आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आपल्या अहमदनगर येथील व्हेईकल रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट येथे इंजिनीअरिंग विषयांत पीएच.डी. करण्याची सुवर्णसंधी.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग (१३ पदे), इलेक्ट्रॉनिक्स (३ पदे), ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग/संगणक शास्त्र/इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (प्रत्येकी २ पदे)

स्टायपेंड – रु. २५,०००/-  एचआरए भत्ता

पात्रता – प्रथम वर्गातील संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी व्हॅलिड गेट (जीएटीई) स्कोअर.

वयोमर्यादा – दि. ८ एप्रिल २०१७ रोजी २८ वष्रेपर्यंत. (इमाव – ३१ वष्रे, अजा/अज – ३३ वष्रेपर्यंत) विस्तृत जाहिरात आणि अर्जाचा विहित नमुना

दि. १८ मार्च २०१७ रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजच्या अंकात उपलब्ध. विहित नमुन्यातील अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि. ८ एप्रिल २०१७ पर्यंत.

 

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), आरएसी, नवी दिल्ली आपल्या सíव्हस सिलेक्शन बोर्ड/एअर फोर्स सिलेक्शन बोर्डमध्ये मानसशास्त्र (सायकॉलॉजी) विषयातील पदव्युत्तर पदवीधरांसाठी सायंटिस्ट बीच्या १८ पदांची भरती (जनरल – ९, इमाव – ५, अजा – ३, अज – १)

पात्रता – सायकॉलॉजीमधील प्रथम वर्गातील पदव्युत्तर पदवी व्हॅलिड जीएटीई (गेट) स्कोअर. विस्तृत जाहिरात क्र. १२२,

आरएसी संकेतस्थळ  http://rac.gov.in/ वर उपलब्ध. ऑनलाइन अर्ज करण्याचा

अंतिम दि. ७ एप्रिल २०१७ पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील. मुलाखत मे, २०१७च्या शेवटच्या आठवडय़ात होईल.

 

एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक), मुंबई मार्फत मॅनेजर (एमएम-२)

(अज – ३ पदे, इमाव – ३ पदे) आणि डेप्युटी मॅनेजर (जेएम-१) (२ पदे) (अजा -१ पद, विकलांग (एचएच) – १ पद)

पात्रता – कोणत्याही विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए/सीए किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण. अधिक इंटरनॅशनल ट्रेड फायनान्स/ओव्हरसीज प्रोजेक्ट फायनान्स/इंडस्ट्रियल फायनान्समधील कामाचा ३ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा – डेप्युटी मॅनेजर – अजा/अज – ३२ वष्रे, मॅनेजर – अजा/अज – ३५ वष्रे, इमाव – ३३ वष्रे. ऑनलाइन अर्ज www.eximbankindia.in या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities in maharashtra