समाजजीवन सुरळीत चालवण्यासाठी कायदा आवश्यक आहेच. त्यामुळे कायद्याचे बोलायलाच हवे. विधीविषयक अभ्यासक्रम करून करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्याविषयी अधिक माहिती आणि परीक्षांबद्दल आजच्या लेखातून माहिती घेऊ. विधी शाखेतील बीए – एलएलबी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुढील काही परीक्षा घेतल्या जातात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट
विधी शिक्षण देणारी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ही संस्था देशातील आघाडीची आहे. या संस्थेत बीए-एलएलबी (ऑनर्स) हा पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम करता येतो. ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट (A ILET) या चाळणी परीक्षेद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
अर्हता
कोणत्याही शाखेतील बारावी परीक्षेत ५०% गुण. या परीक्षेद्वारे ७० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यंदा बारावीची परीक्षा दिलेले उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. संस्थेतील १५% जागा अनुसूचित जाती, ७.५% जागा अनुसूचित जमाती आणि ५% जागा दिव्यांगांसाठी राखीव आहेत.
अशी असते परीक्षा
या परीक्षेचा कालावधी दीड तास असतो. प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, लीगल अॅप्टिटय़ूड, रिझनिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवर प्रत्येकी ३५ गुणांचे प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानाच्या घटकामध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयांवरील प्रश्न विचारले जातात. अंकगणितावर १० गुणांचे प्रश्न विचारले जातील.
या परीक्षेत प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होण्यास खुल्या संवर्गातील उमेदवारांना किमान ४०% आणि अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांना किमान ३०% गुण मिळणे आवश्यक असते. किमान गुण मिळवणारे पुरेसे उमेदवार मिळाले नाहीत तर जागा रिकाम्या ठेवल्या जातात. जर दोन उमेदवारांना समान गुण मिळाले तर त्यांचे गुणवत्ता यादीतील क्रमांक हे दोघांना मिळालेल्या बारावीच्या गुणांवर निर्धारित केले जातात. बारावीतील गुणही समान असतील तर मग दहावीचे गुण ग्राह्य़ धरले जातात. ही परीक्षा मुंबई, नागपूर, भोपाळ, अहमदाबाद, हैदराबाद, अमृतसर, बेंगळूरु, दिल्ली, गांधीनगर, पाटणा, रायपूर, वाराणसी, गुवाहाटी, कोलकता येथे ६ मे २०१८ रोजी घेतली जाणार आहे.
एलएलएम आणि पीएचडी
ऑल इंडिया लॉ एन्ट्रन्स टेस्ट (AILET) या चाळणी परीक्षेद्वारे एलएलएम आणि पीएचडी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जातो.
एलएलएम आणि पीएचडीसाठी अर्हता- ५५% गुणांसह एलएलबी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग संवर्गासाठी- ५०% ) यंदा एलएलबीच्या अंतिम वर्षांला असलेले विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात.
या परीक्षेद्वारे ३५ विद्यार्थ्यांना एक वर्ष कालावधीच्या एलएलएम या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. पत्ता- द रजिस्ट्रार, नॅशनल लॉ स्कूल ऑफ दिल्ली, सेक्टर – १४, द्वारका, न्यू दिल्ली- ११००७८, दूरध्वनी- ०११- २२८३४९९३ संकेतस्थळ – www.nludelhi.ac.in/ आणि www.nludelhi.admissionhelp.com
ई-मेल -info@nuldelhi.ac.in
एमएच – सीईटी – लॉ
महाराष्ट्रातील पाच वर्षे कालावधीच्या बीए – एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनामार्फत एमएच-सीईटी- लॉ ही परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा २२ एप्रिल २०१८ रोजी होणार आहे.
अशी असते परीक्षा
या परीक्षेत इंग्रजी या विषयाच्या विभागात शब्दार्थ, वाक्प्रचार, वाक्यात उपयोग, शब्द पर्याय, वाक्यात सुधारणा, रिकाम्या जागा भरा, इंग्रजी लिखाणातील सर्वसामान्य चुका-विराम, स्वल्पविराम, अयोग्य शब्दांचा उपयोग, शब्दातील चुका, वाचनकौशल्य आणि कार्यकारण व तार्क क्षमता तपासण्यासाठी किमान दोन उताऱ्यांचे आकलन व त्यावरील प्रश्न विचारले जातात.
विधीविषयक कल या विभागात संबंधित उमदेवाराचा या ज्ञानशाखेकडे असणारा रस आणि कल, संशोधनाची वृत्ती आणि समस्या सोडवणुकीचे कौशल्य याची चाचपणी केली जाते. त्यासाठी काही काल्पनिक घटना वा प्रसंग प्रश्नपत्रिकेत दिले जातात. ते सत्य असल्याचे समजून उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतात. सामान्य ज्ञान या भागात इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र आणि मागील एक वर्षांतील चालू घडामोडींवर आधारित हे प्रश्न असतात. याद्वारे जागतिक व देशस्तरीय ताज्या घडामोडींबद्दल उमेदवारांची सजगता तपासली जाते. तार्किक क्षमता या विभागात तार्किकरीत्या विचार करण्याच्या उमेदवारांच्या कौशल्याची तपासणी केली जाते. मूलभूत गणित या विभागातील प्रश्न हे दहावी व बारावीतील गणितावर आधारित असतात. विशेषत: नफा, तोटा, गती, अंतर, काळ, काम, सरासरी इत्यादी घटकांवर प्रश्न विचारले जातात.
या परीक्षेत पुढीलप्रमाणे गुणांची विभागणी असते- (लीगल रिझनिंग) तार्किक विश्लेषण – ४० गुण, सामान्य ज्ञान – ४० गुण, अनॅलिटिकल रिझनिंग- ४० गुण, इंग्रजी- ४० गुण, गणितीय कौशल्य १० गुण असे १५० गुण असतात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी एक गुण दिला जातो. नकारात्मक गुणपद्धती नाही.
पेपरचा कालावधी दोन तास. पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये असतो.
सीईटी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. तथापि दोन उमेदवारांना समान गुण मिळाल्यास पुढील क्रमाने त्यांचा गुणानुक्रम ठरवला जातो. बारावीतील एकूण गुण – बारावीतील प्रथम भाषेमध्ये मिळालेले गुण – दहावीमध्ये मिळालेले गुण – दहावीमध्ये इंग्रजी भाषेमध्ये मिळालेले गुण, या क्रमाने विचार केला जातो.
या परीक्षेद्वारे राज्यातील आणि १५३ विधी महाविद्यालयातील बीए एलएलबी अभ्यासक्रमाच्या १० हजारांच्या आसपास जागा भरल्या जातात. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने राज्यातील ५३ केंद्रांवर घेण्यात येते.
संकेतस्थळ – www.mahacet.org
ईमेल- maharashtra.cetcell@gmail.com , law.dhepune@nic.in
दूरध्वनी- ०२२-२६४७३७१९