रायबरेली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमीत उपलब्ध असणाऱ्या बीएससी- एव्हिएशन या पदवी अभ्यासक्रमाच्या २०१५-१६ या शैक्षणिक सत्राच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा
अभ्यासक्रमासाठी एकूण १०० जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५१ जागा खुल्या वर्ग गटातील उमेदवारांसाठी असून १५ जागा अनुसूचित जातीच्या, ७ जागा अनुसूचित जमातीच्या तर २७ जागा इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आवश्यक पात्रता
अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित व विज्ञान या विषयांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांच्या गुणांची टक्केवारी किमान ५५ टक्के (राखीव गटातील उमेदवारांसाठी ५० टक्के) असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.

वयोमर्यादा
उमेदवारांचे वय १७ वर्षांहून अधिक नसावे.

निवड प्रक्रिया
अर्जदारांना संगणकीय पद्धतीने निवड परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा  देशातील निवडक परीक्षा केंद्रांवर ७ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची मुलाखत व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.

अधिक माहिती
अभ्यासक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ ऑक्टोबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी. रायबरेलीची जाहिरात पाहावी अथवा अकादमीच्या http://www.igrua.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  २५ ऑक्टोबर २०१५ पर्यंत अर्ज करावेत.