*   मुंबई विद्यापीठाच्या वतीने प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण अकादमीमार्फत एमपीएससी /यूपीएससी स्पर्धा परीक्षांना बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पदवी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या वर्गात सहभागी होता येईल.

प्रवेश परीक्षा अर्ज दि. १० मे २०१७ पर्यंत

स्वीकारले जातील.

संपर्क – जे.पी. नाईक भवन, पहिला मजला, रु. नं. ४, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – ४०० ०९८. दूरध्वनी क्र. ०२२-२६५४३५४७, २६५३०२०८.

* इंडिया गव्हर्नमेंट मिंट, हैद्राबादमध्ये सुपरवायजर (९ पदे) आणि ज्युनियर ऑफिस असिस्टंट (५१ पदे) या पदांची भरती.

पात्रता – (१) सुपरवायजर – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेटॅलर्जी/सिव्हिलमधील प्रथम वर्गातील अभियांत्रिकी पदविका. पदवीधारकांना प्राधान्य. वय -१८-३० वष्रे.

(२) ज्युनियर ऑफिस असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण  टायिपग स्पीड इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा हिंदी ३० श.प्र.मि. वय – १८-२८ वष्रे.

ऑनलाइन अर्ज  http://igmhyderabad.spmcil.com/ वर दि. २८ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

*   भारतीय नौदलात ‘नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर’मध्ये ‘अधिकारी’ (सब लेफ्टनंट) होण्याची संधी.

एकूण रिक्त पदे – ८. पात्रता मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/

इन्स्ट्रमेंटेशन/आयटी/केमिकल/मेटॅलर्जी/एअरोस्पेस इंजिनीअरिंग पदवी किमान सरासरी ६०% गुणांसह उत्तीर्ण. (पदवीच्या अंतिम वर्षांला असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.) पुरुष/महिला पात्र आहेत.

शारीरिक मापदंड – उंची – पुरुष – १५७ सें.मी., महिला -१५२ – सें.मी.

वेतन – दरमहा सीटीसी – रु. ७२,४४४/-.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील गुणवत्तेनुसार एस्एसबी मुलाखतीस सामोरे जावे लागेल. ऑनलाइन अर्ज http://www.joinindiannavy.gov.in  वर दि. २७ एप्रिल २०१७ पर्यंत करावेत.

*   इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (अभिमत विद्यापीठ)मध्ये दोन वर्ष कालावधीच्या एमए/ एमएससी इ. कोस्रेससाठी प्रवेश सूचना २०१७-१९

(१) एमए/एमएससी (पॉप्युलेशन स्टडीज्)

पात्रता – सोशल सायन्सेस/गणित/सांख्यिकी या विषयांतील पदवी.

(२) एमएससी (बायोस्टॅटिस्टिक्स आणि डेमोग्राफी) पात्रता – गणित/ सांख्यिकी विषयातील पदवी.

(३) मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज.

पात्रता – गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र, सायकॉलॉजी, सोशिओलॉजी, सोशल वर्क, जीओग्राफी, अँथ्रोपोलॉजी विषयांतील पदव्युत्तर पदवी.

(४) मास्टर ऑफ फिलॉसॉफी (पॉप्युलेशन स्टडीज). पात्रता – मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज/एमए/एमएस्सी- डेमोग्राफी/बायो-स्टॅटिस्टिक्स आणि इपीडेमिनॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी.

(५) मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज (डिस्टन्स लìनग). पात्रता – सोशल सायन्स/ गणित/सांख्यिकी इ. विषयांतील पदव्युत्तर पदवी.

१ ते ४ कोर्ससाठी पात्रता परीक्षेत किमान ५५% गुण आवश्यक.

वयोमर्यादा – कोर्स क्र. १ व २ साठी २५वष्रे.

कोर्स क्र. ३ साठी २८ वष्रे. कोर्स क्र. ४ व ५ साठी ३० वष्रे. कोर्स क्र. १ ते ४ साठी प्रत्येकी ५० जागा

आणि कोर्स क्र. ५ साठी १५० जागा.

भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी फी आकारली जाते. सार्क (एसएएआरसी) देशांतील उमेदवारांना टय़ूशन फीमध्ये ५०% सवलत दिली जाते. प्रत्येक भारतीय उमेदवाराला दरमहा रु. ५,०००/- फेलोशिप दिली जाते. ऑनलाइन अ‍ॅडमिशन टेस्ट दि. ७ जून २०१७ रोजी घेतली जाईल. ऑनलाइन रजिस्ट्रेशन http://www.iipsindia.org वर दि. १ मे २०१७पर्यंत करावे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunity in india job vacancies in india