भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे. या लेखामध्ये सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक व आर्थिक घटकामध्ये समाविष्ट कृषीविषयक आयामांचा अभ्यास करण्याची रणनीती पाहू.
पर्यावरणीय घटक
* अभ्यासक्रमातील भौगोलिक संकल्पना एकत्रितपणे अभ्यासल्यानंतर पर्यावरणीय भूगोलातील वैज्ञानिक संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास, जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, जैवविविधतेचा व वनांचा ऱ्हास, कार्बन क्रेडिट या संकल्पना अत्यंत बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. यातून पूर्वपरीक्षेचा सामान्य अध्ययन पेपर १ मधील पर्यावरण घटकाचा मूलभूत अभ्यास पूर्ण होणार आहे. मूलद्रव्यांचे चक्र, अन्नसाखळी व अन्नजाळे या बाबी फक्त समजून घेतल्या तरी चालेल. हा सगळा संकल्पनात्मक अभ्यास ठउएफळ च्या पुस्तकातून करणे आवश्यक आहे.
* पश्चिम घाटाची रचना, भौगोलिक वैशिष्टय़े, जैवविविधता, संवर्धनाबाबत समस्या, कारणे, उपाय, संबंधित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी असा परिपूर्ण अभ्यास महत्त्वाचा आहे.
* पर्यावरणविषयक कायदे हा पेपर २ चाही घटक आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या अभ्यासावेळी पेपर २ च्या विधीविषयक घटकातूनच याची तयारी करावी.
मानवी व सामाजिक भूगोल
* मानवी व सामाजिक भूगोलामध्ये वसाहती व स्थलांतर हे मुख्य मुद्दे अभ्यासायचे आहेत. वसाहतींचे प्रकार, आकार, स्वरूप, ठिकाण व आर्थिक महत्त्व पाहायला हवे. नोट्समध्ये स्थानविशिष्ट वसाहती एकत्र, आकाराप्रमाणे डिफाइन केलेल्या एकत्र व आर्थिक दृष्टय़ा डिफाइन केलेल्या एकत्र अभ्यासल्यास बहुविधानी प्रश्नांची उत्तरे शोधण्यास मदत होईल.
* स्थलांतराची कारणे, स्वरूप, समस्या, परिणाम व उपाय इत्यादींच्या दृष्टीने अभ्यास आवश्यक आहे. या बाबतीत आकडेवारी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भातील स्थलांतराची आकडेवारी (म्हणजे टक्केवारी) आर्थिक पाहणी अहवालामधून अद्ययावत करून घ्यायला हवी. यामध्ये स्थलांतरातील सामाजिक घटकांचे उतरत्या क्रमाने प्रमाण, कारणांची उतरत्या क्रमाने टक्केवारी, कोणत्या ठिकाणाहून स्थलांतर होत आहे. त्यांच्या टक्केवारीचा उतरता क्रम ही आकडेवारी महत्त्वाची आहे.
महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल
* महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल हा पूर्णत: तथ्यात्मक घटक आहे. यामध्ये खनिजे व ऊर्जा स्रोत, महत्त्वाचे पायाभूत उद्योग, महत्त्वाची धरणे/प्रकल्प व महत्त्वाची पर्यटन स्थळे यांचा टेबल फॉरमॉटमध्ये अभ्यास करायचा आहे. टेबलमध्ये सामाविष्ट करायचे मुद्दे पुढीलप्रमाणे स्थान, वैशिष्टे, आर्थिक महत्त्व, असल्यास वर्गीकरण, असल्यास पर्यावरणीय मुद्दे, संबंधित समस्या, कारण, उपाय, असल्यास संबंधित चालू घडामोडी.
* धार्मिक, वैद्यकीय, सांस्कृतिक पर्यटन, राखीव उद्याने इत्यादी संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने, वने माहीत असायला हवीत. भारतातील प्रसिद्ध वने, उद्याने व सद्य:स्थितीत चच्रेत असलेली स्थळे याची माहिती करून घ्यावी. संदर्भ साहित्यातील संबंधित सगळा टेबल पाठ करणे आवश्यक नाही. किल्लेही काही ऐतिहासिक महत्त्वाचे तेवढेच लक्षात घ्यावेत.
एमपीएससी मंत्र : भूगोल : सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय घटक
भूगोलाचा पायाभूत अभ्यास कशा प्रकारे करायचा त्याची चर्चा यापूर्वी करण्यात आली आहे.
Written by रोहिणी शहा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-06-2016 at 00:42 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparation for mpsc