ऑफिसर्स/एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अभियांत्रिकी पदवीधरांची भरती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीएटीई (गेट) २०१७ स्कोअरच्या आधारे

(१) िहदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई ऑनलाइन अर्ज  दि. १० फेब्रुवारी २०१७ पर्यंत http://www.hindustanpetroleum.com/ संकेतस्थळावर करावेत.

(२) जीएआयएल (गेल इंडिया लि.) – ऑनलाइन अर्ज http://www.gailonline.in/ या संकेतस्थळावर दि. १७ फेब्रुवारी २०१७ पर्यंत.

पात्रता – मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रमेंटेशन, केमिकल या विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुण (अजा/अज – ५०% गुण) अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वयोमर्यादा – २५ वर्षांपर्यंत.

 

५ वर्षांच्या इंटिग्रेटेड एम.एससी. कोर्स प्रवेशासाठी नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट (एनईएसटी) २०१७  दि. २७ मे २०१७ रोजी घेणार.

प्रवेश क्षमता – एनआयएसईआर, भुवनेश्वर – १७२ आणि यूएम – डीएईसीईबीएस, मुंबई – ४७

पात्रता – बायोलॉजी/केमिस्ट्री/मॅथेमॅटिक्स/फिजिक्स विषयांसह १२वी (विज्ञान) २०१५ किंवा २०१६ मध्ये किमान ६०%  गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/विकलांग – ५५% गुण).

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म दि. १ ऑगस्ट १९९७ रोजी किंवा त्यानंतरचा असावा.

(खुला गट, इमावसाठी) अजा/अजसाठी ५ वर्षांनी शिथिल. काही उमेदवारांना रु. ६०,०००/-

इन्स्पायर स्कॉलरशिप दिली जाईल. एनआयएसईआर आणि सीईबीएसची उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएआरसी ट्रेिनग स्कूलमध्ये निवड मुलाखतीद्वारे पीएच.डी.साठी सरळ प्रवेश मिळू शकतो.

नेस्ट-२०१७ परीक्षेत ५ विभाग – एक सामान्य विभाग. दोन ते पाच विभागांत बायोलॉजी, केमिस्ट्री, गणित आणि फिजिक्स विषयांवर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न  असतील.

ऑनलाइन अर्ज  http://www.nestexam.in या संकेतस्थळावर दि. ६ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., मार्केटिंग डिव्हिजन – पश्चिम विभागात टेक्निकल/ट्रेड अ‍ॅप्रेंटिसपदांची भरती.

(१) टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिस – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रमेंटेशन (महाराष्ट्र – ३३ जागा, गुजरात – ५० जागा, मध्य प्रदेश -२४ जागा)

पात्रता – संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका. स्टायपेंड – रु. ७,५३०/- दरमहा.

(२) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस लॅबोरेटरी असिस्टंट (केमिकल प्लांट) (महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा प्रत्येकी १ पद) (ओएच/एचएच विकलांगांसाठी राखीव) स्टायपेंड – रु. ६,९७०/- दरमहा.

वयोमर्यादा – १८ ते २४ वष्रे (इमाव – २७ वष्रे, अजा/अज – २९वष्रे, विकलांग – ३४/३७/ ३९वष्रे)

प्रशिक्षण कालावधी – १२ महिने. टेक्निशियन अ‍ॅप्रेंटिससाठी आणि १८ महिने ट्रेड अ‍ॅप्रेंटिससाठी.

निवड पद्धती – लेखी परीक्षा (संबंधित विषयावर आधारित) आणि मुलाखत. ऑनलाइन अर्ज http://www.iocl.com/ या संकेतस्थळावर

दि. १ फेब्रुवारी २०१७ ते १३ फेब्रुवारी २०१७ दरम्यान करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities