राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लिमिटेड (आरसीएफ) कंपनीच्या ट्रॉम्बे व थळ युनिटकरिता बॉयलर ऑपरेटर श्रेणी-३च्या १० पदांची भरती (सामान्य – ७, अजा – १, इमाव – २).

पात्रता – एसएस्सी उत्तीर्ण शासनाकडून देण्यात आलेले द्वितीय वर्गाचे बॉयलर अटेंडंट कॉम्पिटन्सी प्रमाणपत्र किमान २ वर्षे कामाचा अनुभव.

वयोमर्यादा – दि. १ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३० वष्रे (अजा – ३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे).

निवड पद्धती – १०० गुणांची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्न स्वरूपात सामान्य ज्ञान, इंग्रजी, बुद्धिचातुर्य, व्यावहारिक ज्ञान व बॉयलर विषयाचे ज्ञान यावर आधारित असेल.

परीक्षा शुल्क – रु. १००/- (अजा फी माफ). www.rcfltd.com या संकेतस्थळावरून चलान डाऊनलोड करून बँक ऑफ इंडियामध्ये फी भरावी व विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह स्वीकारण्याची अंतिम तारीख ९ जून २०१७ आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे आपल्या देशभरातील आस्थापनांमध्ये पार्ट टाईम सब स्टाफ (१/३ वेतन)च्या एकूण ४५० पदांची भरती करणार आहे.

यातील महाराष्ट्रासाठी एकूण २२१ पदे (अजा – २२, अज – १९, इमाव – ५९, अराखीव – १२१).

पात्रता – १०वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा – १८ ते ३३ वष्रे. विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ मे २०१७ च्या अंकात पाहावी. ऑनलाइन अर्ज www.bankofmaharashtra.co.in या संकेतस्थळावर ५ जून २०१७ पर्यंत करावेत.

कॅनरा बँक पुरस्कृत कॅन फिन होम्स लि. कंपनीमध्ये ज्युनियर मॅनेजमेंट ट्रेनीच्या एकूण ३० पदांची भरती.

पात्रता – पदवी (कोणत्याही शाखेतील)  एमबीए (फायनान्स).

वय – उमेदवाराचा जन्म १ एप्रिल १९९६ ते १ एप्रिल १९८९दरम्यानचा असावा.

ट्रेिनग दरम्यान प्रतिमाह स्टायपेंड रु. २५,०००/-,  रु. ५,०००/- घरभाडेभत्ता मिळेल.

वेतन – रु. ५.९० लाख प्रतिवर्ष. ऑनलाइन अर्ज www.canfinhomes.com या संकेतस्थळावर ६ जून  २०१७ पर्यंत करावेत.