अंमलबजावणी अधिकारी/अकाउन्टस् अधिकारीच्या (पूर्वी हे पद निरीक्षक कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणून ओळखले जायचे.) २५७ पदांची कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ्) कार्यालयांत भरती युपीएससी मार्फत होणार आहे. (जाहिरात क्र. ५३/२०१६) (अजा-३०, अज-०६, इमाव-८४, अराखीव-१३७) २१ जागा शारीरिक विकलांगांसाठी राखीव आहेत. वेतन – पे बँड – २ स्केल ९,३००-३४,८०० रुपये, ग्रेड पे ४,६०० रुपये एकूण वेतन ४७,३०७ रुपये प्रतिमाह.* पात्रता – पदवी (कोणत्याही विषयातील).* इष्ट पात्रता – १) कायदा पदवीधर/एमबीए/सीएस/सीए/आयसीडब्ल्युए २) प्रशासन/अकाऊंटस्/लिगल मॅटर्स हाताळण्याचा सरकारी कार्यालयातील अथवा सूचीबद्ध खासगी संघटनांतील कामाचा दोन वर्षांचा अनुभव.* वयोमर्यादा – ३० वष्रे (अजा/अज – ३५ वष्रे, इमाव -३३ वष्रे).* निवड पद्धती – रिक्रुटमेंट टेस्ट (आर्टी) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची दोन तास कालावधीची घेतली जाईल. यातून निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत होईल. अर्ज कसा करावा – ऑनलाईन रिक्रुटमेंट अॅप्लीकेशन कमिशनच्या (ओआरए) http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून २३ जून २०१६ पर्यंत करावा.
अभियांत्रिकी पदवीधर/पदविकाधारक यांना बँक नोट पेपर मिल प्रा.लि., म्हैसूर येथे अॅप्रेंटिसशीप करण्याची संधी. खालील विषयांतील अभियांत्रिकी पदवीधर यांना पदवीधर अॅप्रेंटिसशीप आणि पदविका धारकांसाठी टेक्निशियन अॅप्रेंटिसशीपसाठी प्रत्येकी एकूण ३० जागा पुढीलप्रमाणे (१) मेकॅनिकल इंजिनियिरग (१० जागा), (२) इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियिरग (०६ जागा), (३) इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियिरग (०२ जागा), (४) इन्स्ट्रमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियिरग (०२ जागा), (५) केमिकल इंजिनियिरग/पेपर आणि पेपर पल्प टेक्नॉलॉजी (१० जागा).*अॅप्रेंटिसशीप प्रशिक्षण कालावधी – एक वर्षांचा. प्रशिक्षणा दरम्यान स्टायपेंड प्रतिमाह ४,९८४ रुपये (पदवीधरांसाठी) आणि रु. ३,५४२ रुपये (पदविकाधारकांसाठी) अर्जाचा नमुना आणि प्रशिक्षणाच्या अटी जाणून घेण्यासाठी http://www.bnpmindia.com या संकेत स्थळावर ‘careers’ पेजला भेट द्यावी. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
भारतीय वायूसेनेत फ्लाईंग ब्रांच, टेक्निकल ब्रांच आणि ग्राऊंड डय़ुटी ब्रांचमध्ये (जुल २०१७ पासून सुरू होणाऱ्या) विविध पाठय़क्रमांसाठी प्रवेश. पात्रतेच्या अटी – (१) फ्लाईंग ब्रांचसाठी* शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६० गुणांसह आणि १२ वी भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील पदवी किमान ६० गुणांसह उत्तीर्ण.* वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी २० ते २४ वष्रे.* शारीरिक मापदंड – उंची – १६२.५ सें.मी. आणि त्यानुसार वजन. (२) टेक्निकल ब्रांच – (१) अॅरोनॉटिकल इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स)* शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर इ. विषयांतील अभियांत्रिकी पदवी किमान ६० गुणांसह आणि १२ वीला भौतिकशास्त्र आणि गणित विषयांत किमान ६० गुण * वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी २० ते २६ वष्रे.* शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. आणि संबंधित वजन. (२) अॅरोनॉटिकल इंजिनियर (मेकॅनिकल) -* शैक्षणिक पात्रता – मेकॅनिकल/ अॅरोस्पेस/ अॅरोनॉटिकल/इंडस्ट्रियल इंजिनियिरगमधील अभियांत्रिकी पदवी किमान ६० गुणांसह आणि १२ वी भौतिकशास्त्र/गणित विषयांत किमान ६० गुणांसह उत्तीर्ण. (३) ग्राऊंड डय़ुटी ब्रांचेस -* अॅडमिनिस्ट्रेशन आणि लॉजिस्टिक – पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ६० गुणांसह उत्तीर्ण.