* भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इस्रो), राष्ट्रीय सदूर संवेदन केंद्र (एनआरएससी), बालानगर, हैद्राबाद येथे टेक्निशियन ड्राफ्ट्समन, टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट (एकूण ७४) पदांची भरती.
(१) टेक्निशियन-बी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (२२ पदे)/इलेक्ट्रिशियन (१४ पदे)/फिटर
(२ पदे)/इन्स्ट्रमेंट मेकॅनिक (४ पदे)/मशिनिस्ट (६ पदे)/मोटर मेकॅनिक (२ पदे)/प्लंबर
(१ पद)/रेफ्रि. अँड ए.सी. (४ पदे)/लॅब असि. केमिकल (१ पद).
(२) ड्राफ्ट्समन-बी (सिव्हिल) (६ पदे). पात्रता – १०वी उत्तीर्ण संबंधित ट्रेडमधील आयटीआय /एनटीसी/एनएसी उत्तीर्ण.
(३) टेक्निकल असिस्टंट – २ पदे (पहिल्या वर्गातील सिव्हिल इंजि./इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजि.मधील पदविका.)
(४) सायंटिफिक असिस्टंट – बी.एससी. (केमिस्ट्री) (२ पदे), बी.एससी. (मॅथ्स), स्टॅट्स/कॉम्प्युटर सायन्स (५ पदे); बी.एस्सी. (मॅथ्स/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स) (३ पदे) (सायंटिफिक असिस्टंटसाठी बी.एस्सी. प्रथम वर्गातील उत्तीर्ण असणे आवश्यक).
मूळ पगार आणि वेतन लेव्हल –
(१) टेक्निकल असिस्टंट आणि सायंटिफिक असिस्टंट – रु. ४४,९०० – लेव्हल ७.
(२) टेक्निशियन-बी – रु. २१,७०० – लेव्हल ३.
वयोमर्यादा – दि. १० जून २०१७ रोजी १८ ते ३५ वष्रे (इमाव – ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे). ऑनलाइन अर्ज http://www.nrsc.gov.in <http://www.nrsc.gov.in/> या संकेतस्थळावर दि. १० जून २०१७ (२३.५९) पर्यंत करावेत.
* नॅशनल फर्टलिायझर्स लिमिटेड, नॉयडा देशभरातील कार्यालयांमध्ये एकूण १५ लेखा अधिकारी पदांची भरती. (यूआर – ८, इमाव – ४, अजा – २, अज – १).
पात्रता – सीए/सीएमए किंवा एमबीए (फायनान्स) किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.
उमेदवारांकडे किमान एक वर्ष संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ३१ मे २०१७ रोजी ४५ वष्रेपर्यंत.
परीक्षा शुल्क – रु. ७००/-. ऑनलाइन अर्ज http://www.nationalfertilizers.com <http://www.nationalfertilizers.com/> या संकेतस्थळावर दि. ७ जून २०१७ पर्यंत करावेत
* भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मुंबई रिफायनरीमध्ये टेक्निशियन अप्रेंटिसच्या (डिप्लोमा) एकूण ८५ पदांची भरती.
पात्रता – केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रमेंटेशन, फायर अँड सेफ्टी, मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी आणि सिव्हील या विषयांतील अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. (अजा/अज – किमान ५०% गुण)
निवड पद्धती – जून-जुलमध्ये ट्रेड टेस्ट घेण्यात येईल वैद्यकीय तपासणी. प्रति महिना स्टायपेंड रु. १५,०००/- विहित नमुन्यातील अर्ज (लोकसत्ताच्या दि. १८ मे २०१७ च्या अंकात नमुना दिला आहे.) ‘डीजीएम (अॅडमिन/टी अँड डी) एमआर, बीपीसीएल, मुंबई रिफायनरी, माहूल, मुंबई – ४०००७४’ या पत्त्यावर दि. १० जून २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.