महाराष्ट्र वनसेवा परिक्षेमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी पदावर निवड झालेले भाऊसाहेब रतन जवरे यांच्या मुलाखतीचा अनुभव या लेखामध्ये पाहू. मुलाखत मंडळाच्या अध्यक्ष मुख्य वन संरक्षक अपराजित मॅडम या होत्या.

’    प्रश्न – नाव सोडून ओळख करून द्या.

tiger poaching nagpur news in marathi
Tiger Poaching : वाघाच्या शिकारीतून कोट्यावधींचा आर्थिक व्यवहार, डब्ल्यूसीसीबीचा ‘रेड अलर्ट’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bhandara District, Sarpewada , Tiger, citizens crowd,
VIDEO : नरभक्षक वाघ दिसताच नागरिकांचा गोंधळ, सुरक्षा उपायांची…
Which animals are banned in India
भारतात ‘हे’ २० प्राणी पाळण्यावर बंदी; घरात आढळल्यास होऊ शकते कारवाई
Bahelia hunter, tiger, tiger hunt Maharashtra,
महाराष्ट्रातील वाघ बहेलियांच्या रडारवर! राज्याला “रेड अलर्ट” !
rushikesh wagh junnar taluka
संशोधनातील वाघ
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Tiger dies after being hit by unknown vehicle in vardha
वाघाचा अपघातात मृत्यू, आईपासून दुरावला अन्…

उत्तर – मॅडम मी वांजोळी ता. नेवासा जि. अहमदनगर येथून आलो आहे. मला दहावी मध्ये ७५.६० टक्के व बारावी मध्ये ७४.८३ टक्के आणि पदवीसाठी ७९.७० टक्के आणि पदव्युत्तर पदवीमध्ये ७८.९० टक्के गुण मिळाले आहेत.

’    प्रश्न – अहमदनगरचा बराचसा भाग  Dry १८ आहे. पाणी प्रश्न बिकट असलेल्या दोन तीन तालुक्यांची नावे सांगा.

उत्तर – नगरमधील पाथर्डी, शेवगाव, पारनेर, हे तालुके  Dry १८ भागात मोडतात. परंतु जलसंधारणाच्या कामामुळे परिस्थिती सुधारत आहे.

’    प्रश्न – जलसंधारणाची कामे झालेली काही ठळक उदाहरणे आहेत का?

उत्तर – पारनेर तालुक्यातील हिवरे बाजार व राळेगण सिद्धी या गावांचा जलसंधारणांच्या कामांमुळे विकास झाला आहे.

’    प्रश्न – तुमची P.G. Agronomy मध्ये झाली आहे. Agronomy म्हणजे काय ?

उत्तर – Agronomy is study of principles & Practises & crop management in field. ’    प्रश्न – मराठवाडा कृषी विद्यापीठाचे बदललेले नाव काय आहे आणि त्या व्यक्तीचे काम काय आहे?

उत्तर – मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी असे झाले आहे. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरीतक्रांती यशस्वी केली. तर सुधाकर राव नाईक यांच्या काळात जलसंधारणाची कामे मोठय़ा प्रमाणात झाली.

’    प्रश्न – ऊस कामगारांचे प्रश्न सांगा व साखर शाळांचे संबंध काय?

उत्तर – ऊसतोड कामगारांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हंगामी काम तसेच बालकांचे अपुरे शिक्षण. त्यासाठी सरकारने साखर शाळांच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सोय केली आहे.

’    प्रश्न – तुमच्या भागात आढळणाऱ्या जंगली प्राण्यांची नावे सांगा?

उत्तर – बिबटय़ा, साळींदर, मुंगूस, चितळ,

’    प्रश्न – चितळ कशामुळे आढळते?

उत्तर – माझ्या गावाशेजारून बालाघाट डोंगररांगा गेल्यामुळे उन्हाळ्यात पाणी व चाऱ्यासाठी चितळ शेतामध्ये येतात.

’    प्रश्न – अमरावतीला शिक्षण झालेय तर मेळघाटला गेलाय का? तिथे काय आहे?

उत्तर – हो, मेळघाटला ढाकणा कोलकाज वन्यजीव ठिकाण तसेच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे.

’    प्रश्न – यापूर्वी कोणत्या परीक्षा दिल्या आहेत? आणि कुठवर गेलात?

उत्तर – माझी यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक २०११च्या तुकडीसाठी निवड झाली होती. तसेच राज्यसेवा २०१४च्या मुलाखतीस होतो.

’    प्रश्न – अमिर खानचे देश सोडून जाण्याचे वक्तव्य, एक नावाजलेली व्यक्ती म्हणून बेजबाबदार वाटत नाही का?

उत्तर – प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आमिर खानने सध्याच्या परिस्थितीकडे पाहून वक्तव्य केले असावे.

’    प्रश्न – खरंच देशात असहिष्णुता आहे का?

उत्तर – नाही. सामान्य व्यक्ती आपल्या दररोजच्या कामकाजात व्यस्त आहे. त्यामुळे मला वाटत नाही.

’    प्रश्न – तुम्हाला तुमच्या गावातील रस्त्याच्या कडेला झाडे लावायला सांगितली तर कोणती झाडे लावाल?

उत्तर – Dry भाग असल्यामुळे पिंपळ, वड, जांभूळ, कडुलिंब,

प्रश्न -जांभूळ Roadside Plantation ला लावतात का?

(उमेदवार गोंधळलेला असल्याने उत्तर देऊ शकला नाही.)

’    प्रश्न – Ok मला सांगा, तुमच्या आजूबाजूला चिमणी, कावळा सोडून कोणते पक्षी आढळतात? पाच नावे सांगा.

उत्तर – टिटवी, घार, कोकीळ, कोतवाल, यापुढे आठवत नाही.

’    प्रश्न – टिटवी आणि बगळा यातील फरक काय?

उत्तर – टिटवीची चोच पिवळी असते आणि बगळा भुरकट कलरचा असतो.

’    प्रश्न – N.C.C. आणि N.S.S.यापकी तुम्हाला काय आवडले का?

उत्तर – सर दोन्ही पकी N.C.C.मला जास्त आवडले. कारण यामध्ये प्रत्येक गोष्ट ही Discipline ने होते.

’    प्रश्न – सर्टिफिकेट कोणते मिळाले आहे?

उत्तर – बी आणि सी सर्टिफिकेट

’    प्रश्न – अण्णा हजारेंनी लोकपालसाठी लढावे का, ग्रामविकासाचा ध्यास घ्यावा? तुम्हाला काय वाटते?

उत्तर – सर दोन्ही कामे करावीत. (मध्येच तोडून)

’    प्रश्न – का? त्यांनी एकटय़ांनीच जबाबदारी घेतली आहे का? बाकीच्यांनी बघत बसायचे का?

उत्तर – (संभ्रमाने) नाही सर.

 

मग काय.. ओके. आपण येऊ शकता

धन्यवाद Have a nice day sir

 

Story img Loader