नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लि. श्रीगंगानगर, राजस्थानमध्ये एकूण ५८ ट्रेनी पदांची भरती.
(१) सिनियर ट्रेनी (मार्केटिंग – २ पदे)/क्वलिटी कंट्रोल (२ पदे)/हॉर्टकिल्चर (१ पद).
पात्रता – एमबीए/एमएस्सी (अॅग्रि.)
किमान ५५ % गुणांसह उत्तीर्ण.
(२) डिप्लोमा ट्रेनी (अॅग्रो इंजिनीअरिंग).
पात्रता – संबंधित पदविका किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण. (३) ट्रेनी एचआर (४ पदे).
पात्रता -५५% गुणांसह पदवी ट्रेनी अॅग्रिकल्चर (२७ पदे).
पात्रता – बी.एस्सी. (अॅग्रि.) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
ट्रेनी (डीईओ) (२ पदे).
पात्रता – बीसीए/बी.एससी. कॉम्प्युटर सायन्स/आयटी किंवा कोणतीही पदवी १ वर्षांची कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील पदविका.
ट्रेनी (टेक्निशियन) (१५ पदे) (इलेक्ट्रिशियन/वेल्डर/डिझेल मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक/मशीनमॅन).
पात्रता – एनसीव्हीटी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
ट्रेनी स्टोअर्स – संबंधित पदविका (मेकॅनिकल/अॅग्रिकल्चर इंजिनीअरिंग इ. किंवा बी.एससी. (अॅग्रि.)) किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण.
वयोमर्यादा – सर्व पदांसाठी २७ वष्रे.
(इमाव – ३० वष्रे, अजा/अज – ३२ वष्रे) ऑनलाइन अर्ज http://www.indiaseeds.com/ वर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.
सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, पुणे येथे वैज्ञानिक (१५ पदे) आणि वरिष्ठ वैज्ञानिक (१० पदे) पदांची भरती
विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या एमई/एमटेक/पीएचडी उमेदवारांना संधी.
वयोमर्यादा – (दि. १० एप्रिल २०१७ रोजी) ३२ वष्रे. (वैज्ञानिक पदासाठी) आणि ३७ वष्रे (वरिष्ठ वैज्ञानिक पदासाठी).
वेतन – दरमहा रु. ७५,५४१/- (वैज्ञानिक), रु. ८६,६४४/- (वरिष्ठ वैज्ञानिक)
ऑनलाइन अर्ज http://recruit.ncl.res.in/ या संकेतस्थळावर दि. १० एप्रिल २०१७ पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट स्वीकारण्याची अंतिम तारीख ३ मे २०१७.
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कलकत्ता येथे ७ ‘अॅक्च्युरियल अॅप्रेंटिस’ पदांची भरती.
पात्रता – किमान ६०% गुणांसह पदवी
(कोणतीही शाखा) (अजा/अज – ५५% गुण). अधिक इन्स्टिटय़ूट ऑफ अॅक्च्युअरीज ऑफ इंडिया किंवा इन्स्टिटय़ूट अँड फॅकल्टी ऑफ अॅक्च्युअरीज लंडन यांचे किमान ५ अॅक्च्युअरियल पेपर उत्तीर्ण.
वयोमर्यादा – २१ ते २७ वष्रे (इमाव – ३०, अजा/अज – ३२ वष्रे). स्टायपेंड – दरमहा रु. २५,०००/- (पहिले वर्ष), रु. ३०,०००/-
(दुसरे वर्ष). विस्तृत माहिती http://www.nationalinsuranceindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०१७.
सीएसआयआर- स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग रिसर्च सेंटर, चेन्नई येथे वैज्ञानिक आणि वरिष्ठ वैज्ञानिकांच्या एकूण ११ पदांची भरती.
पात्रता – एमई/एमटेक. (स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग/अप्लाइड मेकॅनिक्स/ एअरोस्पेस इंजिनीअरिंग/डिझाइन इंजिनीअरिंग) वरिष्ठ वैज्ञानिकांसाठी २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – वैज्ञानिकांसाठी ३२ वष्रे, वरिष्ठ वैज्ञानिकांसाठी ३७ वष्रे. पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील.
वेतन – वैज्ञानिक – रु. ७५,५११/- वरिष्ठ वैज्ञानिक – रु. ८४,७१४/-
परीक्षा शुल्क – रु. ५००/-. ऑनलाइन अर्ज http://serc.res.in/ या संकेतस्थळावर दि. ३ मे २०१७ पर्यंत करावेत.
आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन अर्जाची िपट्रआउट स्वीकारण्याचा अंतिम दि. १५ मे २०१७ आहे.
कृषी वैज्ञानिक निवड मंडळ (अॅग्रिकल्चरल सायंटिस्ट रिक्रूटमेंट बोर्ड (एएसआरबी), नवी दिल्ली, अॅग्रिकल्चरल रिसर्च सíव्हस (एआरएस) –
परीक्षा-२०१६ आणि सोबत नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एनईटी-१) – २०१७ घेणार.
यातून अ) कृषी संशोधनातील १८० वैज्ञानिकांच्या पदांसाठी निवड आणि ब) कृषी विद्यापीठात लेक्चरर/साहाय्यक प्रोफेसरच्या पदांसाठी निवड करणार.
पात्रता – दिनांक ८ जुल २०१७ रोजी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण.
वयोमर्यादा – एआरएससाठी २१ ते ३२ वष्रे. एनईटीसाठी किमान २१ वष्रे कमाल मर्यादा नाही. पूर्वपरीक्षा ऑनलाइन पद्धतीने दि. १६ मे ते २१ मे २०१७ दरम्यान होईल. मुख्य परीक्षा दि. ८ जुल २०१७ रोजी होईल.
परीक्षा शुल्क – दोन्ही परीक्षांसाठी रु. १,५००/- (इमाव – रु. १,०००/-, अजा/ अज – रु. २५०). ऑनलाइन अर्ज http://www.asrb.org.in/ आणि http://www.icar.org.in/ या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.