रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य रेल्वे, मुंबईमध्ये एकूण २३२६ अॅप्रेंटिसची भरती
मुंबई, पुणे (१५९६ जागा), भुसावळ (४२१), पुणे (७८ जागा), नागपूर (१०७ जागा), सोलापूर (१२४ जागा)
(जाहिरात क्र. RRC/CR/AAI/२०१६ दि. २७ ऑक्टोबर २०१६) कार्पेटर, डिझेल मेकॅनिक आणि शिट मेटल वर्कर या ट्रेडसाठी दोन वर्षांच्या कालावधीसाठी आणि इतर ट्रेडसाठी एक वर्षांच्या कालावधीसाठी अॅप्रेंटिस प्रशिक्षण दिले जाईल.
पात्रता – दहावी उत्तीर्ण किमान ५० टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमधील आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १ नोव्हेंबर २०१६ रोजी १५ ते २४ वष्रे. उमेदवाराचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९९२ ते १ नोव्हेंबर २००१ दरम्यानचा असावा. (अजा/अज – ५ वष्रे, इमाव – ३ वष्रे, अपंग – १० वष्रे उच्चतम वयोमर्यादा शिथिलक्षम.)
अर्जाची फी – रु. १००/- (अजा/अज/महिला/अपंग यांना फी माफ आहे.)
निवड पद्धती – पात्र उमेदवारांच्या १०वी आणि आयटीआयच्या गुणांच्या सरासरी गुणवत्तेनुसार (गुणवत्ता यादी विभागवार/युनिट, ट्रेड, कम्युनिसाठी जाहीर होईल.) ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.rrccr.com या संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत. क्लस्टर (विभागा)ची/आस्थापनेवर (युनिट) निवड करताना उमेदवारांनी आपल्या ट्रेडसाठी त्या ठिकाणी संबंधित ट्रेडसाठी जागा आहेत की नाही हे तपासून मगच अर्ज करावा. उमेदवारांनी कोणताही एक क्लस्टर (विभाग) निवडून त्यामधील आस्थापनांसाठी पसंती क्रम देऊन अर्ज करावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग विक्रीकर निरीक्षक पदांच्या एकूण १८१ जागा भरण्यासाठी विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षा दि. २९ जानेवारी २०१७ रोजी घेणार आहे.
(अजा – २१, अज – ६, विजा (अ) – ७, भज (ब) – ३, अज (क) – ११, भज (ड) – १, इमाव – २८, खुला – १०४)
पात्रता – पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – दि. १ फेब्रुवारी २०१७ रोजी
१८ ते ३८ वष्रे. (मागासवर्गीय १८ ते ४३ वष्रे) अर्ज ऑनलाइन पद्धतीने दि. २३ नोव्हेंबर २०१६ पर्यंत करावेत. http://mahampsc.mahaonline.gov.in
वेतनश्रेणी – रु. ९३०० ते ३४,८०० (ग्रेड पे रु. ४,३००/- अधिक नियमानुसार भत्ते)
परीक्षेचे टप्पे – (१) पूर्व परीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा – २०० गुण.
शुल्क – अमागास रु. ३७३/-, मागासवर्गीय – रु.२७३/-