महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ‘दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क पूर्वपरीक्षा – २०१७’ दि. २८ मे २०१७ रोजी घेणार आहे.
एकूण रिक्त पदे – ३०० (अजा – ३७, अज – २१, विजा (अ) – ९, भज (ब) – ८, भज (क) – १०, भज (ड) – ६, इमाव – ५३, विमाप्र – ६, खुला – १५०).
मुख्य परीक्षा दि. २४ सप्टेंबर २०१७ रोजी आयोजित केली जाणार आहे.
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी. (पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार पूर्वपरीक्षेस बसण्यास पात्र आहेत.) वयोमर्यादा – दि. १ मे २०१७ रोजी १८ ते ३८ वष्रे (खुला गट), १८ ते ४३ वष्रे (मागासवर्गीय).
शारीरिक अर्हता – पुरुष – उंची – १६५ सें.मी., छाती – ७९-८४ सें.मी., महिला उंची – १५५सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ. परीविक्षाधीन कालावधी दोन वष्रे.
शुल्क – अमागास – रु. ३७३/-, मागासवर्गीय – रु. २७३/-, मा.स. – रु. २३/-
परीक्षेचे टप्पे – (१) पूर्वपरीक्षा – १०० गुण, (२) मुख्य परीक्षा – २०० गुण. ऑनलाइन पद्धतीने अर्ज https://mahampsc.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कं.लि. (महाजनको) मध्ये पुढील पदांची भरती.
(जाहिरात क्र. ०१ (जेएएन्) २०१७)
(१) केमिस्ट (३० पदे) पात्रता – बी.ई. (केमिकल टेक्नॉलॉजी) किंवा एम.एस्सी. (केमिस्ट्री)
(२) ज्युनियर लॅब असिस्टंट (३८ पदे) – बी.एस्सी. (केमिस्ट्री)
(३) डेप्युटी मॅनेजर (एचआर) (८ पदे) – पदवी एम.बी.ए./एम.एस्सी.
(४) डेप्युटी मॅनेजर (एफ्.ए.) (१७ पदे) – इंटर सी.ए./आयसीडब्ल्यूए किंवा एम्.बी.ए. (फिनान्स)/एम्.कॉम्. ३ वर्षांचा कामाचा अनुभव.
(५) असिस्टंट प्रोग्रॅमर (१३ पदे) – बी.ई. (कॉम्प्युटर/आयटी) किंवा एम.बी.ए. उ+, उ++, जावा डॉटनेट, इ. प्रोग्रॅिमगचा अनुभव.
(६) ज्युनियर ऑफिसर (सिक्युरिटी) (३१ पदे) – पदवी.
(७) ज्युनियर फायर ऑफिसर (७ पदे) – पदवी/अभियांत्रिकी पदविका फायर सब ऑफिसर/फायर इंजिनिअरिंग पदविका जड वाहन चालक परवाना.
(८) फायरमन (५८ पदे) – १०वी उत्तीर्ण ६ महिन्यांचा फायरमन कोर्स जड वाहन चालक परवाना.
पद क्र. (६), (७) आणि (८) साठी शारीरिक पात्रतेच्या अटी – पुरुष – उंची – १६५ सें.मी., छाती – ८१ ते ८६ सें.मी., वजन -५० किलो. महिला – उंची – १५७ सें.मी., वजन – ४५ किलो.
अनुभवी उमेदवारांसाठी वरिष्ठ पदे उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज www.mahagenco.in या संकेतस्थळावर दि. ७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत करावेत.
बी.ई./एम्.एस्सी. उमेदवारांना केंद्र सरकारमध्ये ग्रुप ‘ए’ अधिकारी/एम्.टेक्./एम्.फिल्./पीएच.डी. होण्याची सुवर्णसंधी. मुंबई</strong>, कल्पकम्, इंदौर, हैद्राबाद स्थित होमी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर ट्रेिनग स्कूलमध्ये १ वर्ष कालावधीसाठी ‘ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर्स’ (टीएस्ओ) पदांची भरती.
स्टायपेंड – रु. ३५,०००/- दरमहा ट्रेिनग यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांची ‘सायंटिफिक ऑफिसर्स’ पदावर भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) मध्ये नेमणूक. एकुण वेतन रु. ७२,०००/- दरमहा. सायंटिफिक ऑफिसर एम्.टेक्./एम्.फिल्./पीएच.डी.साठी होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट (एचबीएनआय) मध्ये प्रवेश मिळवू शकता.
पात्रता – किमान सरासरी ६०% गुणांसह मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, इ.मधील इंजिनिअरिंग पदवी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोसायन्सेस, जिओलॉजी, फूड टेक्नॉलॉजी इ.मधील एम.एस्सी.
निवड पद्धती – ऑनलाइन टेस्टमधून किंवा गेट २०१६/गेट २०१७ स्कोअरनुसार मुलाखतीसाठी उमेदवार निवडले जातील. अंतिम निवड मुलाखतीतील कामगिरीवर आधारित. ऑनलाइन अर्ज http://barconlineexam.in/ या संकेतस्थळावर दि. २३ जानेवारी २०१७ ते १४ फेब्रुवारी २०१७पर्यंत करावेत.
मध्य रेल्वेअंतर्गत मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखत-
अधिक माहिती व तपशिलासाठी मध्य रेल्वेच्या www.cr.indianrailways.gov.in> या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- मध्य रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालय, भायखळा, मुंबई- ४०००२६ येथे १ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी १० ते ११.
मध्य रेल्वेत मुंबई येथे स्काउट आणि गाइडसाठी विशेष संधी-
अर्जदार ५०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, कुठल्याही विषयातील पदवीधर किंवा शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी आणि त्यांनी स्काउट आणि गाइडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २९ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ३१ डिसेंबर २०१६ ते ६ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा मध्य रेल्वेच्या http://www.cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने
वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जानेवारी २०१७.