केंद्र किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी लागणारा कालावधी  हा सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असा वर्षभराचा असतो. त्यातही राज्य लोकसेवा आयोगाचा कार्यक्रम थोडा धीमा असतो. एखादी परीक्षाप्रक्रिया वर्षभराहूनही अधिक काळ सुरू राहण्याची शक्यता असते. स्पर्धापरीक्षेच्या एका प्रयत्नासाठी किमान वर्षभरापासून अभ्यास सुरू करणे अपेक्षित असते. म्हणजेच परीक्षेच्या एका प्रयत्नासाठी दोन वर्षांचा कालावधी लागतो आणि बहुतांश उमेदवारांना यशस्वी होण्यासाठी दोन-तीन प्रयत्न लागतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा तयारीच्या प्रक्रियेत संयम आणि सातत्य या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीच्या वेळेस पॅनेलच्या सदस्यांचा सर्वच उमेदवारांसाठीचा दृष्टिकोन तटस्थ असतो. कोणत्याही उमेदवाराबाबत त्यांनी कसलाही पूर्वग्रह बाळगलेला नसतो. मुलाखतीदरम्यान उमेदवार दबावमुक्त आणि तणावरहित होऊन तो सहजपणे मुलाखतीला सामोरा जाईल, याची ते काळजी घेतात. उमेदवाराला प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेसा वेळ देतात. स्पर्धा परीक्षेची मुलाखत नेहमीच प्रसन्न वातावरणात पार पडते आणि म्हणूनच उमेदवारांनीही मुलाखतीला तितक्याच सहजपणे आणि उत्साहाने सामोरे जायला हवे.
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रभावी व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे ठरते. व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाहय़ सौंदर्य असा याचा मर्यादित अर्थ नाही, तर व्यक्तीच्या अंगभूत गुणांनाही व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे स्थान असते. व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी बुद्धिमत्तेसोबतच निर्णयक्षमता, संवादकौशल्य, दुर्दम्य आत्मविश्वास, बुद्धिमत्तेचा आणि कल्पनेचा सर्जनात्मक वापर, धर्य, नेतृत्वगुण, सकारात्मक वृत्ती, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ इच्छाशक्ती, लवचीकता, पारदर्शकपणा, स्पष्टपणा, ताíकक विचार, शिष्टाचार या सर्व पलूंचा विकास होण्याची गरज आहे. उमेदवारांनी लक्षात ठेवायला हवे की, प्रभावी व्यक्तिमत्त्वाची निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे.
आत्मविश्वास
मुलाखतीच्या दरम्यान उमेदवाराचा आत्मविश्वास जोखला जातो. तो त्याच्या वागण्याबोलण्यात, विचारांमधून दिसायला हवा. असा आत्मविश्वास उमेदवाराला यश मिळविण्यासाठी अंतर्गत प्रेरणा आणि सामथ्र्य देतो. परिश्रमाची पराकाष्ठा केल्याशिवाय आत्मविश्वास जागा होत नाही, हे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी कायम लक्षात ठेवायला हवे. जर आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून कठोर परिश्रम केले तर उत्तर देताना उमेदवारांचा आत्मविश्वास आपोआप उंचावतो. आत्मिक शक्तीचा विकास होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर बनते. प्रगतिपथावर अग्रेसर राहण्यासाठी आत्मविश्वासाच्या भक्कम पायावर व्यक्तिमत्त्वाची इमारत उभी करायला हवी.
प्रयत्नांतील सातत्य
मुलाखतीची तयारी करण्याच्या दृष्टीने  सातत्यपूर्ण प्रयत्नांना अतिशय महत्त्व आहे. स्पर्धा परीक्षेसारख्या दीर्घकालीन प्रक्रियेत सातत्य राखणे हीच मुळात संयमाची परीक्षा असते. एखाद्या उमेदवाराची बुद्धिमत्ता कुशाग्र असली तरीही, जर त्याच्या प्रयत्नांत सातत्य नसेल तर स्पध्रेत तो मागे राहू शकतो. या प्रयत्नांमध्ये उतावळेपणाला अजिबातच जागा असता कामा नये.
शिष्टाचार
ज्ञानाची संपन्नता शिष्ट आणि सौम्य वर्तणुकीच्या कोंदणात अधिक प्रभावी होते. उमेदवाराकडे प्रगल्भ ज्ञान असूनही जर त्याच्या वागण्याबोलण्यात उद्दामपणा, विचारातील हटवादीपणा, जहालपणा, आक्रमक देहबोली या बाबी नजरेस आल्या तर त्या त्याच्या यशाच्या मार्गातील
अडसर ठरू शकतात. उमेदवाराच्या वागण्याबोलण्यातून मुलाखत मंडळातील सदस्यांचे, उमेदवाराबाबत एक नसíगक मत तयार होते. त्याबाबत उमेदवारांनी सतर्क असायला हवे.
सकारात्मक विचार
व्यक्तिमत्त्वाचे उत्तम पोषण होण्याकरता समतोल आणि सकारात्मक विचारांचे योगदान मोलाचे असते. मनात सकारात्मक विचार असतील तर आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ राहतो. आकर्षक, पारदर्शी, प्रभावशाली आणि समृद्ध व्यक्तिमत्त्वासाठी हे आवश्यक आहे.
दृढ संकल्पशक्ती
दृढ संकल्पामुळेच अवघड ध्येय साध्य होते. ‘मुश्कील नही कुछ अगर ठान लिजीए’ हे तत्त्व लक्षात घेऊन ध्येयपथावर पुढे गेले पाहिजे. संकल्पामध्ये सामथ्र्य असते. यासाठी आपले ध्येय ठरवून मार्गक्रमण केले पाहिजे. दृढ संकल्पासाठी स्थिर मनाची आवश्यकता असते. मन स्थिर असेल तर ते विचलित होणार नाही व तुम्ही ध्येयपथावर पुढे जात राहाल. मनाचे स्थर्य संकल्पशक्ती वाढवू शकते. स्पर्धा परीक्षेतील मुलाखतीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम या विषयीची एक योजना तयार करायला हवी. दृढ इच्छाशक्ती आणि मन स्थिर असले तर सफलता सहज मिळू शकते.
संकल्पशक्ती बळकट करण्यासाठी सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत. त्याकरता नकारात्मक भावनांना बाजूला ठेवा. आपल्या प्रयत्नांचे सातत्याने निरीक्षण करा. आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करा. आवश्यकतेप्रमाणे त्यांचा विकास करा. स्वत:ला तपासून घ्या. भाग्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या मेहनतीवर विश्वास ठेवा. प्रसिद्ध शायर नूर लखनवी यांचा शेर आहे..
‘मेरे हाथों की लकीरों के
इजाफे हैं गवाह,
मंने पत्थर की तरह खुद को
तराशा है बहोत’

government to stop tendering process in midday meals
शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
mpsc mains exams agricultural sector
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; शेतीपूरक क्षेत्रे आणि अन्नसुरक्षा
cm Devendra fadnavis mpsc
देवेंद्र फडणवीसांचा ‘एमपीएससी’ अध्यक्षांना फोन, संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीबाबत…
central government started internship program on pilot basis
पाच वर्षांत १ कोटी ‘इंटर्नशिप’ प्रदान करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट
2019 scholarship scheme helps meritorious students from marginalized groups study abroad
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बैठक घेताच ओबीसी समाजातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Loksatta explained Why did the controversy rise over the same policy of Barty Sarathi Mahajyoti
विश्लेषण: बार्टी, सारथी, महाज्योतीच्या समान धोरणावरून वाद का चिघळला?