संस्था संशोधनाव्यतिरिक्त सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील उद्योगांना रसायने वा तत्सम उत्पादनांच्या विषारी आणि विश्लेषणात्मक मूल्यांकनाची सेवादेखील बहाल करते. आयआयटीआरमध्ये सध्या संशोधन होत असलेल्या विषयांमध्ये एन्व्हायर्नमेंटल टॉक्सिकॉलॉजी, ग्राउंड अॅण्ड सरफेस वॉटर पोल्युशन, सेफ्टी असेसमेंट ऑफ फूड अॅण्ड अॅडिटिव्ह्ज, टॉक्सिकिटी इव्हॅल्युएशन ऑफ सबस्टन्सेस फॉर ह्युमन यूझ, मायक्रोबियल कंटॅमिनेशन, बायोरेमीडियेशन, हॅझर्ड आयडेंटिफिकेशन अॅण्ड टॉक्झिकोजिनोमिक्स, इम्युनोटॉक्सिकॉलॉजी, न्यूरोटॉक्सिकॉलॉजी, फूड टॉक्सिकॉलॉजी, एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी आणि कार्सनिोजेनिसिस या विषयांचा समावेश आहे. आपल्या या अशा वैविध्यपूर्ण संशोधनामुळेच कदाचित ही संशोधन संस्था भारतातील सर्व संशोधक विद्यार्थ्यांना आकर्षति करते.
विद्यार्थ्यांसाठी संधी –
सीएसआयआरच्या तत्त्वप्रणालीनुसार आयआयटीआरमध्ये Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. आयआयटीआरने विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल स्तरावर संशोधन अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. यामध्ये वर उल्लेख केलेल्या विविध संशोधन विषयांमधील पीएचडी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दरवर्षी अनेक अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.
संपर्क –
मुख्य कॅम्पस
भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था,
विषविज्ञान भवन, ३१ महात्मा गांधी मार्ग, लखनौ, उत्तर प्रदेश – २२६००१
दूरध्वनी +९१-५२२ -२२१७४९७
घेरू कॅम्पस
भारतीय विषविज्ञान संशोधन संस्था,
सरोजिनी नगर, औद्योगिक वसाहत लखनौ,
उत्तर प्रदेश – २२६००८.
दूरध्वनी +९१-५२२ -२४७६ २२७,
२४७६ २२८.
ईमेल – director@iitrindia.org
संकेतस्थळ – http://iitrindia.org/
itsprathamesh@gmail.com