कलाम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी, विशाखापट्टणम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com
आंध्रप्रदेश राज्यामधील विशाखापट्टणमजवळ असलेल्या पेडगंटायदा नावाच्या खेडय़ामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती,लोकप्रिय शास्त्रज्ञ आणि मिसाईल मॅन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्राला भरीव योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ कलाम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी नावाची एक संशोधन संस्था स्थापन केली गेली आहे. केआयएचटी या नावाने ओळखली जाणारी ही संस्था देशातील पहिली आणि एकमेव वैद्यकीय तंत्रज्ञान संशोधन संस्था आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.
संशोधन संस्थेविषयी
कलाम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी ही संस्था वैद्यकीय उपकरणांशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संस्थेची स्थापना गेल्या वर्षी म्हणजे जुलै २०१७मध्ये करण्यात आली. संस्थेची स्थापना भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमांतर्गत झाली. केआयएचटी ही एक स्वायत्त शासकीय संशोधन संस्था आहे. संस्थेला स्वायत्त दर्जा असल्यामुळे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या दर्जाचे शैक्षणिक केंद्रदेखील आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही. मात्र संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य प्रयोगशाळा निश्चितच आहे. वैद्यकीय व वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित असलेल्या विविध संशोधन आणि विकाससंस्था, उद्योग, धोरणकत्रे आणि महाविद्यालयीन वा विद्यापीठीय विभाग या सर्वाच्या मदतीने वैद्यकीय उपकरणांशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या घटकांवर संशोधन करणे या हेतूने कलाम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी (केआयएचटी) या संशोधन संस्थेची स्थापना झाली आहे. भारतासारख्या विकसनशील देशातील नागरिकांना अल्प दरांमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय उपकरण निर्मिती व आरोग्य उत्पादनांमध्ये वाढ होणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच केआयएचटी या क्षेत्रातील संशोधनासाठी वचनबद्ध असून ती वैद्यकीय उपकरण संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती वा संस्थांकडील तांत्रिक ज्ञानाच्या हस्तांतरणाद्वारे आणि वैज्ञानिक सुविधांचे सहकार्य घेऊन संस्था आपले संशोधन करू पाहत आहे.
संशोधनातील योगदान
केआयएचटी ही संस्था वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये संशोधन करणारी एक महत्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. संस्थेचे या विद्याशाखेतील भावी संशोधन भारतातील वैद्यकीय उपकरणे व वैद्यकीय तंत्रज्ञान या क्षेत्रातील उद्योगांना निश्चितच उभारी देणारे आहे. केआयएचटी सध्या आंध्रप्रदेश मेड टेक झोन लिमिटेड (एएमटीझेड) या भारतामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान उद्योगामध्ये अग्रेसर असलेल्या आंध्रप्रदेश सरकारच्या कंपनीला संशोधनासाठी सहकार्य करत आहे. संस्थेमध्ये रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, हेल्थ टेक्नॉलॉजी अॅसेसमेंट, मार्केट इंटेलिजन्स अॅण्ड ट्रेड या नावाने प्रमुख चार विभाग कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी संधी
केआयएचटी ही संशोधन संस्था एक स्वायत्त शैक्षणिक केंद्र आहे. वैद्यकीय तंत्रज्ञान व उपकरणांच्या संशोधनातून या क्षेत्रातील उद्योगांच्या समस्यांचे निराकरण व्हावे या हेतूने संस्थेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनाची संधी दिलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केआयएचटीकडून जानेवारी २०१९मध्ये एचटीए (हेल्थ टेक्नॉलॉजी अॅसेसमेंट) फेलोशिप बहाल केली जाणार आहे. संशोधक विद्यार्थी संशोधनासाठी इथे येऊ शकतात. संस्था आजसुद्धा देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील जोआन ब्रिग्स इन्स्टिटय़ूट व युनिव्हर्सिटी ऑफ अॅडलेडबरोबर संशोधन सहकार्याचा करार केलेला आहे.
संपर्क
कलाम इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजी, विशाखापट्टणम,
C/o एम टी झेड प्रशासकीय कार्यालय भवन,
ए एम टी झेड कॅम्पस, प्रगती मदानाजवळ ,
विझाग स्टील प्लँट, एस. नं.४८०/२, नादुपुरू, विशाखापट्टणम, आंध्रप्रदेश -५३००३२
दूरध्वनी +९१-८८८५०९२१२२
ईमेल – info@kint.in
संकेतस्थळ – https://kiht.in/