कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी) या संस्थेकडून ब्रिटनमध्ये प्रत्येक विद्याशाखेतील विविध विषयांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम व पीएचडीचे उच्चशिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांने सीएससीशी संलग्न विद्यापीठांत स्वतंत्रपणे प्रवेश घ्यायचा असून त्यासाठी त्याला प्रवेश शुल्क व इतर सर्व सोयीसुविधा सीएससीकडून दिल्या जातील, असे या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे ढोबळमानाने स्वरूप आहे. कोणत्याही विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१५ नोव्हेंबर २०१६ पूर्वी अर्ज मागवले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिष्यवृत्तीबद्दल:

कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशन (सीएससी)कडून राबवला जाणारा कॉमनवेल्थ स्कॉलरशिप अँड फेलोशिप प्लॅन (सीएसएफपी) हा जगातल्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. १९५९ साली सीएसएफपी कार्यक्रम चालू झाल्यापासून जवळपास पस्तीस हजार अर्जदारांना ही शिष्यवृत्ती बहाल करण्यात आलेली आहे. विविध विषयांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करण्याच्या हेतूने हा शिष्यवृत्ती कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. याअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम व पीएचडीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएचडी व पदव्युत्तर अभ्यासक्रम दोन्हींसाठी शिष्यवृत्तीचा कालावधी वेगवेगळा आहे. हा कालावधी शिष्यवृत्तीधारकाला मिळालेल्या विद्यापीठावर अवलंबून असेल. दरम्यान, संस्थेकडून अभ्यासक्रमाच्या या कालावधीकरता विद्यार्थ्यांला त्याच्या खर्चासाठी एक हजार ते बाराशे पौंड मासिक वेतन देण्यात येईल. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क सीएफसीकडून त्याच्या विद्यापीठाला येईल. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला येण्या-जाण्याचा विमानप्रवास भत्ता, प्रकल्प निधी, संशोधनासाठी आवश्यक असलेल्या प्रवासासाठी भत्ता, विवाहित शिष्यवृत्तीधारकांसाठी जोडीदाराच्या तसेच मुलाच्या खर्चासाठी प्रतिमाह सहाय्य निधी (Spouse allowance & Child allowance), आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व अपघातापासून सुरक्षिततेसाठी विमा यांसारख्या इतर सर्व सोयी-सुविधाही दिल्या जातील.

आवश्यक अर्हता :

ही शिष्यवृत्ती विकसनशील राष्ट्रकुल देशांतील आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार संबंधित विषय शाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा. अर्जदाराची पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. त्याचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदारांनी आयईएलटीएस या इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. अर्जदाराकडे पदवीस्तरावर प्रयोगशाळेतील किंवा एखाद्या संस्थेतील संशोधनाच्या अनुभवाचे प्रशस्तिपत्र असावे.

अर्ज प्रक्रिया:

या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज सीएससीच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून सीएससीच्या संकेतस्थळावर जमा करावा. अर्ज   केल्यानंतर अर्जदाराने त्याच्या वैयक्तिक व शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एसओपी, त्याचा सीव्ही, त्याने पदवी / पदव्युत्तर अभ्याक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधाच्या स्वरुपात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सस्क्रिप्टच्या अधिकृत प्रती, त्याचे आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तिपत्र, पारपत्राची व राष्ट्रीय ओळखपत्राची साक्षांकित प्रत इत्यादी सर्व गोष्टी सीएससीला दि.६ जानेवारी २०१७ पर्यंत जमा कराव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. सीएससीकडून अर्जदाराला पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीसाठी फक्त शिष्यवृत्ती बहाल करण्यात येते. मात्र, त्याला त्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीएससीबरोबर संलग्नता असलेल्या विद्यापीठाकडे स्वतंत्रपणे अर्ज करावा लागेल. विद्यापीठदेखील अर्जदारासाठी सीएससीकडे शिष्यवृत्तीसाठी शिफारस करू शकते. सीएससीच्या संकेतस्थळावर ब्रिटनमधील अशा संलग्न विद्यापीठांची यादी दिलेली आहे. कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी पदवीसाठी अर्ज करता येऊ  शकतो. तरीही, आर्थिक किंवा सामाजिक विकासाशी निगडित निवडलेला एखादा विषय अभ्यासणाऱ्या अर्जदारास प्राधान्यक्रम देण्यात येईल.

निवड प्रक्रिया:

अर्जदाराची संबंधित विषयातील शैक्षणिक गुणवत्ता व संशोधनातील आवड लक्षात घेऊन त्याची अंतिम निवड केली जाईल. फक्त निवड झालेल्या अर्जदारांना अंतिम निकाल कळवला जाईल.

अंतिम मुदत:-

या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.१५ नोव्हेंबर २०१६  आहे.

महत्त्वाचा  दुवा :

http://cscuk.dfid.gov.uk/
itsprathamesh@gmail.com