हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे</strong>
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ही एनसीएल या नावाने सर्वत्र प्रसिद्ध आहे. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या भारतीय संशोधन संस्थांपैकी एनसीएल ही एक संस्था. एनसीएल ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक तथा औद्योगिक अनुसंधान परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेमध्ये केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र या विषयातील मूलभूत व उपयोजित संशोधन (Fundamental and Applied Research) केले जाते.
संशोधन संस्थेविषयी
नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची स्थापना १९५० साली पुणे येथे झाली. एनसीएल संशोधनाबरोबरच ‘संशोधन आणि विकास’ सल्लागार संस्था म्हणूनही काम करते. देशविदेशातील ग्राहकांना ‘मूलभूत संशोधनाशी संबंधित असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा विकास करणे’ आणि ‘त्यांनी निवडलेल्या वैज्ञानिक सेवा विकसित करून त्यांना पुरवणे’ अशा प्रकारच्या संशोधनातून एनसीएल औद्योगिक क्षेत्रातही जोडली गेली आहे. सीएसआयआरची देशातील एक प्रमुख संशोधन संस्था असलेल्या एनसीएलमध्ये सध्या पीएचडी अभ्यासक्रमासाठी संशोधन करणारे सुमारे ४०० विद्यार्थी आहेत. दरवर्षी जवळपास ५० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी एनसीएलकडून बहाल केली जाते. याबरोबरच एनसीएलकडून दरवर्षी साधारणत: साठपेक्षाही अधिक पेटंट्स व चारशेपेक्षाही जास्त शोधनिबंध प्रकाशित केले जातात. याशिवाय, नॅशनल कलेक्शन ऑफ इंडस्ट्रियल मायक्रोऑरगॅनिझम्स (एनसीआयएम) हे विविध प्रकारचे औद्योगिक-जैविक-रासायनिक संवर्धन टिकवून ठेवणारे राष्ट्रीय संकलन भांडार हेदेखील एनसीएलच्या आवारातच स्थित आहे.
संशोधनातील योगदान
एनसीएल ही जरी रसायनशास्त्रामध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच भरीव योगदान दिलेले आहे. एनसीएल भारतातील एक प्रमुख आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र म्हणून नावाजले गेलेले आहे. त्यामुळेच येथे polymer science, organic chemistry, catalysis, materials chemistry, chemical engineering, biochemical sciences इत्यादी रासायनिक विषयांतील संशोधन हे भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व जीवशास्त्राशी संबंधित इतर शास्त्रे आणि अभियांत्रिकी इत्यादी शाखांच्या हातामध्ये हात घालून चाललेले असते. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनसीएल अमेरिका व युरोपमधील अनेक अग्रणी विद्यापीठांशी रसायनशास्त्रातील व इतर आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम-संशोधनासाठी तसेच भारतातील बऱ्याच आयआयटीशी विविध अभ्यासक्रमांसाठी संलग्न आहे. त्यामुळेच दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थी एनसीएलमध्ये त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी किंवा त्यापुढील स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.
विद्यार्थ्यांसाठी संधी
एनसीएल ही रसायनशास्त्रातील सर्वाधिक पीएचडी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी संशोधन संस्था आहे. रसायनशास्त्र व संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधन वाढीस लागावे यासाठी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना नेहमीच उत्साहपूर्ण शैक्षणिक वातावरण दिलेले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना एनसीएलमध्ये थेरॉटिकल अॅण्ड कम्प्युटेशनल केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, मटेरियल्स केमिस्ट्री अॅण्ड फिजिक्स, अॅडव्हान्स्ड फंक्शनल मटेरियल्स, मटेरियल फॉर सोलार एनर्जी, नॅनोमटेरियल्स, पॉलीमेर सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग, ग्रीन केमिस्ट्री, होमोजिनस अॅण्ड हेट्रोजिनस कॅटलिस, बायोकेमिस्ट्री, मोलेक्युलर बायोलॉजी, स्ट्रक्चरल बायोलॉजी, प्रोटिओमिक्स (Proteomics) प्लांट टिश्यू कल्चर, ऑरगॅनिक केमिस्ट्री, केमिकल इंजिनीअरिंग इ. रसायनशास्त्रातील उपविषय आणि इतर संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत.
उत्कृष्ट संशोधनासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे व सर्वोत्तम सुविधा एनसीएलकडून या संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जातात. तसेच संस्थेने जगभरातल्या अतिमहत्त्वाच्या सर्व वैज्ञानिक जर्नल्सची सदस्यता घेतली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक परिषदांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेमध्ये दरवर्षी रसायनशास्त्रातील विविध संशोधन विषयांतील व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित केली जातात. एनसीएलशी संबंधित अनेक नामवंत तज्ज्ञ व नोबेलविजेते आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ या चर्चासत्रांमध्ये सहभागी होत असतात. या व अशा अनेक माध्यमांतून संशोधक विद्यार्थ्यांना अद्ययावत संशोधनाशी जोडण्याची प्रक्रिया एनसीएल गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे करत आलेली आहे आणि यापुढेही हे कार्य चालूच राहील.
संपर्क
- नॅशनल केमिकल लॅबोरेटरी,डॉ. होमी भाभा मार्ग, पुणे- ४११००८. दूरध्वनी: +९१ २० २५९०२०००, २५८९३४००.
- ईमेल : director@ncl.res.in
- संकेतस्थळ :- http://www.ncl-india.org/
itsprathamesh@gmail.com