हार्वर्डसारख्या ठिकाणी शिकायला कोणाला आवडणार नाही? त्यातच तिथे पदव्युत्तर पदवी घेण्याची संधी असेल तर उत्तमच. अशाच एका संधीची ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हार्वर्ड विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमासाठी बुस्तानी फाउंडेशनकडून हुशार आणि नेतृत्वगुण असलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांना दर दोन वर्षांतून एकदा शिष्यवृत्ती दिली जाते. या वेळी एमबीएसाठी दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी आंतरराष्ट्रीय पदवीधर अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

शिष्यवृत्तीविषयी..

जगभरातल्या विद्यापीठांच्या व्यवस्थापन विभागांमधील सर्वोत्तम अशी ओळख असलेल्या अमेरिकेतील हार्वर्ड बिझनेस स्कूलची ख्याती सर्वत्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्या पाच व्यवस्थापन विद्यापीठ/विभागांमध्ये येणारा आणि अमेरिकेत तर गेली कितीतरी वर्षे पहिल्या क्रमांकाचा व्यवस्थापन विभाग म्हणून मिरवणारे हार्वर्ड बिझनेस स्कूल. एमबीएसाठी इथे प्रवेश मिळवणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्याला कारणेही तशीच आहेत. जागतिक दर्जाचा अध्यापक वर्ग, उद्योग-व्यवस्थापनातील अद्ययावत तंत्रांची इथल्या अभ्यासक्रमांना असलेली थेट जोड, सुट्टय़ांमध्ये उद्योग उभा करण्याचा मिळणारा प्रत्यक्ष अनुभव व त्यातून मिळणारी उद्योजकीय कौशल्ये, आंतरराष्ट्रीय वातावरणात वावरताना आवश्यक असलेल्या सॉफ्ट स्किल्सचे मिळणारे प्रशिक्षण इत्यादी सर्व गोष्टींमुळे हार्वर्ड विद्यापीठात शिकणे, हे प्रत्येक अमेरिकी विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. जगातील अनेक विद्यार्थ्यांच्याही पसंतीक्रमामध्ये म्हणूनच हार्वर्डचे स्थान वरचे असते. बिझनेस स्कूलच्या वतीने पदवी, पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रम राबवण्यात येतात. विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांपैकी एमबीएसाठी जगभरातल्या विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. म्हणूनच त्यातील विविध अभ्यासक्रमांपैकी एमबीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बुस्तानी फाउंडेशनकडून शिष्यवृत्ती दिली जाते. स्वित्र्झलड व मोनॅकोमध्ये कार्यरत असलेल्या या फाउंडेशनची स्थापना अगदी अलीकडे म्हणजे २००६ मध्ये झालेली आहे. हार्वर्डमधील पूर्णवेळ एमबीएचा कालावधी दोन वर्षांचा असल्याने संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा कालावधीदेखील दोन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षांतील संशोधन गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षांची शिष्यवृत्ती अवलंबून असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला एमबीए अभ्यासक्रमाचे संपूर्ण म्हणजे वार्षिक ४५,००० यूएस डॉलर्स शिक्षण शुल्क देण्यात येईल. फाउंडेशनकडून याव्यतिरिक्त त्याला इतर विमानप्रवास, निवास व मासिक वेतन या स्वरूपात आर्थिक मदत केली जाईल.  शिष्यवृत्तीसाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला ही शिष्यवृत्ती इतर कुणालाही हस्तांतरित करता येणार नाही.

अर्ज प्रक्रिया या शिष्यवृत्तीसाठी

अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून संस्थेच्या संकेतस्थळावर दिलेल्या  इमेलवर (admissions@boustany-foundation.org) जमा करावा. अर्जासहित त्याने त्याचा सीव्ही,एक फोटो, त्याचे एसओपी, त्याच्या जीमॅट व टोफेल/ आयईएलटीएस परीक्षांचे गुणपत्रक, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी पाठवाव्या.

निवड प्रक्रिया

अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी, र्सवकष विकास आणि एकूण गुणवत्ता लक्षात घेऊन त्याची मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. मुलाखतीमधून अंतिम अर्जदारांची निवड करण्यात येईल, निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारकांना त्यांच्या निवडीबाबत त्याच वेळी कळवण्यात येईल. उर्वरित आवश्यक कागदपत्रांची शक्य तितक्या लवकर पूर्तता करून घेतल्यानंतर शिष्यवृत्तीधारकांना शिष्यवृत्तीचे फायदे जून २०१७ पासून मिळण्यास सुरुवात होईल.

उपयुक्त संकेतस्थळ

http://www.boustany-foundation.org/

अंतिम मुदत

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ३१ मे २०१७ आहे.

आवश्यक अर्हता

ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरता अर्जदार किमान पदवीधर असावा व त्याच्या पदवीचा कालावधी चार वर्षांचा असावा. अर्जदाराला हार्वर्डमध्ये एमबीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला स्वतंत्रपणे प्रवेश मिळालेला असावा. अर्जदाराचे चारित्र्य, अनुभव, कल आणि उद्देश हे जागतिक मुद्दय़ांना स्पर्श करणारे असावेत. अर्जदार ज्या क्षेत्रात कार्यरत असेल, त्या क्षेत्रातील व्यापक अनुभव व उत्तम नेतृत्व कौशल्ये त्याच्याकडे असावीत. अर्जदाराची पदवी स्तरावरील शैक्षणिक पाश्र्वभूमी चांगली असावी. तसेच त्याचे इंग्रजीवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्याने जीमॅट या एमबीएसाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवलेले असावेत. त्याबरोबरच अर्जदाराने टोफेल किंवा आयईएलटीएस या इंग्रजीच्या परीक्षेत उत्तम गुणांकन म्हणजे टोफेलमध्ये किमान १०९ गुण तर आयईएलटीएसमध्ये साडेसात बँड्स प्राप्त केलेले असावेत. यापेक्षा कमी गुण असलेल्या अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.