शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एससीआय)मध्ये ५० ‘इलेक्ट्रिकल ऑफिसर’पदांची भरती.
पात्रता – बी.ई. (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स). किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अजसाठी ५०% गुण). डीजी अप्रूव्हड ४ महिन्यांचा इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर (ईटीओ) कोर्स सर्टििफकेट नसलेले उमेदवारसुद्धा अर्ज करू शकतात.
परीक्षा केंद्र – मुंबई, दिल्ली, चेन्नई, कलकत्ता.
फी – रु. १,०००/- (अजा/अज – रु. ५००/-). ऑनलाइन अर्ज http://www.shipindia.com>career>fleetpersonnelvicepresident (एफपीई) या संकेतस्थळावर २५ जून २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन टेस्ट १ जुल २०१७ रोजी ११.०० वाजता होईल.
पोलीस आयुक्त, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विधि अधिकारीच्या एकूण ४९ पदांची ११ महिने कंत्राटी पद्धतीने भरती.
पात्रता – कायद्याचा पदवीधर. सनदधारक असावा. किमान ५ वर्षांचा वकिली व्यवसायाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा – ३० एप्रिल २०१७ रोजी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. करारातील मासिक देय रक्कम रु. १५,०००/-. उमेदवारांनी प्रत्येक आठवडय़ात किमान ३० तास काम करणे आवश्यक. विहित नमुन्यातील अर्ज क्रॉफर्ड मार्केटसमोर, मुंबई – ४०० ००१ (लक्षवेध साहाय्यक पोलीस आयुक्त, प्रशासन मुंबई) या पत्त्यावर पोहोचतील असे पाठवावेत.
हायकोर्ट ऑफ गुजरात – एकूण १२९ सिव्हिल जजेसची भरती
(रेग्युलर पदे – ९७, अॅडहॉक पदे – ३२).
पात्रता – कायदा पदवीधर. सनदधारक. वकिली व्यवसायाचा अनुभव.
वयोमर्यादा – ३५ वष्रे (मागास – ३८ वष्रे).
अर्जाचे शुल्क – रु. ८००/-
(अजा/अज – रु.४००/-).
पूर्वपरीक्षा – १३ ऑगस्ट २०१७.
मुख्य परीक्षा – १० सप्टेंबर २०१७
मुलाखत.
ऑनलाइन अर्ज www.gujrathighcourt.nic.in वर दि. २२ जून २०१७ पर्यंत करावेत.