एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी स्टेट शेडय़ूल्ड बँक) मध्ये कस्टमर सíव्हस रिप्रेझेंटेटिव्ह (सीएसआर) च्या क्लेरिकल ग्रेडमधील ४० पदांची भरती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पात्रता – दि. ३१ मार्च २०१७ रोजी किमान ४५टक्के गुणांसह पदवी.

वयोमर्यादा – ३० वष्रे. निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत.  लेखी परीक्षेचा दिनांक ९ एप्रिल २०१७  फी – रु.६००/-. वेतन – रु. १४,४००/- दरमहा. ऑनलाइन अर्ज www.svcbank.com http://www.svcbank.com/ या संकेतस्थळावर करिअर सेक्शनमधून दि. १६ फेब्रुवारी २०१७ ते ७ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, गाझियाबाद येथे फ्रेशर्स/अनुभवी इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी नोकरीची संधी.

(१) डेप्युटी इंजिनीअर – इलेक्ट्रॉनिक्स (११ पदे), कॉम्प्युटर सायन्स (१ पद), मेकॅनिकल (२ पदे), म्

(२) सिनियर इंजिनीअर – इलेक्ट्रॉनिक्स (८ पदे), मेकॅनिकल (१ पद).

पात्रता – दोन्ही कॅटेगरीसाठी संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी. सिनियर इंजिनीअर पदांसाठी ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – (१) साठी २५ वष्रे, (२) साठी ३२ वष्रे.

ऑनलाइन अर्ज www.bel-india.com http://www.bel-india.com/ या संकेतस्थळावर दि. ८ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

 

काउन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (ह्य़ुमन रिसर्च डेव्हलपमेंट ग्रुप) आणि यूजीसी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) आणि लेक्चररशिप (एल.एस.)पात्रता परीक्षा नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट’ (एनईटी) दि. १८ जून २०१७ रोजी घेतली जाणार.

एनईटी परीक्षा पुढील विषयांसाठी होणार –

(१) केमिकल सायन्सेस,

(२) लाइफ सायन्सेस,

(३) मॅथेमॅटिकल सायन्सेस,

(४) फिजिकल सायन्सेस इ.

पात्रता – एम.एस्सी./ बी.ई./बी.टेक./बी.फार्म./एमबीबीएस किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज/विकलांग – ५0% गुण). २०१६-१७ साठी एम.एस्सी.साठी प्रवेश घेतलेले विद्यार्थी रिझल्ट अवेटेड कॅटेगरीमध्ये प्रवेश परीक्षेस पात्र आहेत.

वयोमर्यादा –

दि. १ जानेवारी २०१७ रोजी जेआरएफसाठी २८ वष्रे (अजा/अज/इमाव -३३ वष्रे) एलएससाठी वयाची अट नाही.

परीक्षा शुल्क – रु. १,०००/- (इमाव – रु. ५००/-, अजा/अज/विकलांग –

रु. २५०/-) नेट परीक्षेचा निकाल सप्टेंबर/ ऑक्टोबर २०१७ मध्ये लागेल.

फेलोशिपसाठी पात्र ठरलेले उमेदवार १ जानेवारी २०१८ पासून दोन वर्षांपर्यंत सीएसआयआर योजनेअंतर्गत फेलोशिपसाठी प्रवेश घेऊ शकतील. ऑनलाइन अर्ज www.csirhrdg.res.in या संकेतस्थळावर दि. १४ मार्च २०१७ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities