अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक/ठाणे/अमरावती त्यांच्या कार्यक्षेत्रातील आश्रमशाळा/शासकीय वसतिगृहातील अधीक्षक/गृहपाल या पदांची भरती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

(नाशिक – अधीक्षक (पुरुष) – २२, अधीक्षक (स्त्री) – ११३, गृहपाल (पुरुष) – १०, गृहपाल (स्त्री) – ५, एकूण – १५०) (ठाणे – अधीक्षक (पुरुष) – ३०, अधीक्षक (स्त्री) – ६०, गृहपाल (पुरुष) – ७, गृहपाल (स्त्री) – ५, एकूण – १०२) (अमरावती – अधीक्षक (स्त्री) – १२, गृहपाल (पुरुष) – ६ गृहपाल (स्त्री) – ५, एकूण – २३)

पात्रता – अधीक्षक पदासाठी – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी (बीएसडब्ल्यू)

गृहपाल पदासाठी – समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमएसडब्ल्यू)

वयोमर्यादा – १८ ते ३८ वष्रे (मागासवर्गीय – १८-४३ वष्रे, विकलांग – ४५ वष्रे)

निवड पद्धती – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयांवरील प्रश्नांकरिता एकूण २०० गुणांची लेखी परीक्षा. दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी असेल. परीक्षा शुल्क – रु. ८००/- (राखीव प्रवर्गासाठी रु. ४००/-). ऑनलाइन अर्ज http://maharecruit.mahaonline.gov.in/ वर दि. २४ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

 

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स’ (जनरलिस्ट) (स्केल -१) च्या २०५ पदांची भरती.

(अराखीव – ११३, अजा – ३१, अज – १६, इमाव – ४५ (एकूण ६ विकलांगांसाठी राखीव – एचआय (२ पदे), ओसी (२ पदे), व्हीआय (२ पदे.)

पात्रता – किमान ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (अजा/अजसाठी ५५% गुण)

वयोमर्यादा – २१ ते ३० वष्रे (अजा/अज -३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे)

वेतन – दरमहा रु. ५१,०००/-. ऑनलाइन परीक्षा दि. ३/४ जून २०१७ रोजी.

ऑनलाइन अर्ज http://www.nationalinsuranceindia.com/ या संकेतस्थळावर दि. २० एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

 

भारतीय नौसेनेत एज्युकेशन ब्रांच आणि लॉजिस्टिक्स कॅडरमध्ये एकूण २८ पदांची भरती.

  एज्युकेशन ब्रांच (१४ पदे) पात्रता –

(१) एम्एस्सी फिजिक्स (बीएस्सी गणित विषयासह) (४ पदे)

(२) एमएस्सी मॅथ्स (पदवी फिजिक्स विषयासह) (४ पदे)

(३) एमएस्सी केमिस्ट्री (पदवी फिजिक्स विषयासह) (२ पदे)

(४) एम्ए (इंग्रजी) (२ पदे)

(५) एम्ए (इतिहास) (२ पदे) अविवाहित पुरुष/महिला पात्र.

लॉजिस्टिक्स कॅडर (फक्त पुरुषांसाठी) (१४ पदे) –

पात्रता – बी.ई./बी. टेक (कोणतीही शाखा)

किंवा एम.बी.ए. किंवा बी.एस्सी./बी.कॉम.  फायनान्स/लॉजिस्टिक्स/मटेरियल मॅनेजमेंटमधील पदविका किंवा एमसीए/एमएस्सी/आयटी.

पात्रता परीक्षेस किमान ६०% गुण आवश्यक.

उंची – पुरुष – १५७ सें.मी.,

महिला – १५२ सें.मी.

वेतन – दरमहा रु. ७२,४४४/- ते ८१,७००/-

निवड पद्धती – एसएसबी मुलाखत जून ते ऑगस्ट २०१७ दरम्यान बंगलोर येथे घेतली जाईल. प्रशिक्षणादरम्यान सब लेफ्टनंट रॅकवर नियुक्ती.

तसेच पूर्ण वेतन दिले जाईल.

ऑनलाइन अर्ज  http://www. joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळावर दि. २० एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात माजी सनिकांसाठी आरक्षित असलेल्या ११६ अग्निशामक पदांची वॉक-इन पद्धतीने भरती.

भरतीचे ठिकाण – बृहन्मुंबई महानगरपालिका, बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्र, बोरिवली अग्निशमन केंद्र, डॉन बॉस्को हायस्कूलजवळ, गोराई रोड, मुंबई – ४०० ०९१. अर्जाचा नमुना  http://portal.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पूर्ण भरलेले अर्ज मूळ प्रमाणपत्रांसह भरतीसाठी दि. २४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी १०.००वाजेपर्यंत हजर रहावे.

पात्रता – १०वी उत्तीर्ण  भारतीय सेनेत किमान १५ वष्रे सेवा केल्याबाबत प्रमाणपत्र.

वयोमर्यादा – दि. १ ऑगस्ट २०१६ रोजी २८ वष्रे अधिक सशस्त्र दलातील सेवेइतका कालावधी.

पुरुष – उंची – १७२ सें.मी., छाती – ८१-८६ सें.मी.

महिला – उंची – १६२ सें.मी., वजन – ५० कि.ग्रॅ. उमेदवारांची २२० गुणांची व्यवसाय चाचणी घेण्यात येईल.

मदानी चाचणी (१२० गुण), प्रमाणपत्र चाचणी – १०० गुण.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities in india