ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी,चंदिगड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंजाब आणि हरियाना या दोन राज्यांची राजधानी असलेल्या चंदिगड येथे स्थित असलेली इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी (आयएमटीईएच) ही संस्था आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना अगदी अलीकडे १९८४ साली झालेली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) इतर संलग्न संशोधन संस्थांप्रमाणे आयएमटीईएचदेखील सीएसआयआरशी संलग्न संस्था आहे. संस्थेविषयी
मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधन क्षेत्रामध्ये ही संस्था आज अग्रस्थानी आहे. पण तिची सुरुवात १०,००० स्क्वेअर फुटाइतके क्षेत्रफळ असणाऱ्या जागेपासून झाली पण तेथेही संस्थेचे विकास कार्य जागतिक दर्जाचे होते. सप्टेंबर १९८९मध्ये कायमस्वरूपी कॅम्पसमधील बांधकाम पूर्ण झाल्यावर संस्थेने आपले सर्व बस्तान सध्याच्या ठिकाणी हलवले. सुमारे ४७ एकर क्षेत्र व्यापून टाकेल एवढय़ा परिसरात जवळपास २२ एकर क्षेत्रांत फक्त प्रयोगशाळा आहेत तर एकूण २५ एकर जागेवरील परिसर हा निवासी परिसर आहे. संस्थेचे एकूण ३.६० लाख चौरस फुटांचे बांधकाम क्षेत्र साधारणपणे चार मुख्य इमारतींमध्ये पसरलेले आहे. त्या म्हणजे मेन आर अॅण्ड डी ब्लॉक, फम्रेटेशन ब्लॉक, अॅनिमल हाऊस, वर्कशॉप- स्टोअर्स अॅण्ड सर्विसेस एरिया. याव्यतिरिक्त संस्थेचे गेस्ट हाऊस, कॅफेटेरिया तसेच प्रोटिन सेंटर (जी.एन. रामचंद्रन प्रोटिन सेंटर) इत्यादीसाठी स्वतंत्र इमारती आहेत. संस्थेच्या सर्व प्रयोगशाळा मोठय़ा, वातानुकूलित, स्वच्छ आणि उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. संस्थेने आधुनिक जीवशास्त्र आणि सूक्ष्मजीवांशी संबंधित जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधांची व्यवस्था केलेली आहे. यात मग अनेक गोष्टी जसे की बहुविध क्षमता असलेला लॅब-टू-पायलट स्केल पॅनेल फरमेंटर, टिशू अॅण्ड सेल कल्चर, सूक्ष्मजीवांची ओळख, देखभाल आणि संरक्षण व त्यासाठी एक प्राणीगृह, बायोइनफॉरमॅटिक्स व बायोकॉम्प्युटिंगसाठी वर्कस्टेशन्स, प्रोटिन आणि डीएनए विश्लेषणासाठी उपकरणे, संशोधन विषयांवर जवळजवळ ६४,००० संदर्भग्रंथांनी सुसज्ज ग्रंथालय, सूक्ष्मदर्शी (मायक्रोस्कोपीक) उपकरणे, आणि बौद्धिक मालमत्ता व्यवस्थापनासाठी असलेला डेटाबेस, रोगजन्य सूक्ष्मजीवांवर संशोधन कार्य करण्यासाठी संस्थेने बायोसेफ्टी लेव्हल ३ (बीएसएल ३) प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
संशोधनातील योगदान
आयएमटीईएच या संशोधन संस्थेने आधुनिक जैवविज्ञान आणि सूक्ष्मजीवांशी संबंधित जैवतंत्रज्ञान या क्षेत्रातील संशोधनाला पूर्णवेळ वाहून घेतलेले आहे. सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेला विज्ञान क्षेत्रातील इतर शाखा जसे की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary research) करणे क्रमप्राप्त आहे. आधुनिक जैवविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या विषयांशी संबंधित संशोधनासहितच इम्युनिटी अॅण्ड इन्फेक्शियस डिसिजेस, प्रोटिन डिझाइन अॅण्ड इंजिनीयिरग, फरमेंटेशन सायन्स, मायक्रोबियल फिजिओलॉजी अॅण्ड जेनेटिक्स, यीस्ट बायोलॉजी, बायोइनफॉरमॅटिक्स, मायक्रोबियल सिस्टेमॅटिक्स, एक्स्प्लॉइटेशन ऑफ मायक्रोबियल डायव्हर्सटिी फॉर बायोएक्टिव्हज्, एन्झाइम्स फॉर बायोट्रान्सफॉम्रेशन हे विषयदेखील आयएमटीईएचच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.
