कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाइन अँड ट्रेड मार्क्स (भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय) मुंबई कार्यालयासाठी ‘एक्झामिनर ऑफ ट्रेड मार्क्स’ च्या ३२ पदांची करार पद्धतीने दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत भरती.
एकत्रित वेतन रु. ३५,०००/- दिले जाईल.
पात्रता – कायदा विषयातील पदवी २ वर्षांचा वकिलीचा अनुभव.
निवड – मुलाखतीतील कामगिरीनुसार मुलाखत दि. १५/१६ जून २०१७ रोजी होईल.
वयोमर्यादा- ३५वष्रे (इमाव- ३८ वष्रे, अजा/अज – ४० वष्रे). विहित नमुन्यातील अर्ज ट्रेड मार्क रजिस्ट्री, बौद्धिक संपदा भवन, एस्एम रोड, अँटॉप हिल, मुंबई-४०० ०३७ येथे
दि. २६ मे २०१७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (‘सीबीआय’)मध्ये एक वर्षांच्या करार पद्धतीने निवृत्त किंवा सेवेत असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर पदावरील व्यक्तींची इन्स्पेक्टर म्हणून सीबीआयमध्ये भरती.
पात्रता- पदवी. १० वर्षांचा पोलीस दलातील कामाचा अनुभव.
एकत्रित वेतन- रु.४०,०००/- दरमहा. अर्जाचा विहित नमुना http://www.cbi.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ मे २०१७
इंडियन रेअर अर्थस् लि. (भारत सरकारचा उपक्रम – अॅटॉमिक एनर्जी खाते) आपल्या मुंबई आणि इतर युनिट्ससाठी ‘मॅनेजमेंट ट्रेनिज’ (टेक्निकल-१२ पदे) / (फायनान्स -४ पदे) (एचआरएम -४ पदे) अशा एकूण २० पदांची भरती.
पात्रता : एमटी (टेक्निकल)साठी मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन इ. मधील अभियांत्रिकी पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण. फायनान्ससाठी सीए/सीएमए; एचआरएमसाठी एमबीए/एमएसडब्ल्यू किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण.
वयोमर्यादा : ३१ मार्च २०१७ रोजी २८ वष्रेपर्यंत. १ वर्षांच्या प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड रु. १६,४००/- इतर भत्ते.
परीक्षा शुल्क : रु.२५०/-
(अजा/अज/इमाव/महिला यांना फी माफ).
ऑनलाइन अर्ज <http://www.irel.co.in/> या संकेतस्थळावर दि. १८ मे २०१७ (२४.००) पर्यंत करावेत. दि. ३१ मे २०१७ पर्यंत अर्जाची पिंट्रआऊट आवश्यक त्या कागदपत्रांसह पोस्ट बॉक्स नं. ३०७६, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर पाठवावी.