* अकाऊंट्स – वाणिज्य पदवी किमान ६० गुणांसह उत्तीर्ण. * शिक्षण – एम्.बी.ए./एम्.सी.ए. किंवा इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, स्टॅटिस्टिक्स, संगणकशास्त्र, आय्.टी. इ. विषयांतील एम्.ए./एम्.एस्सी. पदव्युत्तर पदवी किमान ५० गुणांसह आणि पदवी किमान ६० गुणांसह उत्तीर्ण.* वयोमर्यादा – १ जुल २०१७ रोजी २० ते २६ वष्रे.* शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७.५ सें.मी., महिला – १५२ सें.मी. आणि उंचीनुसार वजन. अंतिम वर्षांला बसणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. निवड पद्धती – पात्र उमेदवारांना एअरफोर्स अॅडमिशन टेस्ट (AFCAT) साठी बोलाविले जाईल आणि इंजिनियरींग नॉलेज टेस्ट (EKT) (फक्त टेक्निकल ब्रँचसाठी) बोलाविले जाईल. फ्लाईंग ब्रँचच्या उमेदवारांना कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टीम आणि पीएबीटीला सामोरे जावे लागेल. प्रशिक्षण कालावधी – फ्लाईंग ब्रँच/टेक्निकल ब्रँचसाठी ७४ आठवडे आणि ग्राऊंड डय़ुटी ब्रँचसाठी ५२ आठवडे.* वेतन प्रतिमाह – ८२०५० रुपये फ्लाईंग ब्रँचसाठी, ७१,५५० रुपये टेक्निकल ब्रँचसाठी आणि ६८,५५० रुपये ग्राऊंड डय़ुटी ब्रँचसाठी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळावर ३० जून पर्यंत करावेत.
अग्निशमन दलामध्ये अग्निशमन अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताक्रुझ, मुंबई – ४०००९८ येथे १ वर्ष कालावधीचा निवासी ‘उपस्थानक अधिकारी आणि अग्निप्रतिबंधक अधिकारी’ पाठय़क्रम. पात्रतेच्या अटी -* पदवी (कोणतीही शाखा) किमान ५० गुणांसह उत्तीर्ण (मागासवर्गीयांसाठी ४५).* वयोमर्यादा – १५ जून २०१६ रोजी १८ ते २५ वष्रे (अजा/अज/वि.जा./भ.ज./वि.मा.प्र. यांचेसाठी १८ ते ३० वष्रे, इमाव – १८-२८ वष्रे).* शारीरिक पात्रता – उंची – १६५ सें.मी., वजन – ५० किलो., छाती – ८१ ते ८६ सें.मी. प्रवेश अर्ज फी – १००० रुपये (अजा/अज/वि.जा./भ.ज./वि.मा.प्र. साठी ५०० रुपये) प्रशिक्षण शुल्क सेवा शुल्क ७२,८०० रुपये, इतर फी – १३,००० रुपये (भोजन खर्च ५००० रुपये प्रतिमाह). प्रवेश क्षमता – ३० ते ४०. ऑनलाईन अर्ज व पाठय़क्रमाची अधिक माहिती http://www.mahafireservice.gov.in किंवा <http://mfs2016.mhpravesh.in/>
महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, विद्यानगरी, हंस भुग्रा मार्ग, सांताव्रुझ, मुंबई – ४०००९८ येथे अग्निशमन दलामध्ये अग्निशामक (फायरमन) होऊ इच्छिणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी ६ महिने कालावधीचा अग्निशामक प्रशिक्षण पाठय़क्रम. पात्रतेच्या अटी – * किमान ५० गुणांसह एसएससी मराठी विषयासह उत्तीर्ण (मागासवर्गीयांसाठी ४५ गुण). * वयोमर्यादा – १५ जून २०१६ रोजी १८ ते २३ वष्रे (अजा/अज/विजा/भज/विमाप्र – १८ ते २८ वष्रे, इमाव – १८ ते २६ वष्रे).* शारीरिक पात्रता – उंची – १६५ सें.मी., वजन – ५० किलो, छाती – ८१ ते ८६ सें.मी. प्रवेश अर्ज फी – ६०० रुपये (अजा/अज/विजा/भज/विमाप्र – ३०० रुपये). प्रशिक्षण शुल्क सेवा शुल्क २६,००० रुपये. इतर फी – ८००० रुपये (भोजन खर्च ५००० रुपये प्रतिमाह). प्रवेश क्षमता – ३० ते ४०. ऑनलाईन अर्ज आणि पाठय़क्रमाची अधिक माहिती http://www.mahafireservice.gov.in किंवा http://mfs2016.mhpravesh.in या संकेत स्थळावर १५ जून २०१६ पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याचा अंतिम १५ ऑगस्ट २०१६.
सुहास पाटील