कर्मचारी निवड आयोगातर्फे दिल्ली पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल येथे उपनिरीक्षक भरती करण्यात येत आहे.
उपलब्ध जागा
एकूण उपलब्ध जागांची संख्या १,७०६ असून त्यामध्ये केंद्रीय राखीव दलाच्या २२१, सीमा सुरक्षा दलाच्या ६०७, इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलाच्या २८९, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५३६ व सीमा सुरक्षा दलाच्या ५३ अशा जागांचा समावेश आहे. या उपलब्ध जागांपैकी काही जागा महिला उमेदवारांसाठी आणि काही राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर २१ जून २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळवणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखत व वैद्यकीय तपासणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पोलीस संघटनेत दरमहा ५,२००-२०,२००+२,८०० अथवा ९,३००-३४,८००+४,२०० या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.
या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क
अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून निर्धारित टपालघरात उपलब्ध असणारी ५० रु.ची रिक्रुटमेंट टपाल तिकिटे लावणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने या संकेतस्थळांवर २८ एप्रिल २०१५ पर्यंत अर्ज करावा.       
अर्जाचा तपशील
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ मार्च ते ३ एप्रिल २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी. अथवा आयोगाच्या http://ssconline.nic.in अथवा http://ssconline2.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

Story img Loader