संस्थेकडे जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाशी संबंधित विविध विषयांमध्ये मूलभूत संशोधन आणि तंत्रज्ञानात्मक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये तज्ज्ञ संशोधकांचे पुरेसे पाठबळ उपलब्ध आहे. संस्थेमध्ये होणाऱ्या या संशोधनाला वाहून घेणारे एकूण ५५ प्रमुख संशोधक तर इतर जवळपास ३०० सहकारी तंत्रज्ञ संस्थेमध्ये संशोधन करत आहेत. या कर्तबगार मनुष्यबळाच्या जोरावर संस्थेने नैसर्गिक आणि पुन: संयोजक असे स्ट्रेप्टोकाइनेस हे एक महत्त्वपूर्ण औषधाचे पेटंट मिळवले आहे आणि हे संस्थेचे संशोधन क्षेत्रातील सर्वात मोठे यश म्हणता येईल.
संशोधनातील अजून एक महत्त्वाचे योगदान म्हणजे ड्रग डिस्कव्हरीसाठी कॉम्प्युटेशनल रिसोस्रेस वापरणे. सीआरडीडी (कॉम्प्युटेशनल रिसोर्स फॉर ड्रग डिस्कव्हरी) हे सिलिको मोडय़ुल या ओपन सोर्स ड्रग डिस्कव्हरी (ओएसडीडी) च्या प्रतिमानाचे रूप आहे. सीआरडीडी वेब पोर्टल एकाच मंचावर औषधांच्या संशोधनाशी संबंधित संगणक संसाधने प्रदान करते. संस्थेने शास्त्रज्ञ गजेंद्रपाल सिंग राघव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिमान विकसित केलेले आहे. संस्थेमध्ये आतापर्यंत दीडशेहून अधिक फ्री अॅण्ड ओपन सोर्स सॉफ्टवेअर, डाटाबेसेस आणि वेब-सव्र्हर विकसित केले गेले आहेत. या सव्र्हरचा वापर मोठय़ा प्रमाणावर वैज्ञानिक समुदायाने केला आहे. या अशा संशोधनातील यशाच्या माध्यमातून आयएमटीईएच निश्चितपणे देशाला व समाजाला भरीव योगदान देत आहे.
विद्यार्थ्यांसाठी संधी
आयएमटीईएच ही संशोधन संस्था आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या विषयांतील देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्रदेखील आहे. Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत येथे अनेक विद्यार्थी येथे पीएच.डी.चे संशोधन करतात. तसेच, आयएमटीईएच देशातील एक महत्त्वाचे प्रमुख विद्यापीठ जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबरोबर (जेएनयू) पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. आयएमटीईएच दरवर्षी महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय विद्यार्थ्यांना त्यांचे डिझरटेशन वर्क (प्रकल्प संशोधन) पूर्ण करण्यासाठी गुणवत्तेवर आधारित प्रवेश देते. अभियांत्रिकी व विज्ञान शाखांमधील अनेक विद्यार्थी येथे त्यांचे पदवी व पदव्युत्तर स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतात.
संपर्क
सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी, सेक्टर ३९ ए, चंदिगड- १६००३६.
दूरध्वनी +९१- १७२-२६ ९०७८५, २६९०६८४.
ई-मेल director@imtech.res.in
संकेतस्थळ – https://www.imtech.res.in/