खगोलशास्त्र व अंतराळ संशोधनातील जगातल्या अग्रगण्य संशोधन संस्थेकडून म्हणजेच नासाकडून विद्यार्थ्यांसाठी पाठय़वृत्ती कार्यक्रम आखला आहे. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना NASA Hubble Fellowship Program (NHFP) च्या माध्यमातून पाठय़वृत्ती दिली जाते. त्याअंतर्गत दरवर्षीप्रमाणे पीएच.डी. पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी प्रवेश व त्यासहित पाठय़वृत्तीचे लाभ असे या पाठय़वृत्तीचे स्वरूप आहे. त्यासाठी अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाठय़वृत्तीविषयी –
नासा या अमेरिकन संस्थेला आपण अंतराळ तंत्रज्ञानातील जागतिक स्तरावर बोलबाला झालेली संस्था म्हणून ओळखतो. येथे संशोधन करायला मिळावे, ही अनेकांची इच्छा असते. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांच्या सहकार्याने नासा विविध शैक्षणिक व संशोधन उपक्रम राबवण्यामध्ये नेहमी पुढाकार घेत असते. नासा व अमेरिकी विद्यापीठांकडून संयुक्तपणे दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे लाभ दिले जातात. पदार्थविज्ञान, खगोलशास्त्रज्ञ, अंतराळशास्त्रज्ञ किंवा संबंधित शाखेतील विविध विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी NASA Hubble Fellowship Program (NHFP) या नावाने या संस्थांकडून पाठय़वृत्ती कार्यक्रम राबवला जातो. २०१८ साली सुरू होणाऱ्या या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमासाठी एकूण २४ अर्जदारांची निवड केली जाणार आहे. पाठय़वृत्ती कार्यक्रम व पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम या दोन्हींचा कालावधी तीन वर्षांचा आहे. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधन विषयांतील पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रम अमेरिकेतील ज्या कोणत्या संशोधन संस्थेत किंवा विद्यापीठामध्ये उपलब्ध असेल तिथे तो अर्जदारास पूर्ण करावयाचा आहे. या पाठय़वृत्ती कार्यक्रमासाठी नासाची आर्थिक मदत अर्जदाराला तीन वर्षांसाठी मिळणार आहे. यासंबंधित अधिक माहिती त्याने दुव्यामध्ये दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन मिळवावी.
आवश्यक अर्हता –
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदार्थविज्ञान, खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र किंवा संबंधित शाखेतील विषयांमध्ये पीएच.डी.धारक असावा. त्याने दि. १ जानेवारी २०१५ पूर्वी पीएच.डी. पदवी मिळवलेली असावी. अर्जदाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्तम असावी. अर्जदाराचा किमान एक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम लेखक म्हणून प्रकाशित झालेला असावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदाराने आयईएलटीएस किंवा टोफेल या इंग्रजीच्या परीक्षांपैकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये त्यांना किमान आवश्यक बँडस् किंवा गुण मिळालेले असावेत. अर्जदाराचा सीव्ही अतिशय उत्तम असावा. संशोधनाव्यतिरिक्त त्याच्याकडे कार्यानुभव असेल तर त्याने तो तसा त्याच्या एसओपी व सीव्हीमध्ये नमूद करावा. या पाठय़वृत्तीसाठी त्याने पूर्ण केलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसहित जमा करावा.
अर्ज प्रक्रिया –
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह संस्थेच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. अर्जासह अर्जदाराने त्याचे एसओपी, सीव्ही, आयईएलटीएस किंवा टोफेल यापैकी एका परीक्षेचे गुण, पीएच.डी. पूर्ण केल्याचे विद्यापीठाचे प्रशस्तीपत्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित केलेले शोधनिबंध, सध्या चालू असलेल्या व यापूर्वी केलेल्या संशोधनाचा एक लघुप्रबंध व त्यावरच आधारित त्याच्या प्रस्तावित संशोधनाचा (research proposal) लघुप्रबंध इत्यादी गोष्टी संस्थेला अपेक्षित असलेल्या स्वरूपात पाठवाव्यात. अर्जदाराच्या प्रस्तावित संशोधनाचा लघुप्रबंध नासाच्या सध्या खगोलशास्त्रातील चालू असलेल्या संशोधनाशी साधम्र्य दाखवणारा असावा. अर्जदाराने त्याच्या संशोधनाशी परिचित असलेल्या तीन तज्ज्ञांकडून शिफारसपत्रे घ्यावीत. अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत जरी दि. २ नोव्हेंबर २०१७ असली तरीही तज्ज्ञांसाठी शिफारसपत्रे पाठवण्याची अंतिम मुदत मात्र दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे. तज्ज्ञांनी शिफारसपत्र पाठवताना मात्र पीडीएफ स्वरूपात पाठवावयाची आहेत.
निवड प्रक्रिया –
- अर्जदाराची संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन त्याच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणीमधून गुणवत्तेनुसार अंतिम निवड करण्यात येईल. समितीचा निर्णय अंतिम राहील. अर्जदारांना त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
उपयुक्त संकेतस्थळ –
https://nhfp.stsci.edu/
अंतिम मुदत –
- या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. २ नोव्हेंबर २०१७ आहे. तर अर्जदाराच्या वतीने तज्ज्ञांना शिफारसपत्रे जमा करावयाची अंतिम मुदत दि. ९ नोव्हेंबर २०१७ ही आहे.
itsprathamesh@gmail.com