सेन्ट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, रूडकी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उत्तराखंड राज्यातील रूडकी येथे स्थित असलेली सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट (सीबीआरआय) म्हणजेच केंद्रीय इमारत संशोधन संस्था ही इमारतशास्त्र या विषयामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. या संशोधन संस्थेची स्थापना १९४७ साली झाली असून, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या सेवेमध्ये असणाऱ्या या संस्थेने इमारतशास्त्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची निर्मिती, त्याचे संगोपन आणि प्रसार करण्याची जबाबदारी आतापर्यंत निष्ठेने पार पाडलेली आहे. सीबीआरआय ही सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न संशोधन संस्था आहे.

संशोधन संस्थेविषयी

केंद्रीय इमारत संशोधन संस्थेची स्थापना झाल्यापासूनच ही संस्था इमारत बांधकाम उद्योग आणि बांधकाम साहित्य उद्योगांना विविध मुद्दय़ांबाबत जसे की, बांधकाम साहित्य, विविध बांधकामांची तपासणी आणि संरचनांचे पुनर्वसन, आपत्ती निवारण, अग्निसुरक्षा, शहरी आणि ग्रामीण भागात ऊर्जेच्या दृष्टिकोनातून कार्यक्षम असलेली घरे बांधण्यासाठी प्रयत्न करताना निर्माण होणाऱ्या अडचणी इत्यादी सर्व मुद्दय़ांबाबत असलेल्या समस्यांवर योग्य उपाययोजना करण्यात मदत करत आहे. सीबीआरआयने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक संस्थांशी सौहार्दाचे संबंध जपलेले आहेत. त्यामुळेच संस्थेमध्ये जागतिक स्तराच्या समकक्ष होत असलेल्या संशोधनाच्या माध्यमातून लोकांना सेवा देण्यासाठी ती वचनबद्ध आहे. अनेक संशोधन संस्था व खासगी कंपन्यांशी संबंध असणारी ही संस्था नेदरलँड्समधील सीआयबी, इटलीमधील TWAS, यूकेतील BRE, अमेरिकेतील ASTM, फ्रान्समधील RILEM, कॅनडामधील BRS, तर ऑस्ट्रेलियातील CSIRO इत्यादी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांशी करारबद्ध आहे, तर राष्ट्रीय स्तरावर BMTPC, HUDCO, DST, नगरविकास मंत्रालय, ग्रामविकास मंत्रालय इत्यादी आस्थापनांशी संलग्न आहे.

संशोधनातील योगदान

सीबीआरआय ही इमारतशास्त्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मात्र सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार संस्थेने सिव्हिल इंजिनीयरिंगशिवाय अभियांत्रिकीच्या इतर शाखांमधील संशोधनाशी जुळवून घेत आंतरविद्याशाखीय संशोधन (Interdisciplinary Research) कसे असावे याचा एक उत्कृष्ट वस्तुपाठ घालून दिलेला आहे. कदाचित म्हणूनच अभियांत्रिकी क्षेत्रातील देशामधील एक महत्त्वाचे आंतरविद्याशाखीय संशोधन केंद्र म्हणून केंद्रीय इमारत संशोधन संस्थेकडे पाहिले जाते. त्यामुळेच येथे Architecture and Planning, Polymer, Plastics & Composites, Structural Engineering, Organic Building Materials, Geotechnical Engineering, Fire Engineering, Environmental Science and Technology, Efficiency of Buildings इत्यादी विविध अभियांत्रिकी शाखांमधील संशोधन समन्वयाने चाललेले असते. या विभागांच्या साहाय्याने संस्थेने देशविदेशातील अनेक बाह्य़ प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे ते पूर्ण केलेले आहेत. संस्थेच्या संकेतस्थळावर याची माहिती सहजपणे मिळून जाते. भारतातील अनेक प्रकल्पांना जसे की, प्रदूषणामुळे ताजमहालाच्या संगमरवरी वास्तूचे होणारे हनन व त्यावर करता येणारे उपाय, वाराणसी येथील काशी विश्वनाथाचे मंदिर व त्याची रचनात्मक तपासणी, तसेच अनेक शासकीय वास्तूंमध्ये करता येणारे बदल इत्यादी अनेक प्रकल्पांवर संस्थेचे गेली कित्येक वर्षे काम सुरू आहे.

विद्यार्थ्यांसाठी संशोधनातील विविध संधी

राष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत पायाभूत घटकांपैकी एक म्हणजे गृहनिर्माण क्षेत्र. या क्षेत्राचे महत्त्व ओळखून सीबीआरआयने विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रातील पदव्युत्तर स्तरावरील एक एकात्मिक कार्यक्रम (Integrated Programme) सुरू केला. हा एकात्मिक अभ्यासक्रम म्हणजेच Building Engineering and Disaster Mitigation (BEDM) या विषयामधील एमटेक (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) आणि engineering and sciences या विषयातील  पीएचडी. या एकात्मिक अभ्यासक्रमाचा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणारा उमेदवार एमटेक व पीएचडी या दोन्ही पदव्या प्राप्त करेल आणि दोन वर्षे यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर या कार्यक्रमातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना बीईडीएममधील एमटेक पदवी मिळेल अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आलेली आहे.

सीएसआयआरच्या मार्गदर्शनानुसार या संशोधन संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पूर्ण करता येतात. दरवर्षी अनेक अभियांत्रिकी व इतर शाखांमधील शेकडो विद्यार्थी आयआयसीबीमध्ये त्यांचे पदवी, पदव्युत्तर, पीएचडी किंवा तत्सम स्तरावरील संशोधन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इथे येत असतात.

संपर्क

सेन्ट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट, सीबीआरआय कॉलनी, रूडकी,

उत्तराखंड- २४७६६७.

दूरध्वनी: +९१ १३३२ २७२२ ४३

ईमेल – director@cbri.res.in , director@cbrimail.com

संकेतस्थळ – http://cbri.res.in/

itsprathamesh@gmail.com