स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५५४ स्पेशियल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एसएमई) (बँकिंग) पदांची भरतीस्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५५४ स्पेशियल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (एसएमई) (बँकिंग) पदांची भरती
१) एसएमई (बँकिंग) एमएमजीएस -३ एकूण २७३ पदे (अजा- ४२, अज-२७ इमाव – ९३ जन -१०१) आणि २) एसएमई (बँकिंग) एमएमजीएस -२ (एकूण २८१ पदे – अजा -४४, अज- २४, इमाव -८४, जन- १२८.)
पात्रता – सीए / आयसीडब्ल्यूए/ एसीएस/ एमबीए फायनान्स / फायनान्समधील पदव्युत्तर पदवी. एमएमजीएस-३ साठी किमान ५ वर्षांचा अनुभव आणि एमएमजीएस – २ साठी किमान २ वर्षांचा अनुभव वयोमर्यादा- दि. ३१ मार्च २०१७ रोजी एमएमजीएस – ३ साठी २५ ते ४०
एमएमजीएस-२ साठी २४ ते ३५ वष्रे (उच्चतम वयोमर्यादा इमाव ३ वष्रे अजा/अज – ५वष्रे शिथिल.) निवड पद्धती ऑनलाइन ऑबजेक्टिव्ह टेस्ट कालावधी २ तास + मुलाखत.
ऑनलाइन अर्ज https://www.sbi.co.in/
या संकेतस्थळावर दि. १८ मे २०१७ पर्यंत करावेत. परीक्षेचा दिनांक १८ जून २०१७.
भारतीय सन्यदल – आर्मी एज्युकेशनल कॉरप्समध्ये हवालदार (एज्युकेशन) पदांची भरती
१)सायन्स स्ट्रीम- फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, बॉटनी, झूऑलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक शास्त्र या विषयांतील पदवी.
२) आर्ट्स स्ट्रीम, इंग्रजी, िहदी, उर्दू, हिस्टरी, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, मॅथ्स, सोशऑलॉजी विषयातील पदवी. बी.एड. पदवी असलीच पाहिजे अशी अट नाही.
शारीरिक मापदंड – उंची १६२ सेंमी. छाती-७७ सेंमी. वजन -५० किलो.
वयोमर्यादा – दि. १ ऑक्टो. २०१७ रोजी २० ते २५ वष्रे.
निवड पद्धती –
१) शारीरिक क्षमता चाचणी (पीएफटी) फक्त पात्रता फेरी – १.६ कि.मी. धावणे, पुल अप्स (बीम), बॅलन्स, ९ फूट खड्डा पार करणे. २) लेखी परीक्षा – दि. २९ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतली जाईल. पेपर – १ सामान्य जात आणि इंग्रजी पेपर -२(सायन्स स्ट्रीम) पेपर -३ (आर्ट्स स्ट्रीम) प्रत्येकी ५० गुणांसाठी ५० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न. प्रत्येक चुकीच्या उत्तरास ०.२५ गुण वजा केले जातील.
३) टिचिंग अॅबिलिटी टेस्ट आणि मुलाखत. ट्रेिनग कालावधी १ वर्ष.ऑनलाइन अर्ज www.joinndianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. ३० मे २०१७ पर्यंत करावेत.
भारत सरकार, गृहमंत्रालय, डायरेक्टोरेट जनरल, सशस्त्र सीमा बलामध्ये कॉन्स्टेबल (जीडी) पदांची स्पोर्ट्स कोटय़ातून भरती
(फुटबॉल, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, कबड्डी, हॉकी इ.)
पात्रता – १० वी उत्तीर्ण + आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चमूत सहभाग किंवा राष्ट्रीय स्तरावरील खेळातील मेडल (दि. १४ एप्रिल १६ ते ३१ मार्च १७ दरम्यान प्राप्त केलेले पुरस्कार (मेडल) धारक पात्र आहेत.
वयोमर्यादा- १८ ते २८ वष्रे (इमाव ३१वष्रे अजा/अज ३३ वष्रे.
शारीरिक मापदंड
उंची पुरुष -१७० सेंमी. (अज- १६२.५ सेंमी.) (मराठा उमेदवार १६५ सेंमी )
महिला १५७ सेंमी (अज-१५० सेंमी, (मराठा उमेदवार १५५ सेंमी)
पुरुष छाती – (८० ते ८५ सेंमी) (अज- ७६ ते ८१ सेंमी ) (मराठा उमेदवार ७८ ते ८३सेंमी)
परीक्षा शुल्क रु. १००/- (इंडियन पोस्टल ऑर्डर) (महिला /अजा/अज उमेदववारांना फी माफ आहे.
विस्तृत जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दिनांक ६ मे २०१७ च्या अंकात (पान क्र. १७ ते २० वर) पहावी. जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातील पूर्ण भरलेले अर्ज पुढील पत्त्यावर दि. ५जून २०१७पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
“The Assistant Director (sports) Force Hqrs, Sashastra Seema Bal (SSB), East Block, RK Puram, New Delhi – 110066”
संकेतस्थळ www.ssbrectt.gov.in