नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबाद
नुकत्याच तयार झालेल्या तेलंगणा राज्यामधील हैदराबाद येथे स्थित असलेली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट (एनजीआरआय) म्हणजेच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था ही जिओफिजिक्स (भू-भौतिकशास्त्र) या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९६१ साली झालेली आहे. एनजीआरआय ही संस्थादेखील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेशी (सीएसआयआर) संलग्न संस्था आहे. राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था ही भूगोल व भौतिकशास्त्र या दोन्ही विषयांतील संकल्पनांना एकत्रित करून संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेमध्ये सध्या एकूण २०० पेक्षाही जास्त शास्त्रज्ञ आणि इतर तांत्रिक कर्मचारी समर्पित भावनेने आपले संशोधन कार्य पूर्ण करत आहेत. संस्थेतील शास्त्रज्ञांबरोबरच तांत्रिक कर्मचाऱ्यांचेसुद्धा संशोधन उपक्रम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंधात प्रकाशित केले जातात. एनजीआरआय प्रामुख्याने हायड्रोकार्बन आणि कोळशाचा शोध, खनिज शोध, भूजल संसाधनांचा शोध आणि व्यवस्थापन, भूकंपाच्या धोक्याचे मूल्यांकन, पृथ्वीवरील आतील रचना व उत्क्रांती (सैद्धांतिक अभ्यास) आणि भौगोलिक साधनांचा विकास इत्यादी विषयांवर संशोधन करते.
संस्थेविषयी
राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेमध्ये संशोधन व विकासाचे (R&D) ढोबळ मानाने सात प्रमुख संशोधन विभाग आहेत. या सात विभागांतील सर्व संशोधन उपविषयांना सोयीसाठी एकवीस विविध उपक्रमांमध्ये विभागले आहे. यामध्ये मग भूकंपशास्त्र, मॅग्नेटोटेल्लूरिक्स, जीपीएस, पॅलीओ- सेस्मॉलॉजी, स्ट्ररल जिऑलॉजी, कंट्रोल्ड सोर्स सेस्मिक्स, ग्रॅव्हिटी अँड मॅग्नेटिक्स, जिओकेमिस्ट्री, जिओक्रोनोलॉजी, पॅलिओमॅग्नेटिज्म, प्लॅनेटरी जिऑलॉजी, जीओमॅग्नेटिज्म, एअरबोर्न जियोओफिजिक्स, श्ॉलो सबसरफेस जियोओफिजिक्स, हायड्रोकेमिस्ट्री इत्यादी अनेक विषयांचा समावेश आहे. एनजीआरआयमध्ये शास्त्रज्ञ आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांशिवाय सध्या संशोधन करणारे १५० प्रकल्प संशोधक विद्यार्थी आहेत. दरवर्षी जवळपास ५० विद्यार्थ्यांना संस्थेकडून पीएच.डी. पदवी बहाल केली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संगणकीकृत प्रयोगशाळांची उपलब्धता आणि संपूर्ण देशभरात असलेले ऑब्झर्वेशन साइट्सचे जाळे या महत्त्वाच्या बाबींमुळे एनजीआरआय इतर अनेक संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करून सार्वजनिक आणि खासगी उद्योगांना वैज्ञानिक सेवा पुरवते. देशासमोर असलेल्या विविध प्राधान्यक्रमांनुसार नजीकच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याकरिता आणि वैज्ञानिक संशोधनांचे परिणाम घडविण्याकरिता वचनबद्ध असणे हे एनजीआरआयचे तत्त्वज्ञान आहे. ही संस्था ते खऱ्या अर्थाने अमलात आणताना दिसते.
संशोधनातील योगदान
एनजीआरआय ही जरी जिओफिजिक्समध्ये संशोधन करणारी संस्था असली तरी सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) नेहमीच चालना दिलेली आहे. एनजीआरआय भारतातील एक प्रमुख आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र म्हणून नावाजले गेलेले आहे. त्यामुळेच येथे भू-भौतिकशास्त्रातील संशोधन हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जिओसायन्सेस व गणित इत्यादी विषयांवरती अवलंबून असल्याने त्या विषयांबरोबर समन्वय साधून चाललेले असते. या संस्थेमध्ये भारत Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) या २०१०-११ च्या विधेयकानुसार पदव्युत्तर, पीएच.डी. व पोस्टडॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. एनजीआरआय देश-विदेशातील अनेक संशोधन संस्था व विद्यापीठांशी जिओफिजिक्समधील संशोधनासाठी व विविध अभ्यासक्रमांसाठी जोडली गेलेली आहे. विद्यार्थी एनजीआरआयमध्ये त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. किंवा त्यापुढील स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येऊ शकतात. विद्यार्थी त्यासाठी खाली दिलेल्या संस्थेच्या ई-मेलवर संपर्क करू शकतात.
विद्यार्थ्यांसाठी विविध संधी –
जिओफिजिक्स व संबंधित विषयांतील संशोधन वाढीस लागावे यासाठी संस्थेने संशोधक विद्यार्थ्यांना नेहमीच उत्साहपूर्ण शैक्षणिक वातावरण प्रदान केलेले आहे. येथे त्यांना जिओफिजिक्समधील उपविषय आणि इतर संबंधित आंतरविद्याशाखीय विषयांतील संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उत्कृष्ट संशोधनासाठी आवश्यक ती सर्व अत्याधुनिक उपकरणे, जागतिक विद्यापीठांमध्ये संशोधन केलेला अनुभवी संशोधक-प्राध्यापकवर्ग व इतर अनेक सुविधा एनजीआरआयकडून या संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जातात. तसेच संस्थेने जिओफिजिक्समधील अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सची सदस्यता घेतली आहे. विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक परिषदांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. संस्थेमध्ये दरवर्षी जिओफिजिक्समधील विविध संशोधन विषयांतील व्याख्याने व चर्चासत्रे आयोजित केली जातात.
संपर्क
- नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, उप्पला मार्ग, हैदराबाद, तेलंगणा- ५००००७.
- दूरध्वनी : ०४० – २७०१२०००.
- ई-मेल : director@ngri.res.in
- संकेतस्थळ :- http://www.ngri.org.in/
itsprathamesh@gmail.com