राज्य सेवा मुख्य परीक्षा पेपर ३ च्या अभ्यासक्रमाची अभ्यासाच्या सोयीसाठी विभागणी कशा प्रकारे करता येईल याबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
भारतातील मानव संसाधन विकास अभ्यास :
तथ्यात्मक : भारतातील लोकसंख्येची सद्य:स्थिती – संख्यात्मक स्वरूप (आकारमान आणि वाढ – लिंग, वय, नागरी आणि ग्रामीण) आणि गुणात्मक स्वरूप (शिक्षण व आरोग्यविषयक), बेरोजगारीचे स्वरूप आणि प्रकार, सेवायोजनाचा कल, विभिन्न विभागांतील व क्षेत्रातील कुशल कामगारांचे मागणी दर.
लोकसंख्याविषयक धोरण आणि २०५० पर्यंतच्या योजना, शासनाचे नोकरीविषयक धोरण, बेरोजगारी आणि न्यून बेरोजगारी कमी करण्यासाठी योजना.
संकल्पनात्मक : आधुनिक समाजातील मानव संसाधन नियोजनाचे महत्त्व आणि गरज, मानव संसाधन नियोजनामध्ये अंतर्भूत घटक आणि कारणीभूत गोष्टी, मानव संसाधन विकासाशी संबंधित समस्या आणि बाबी, भारतातील बेरोजगारीची समस्या.
पारंपरिक : मनुष्यबळ विकासाकरिता कार्यरत असलेल्या शासकीय आणि स्वयंसेवी संघटना उदा : एनसीईआरटी, एनआयईपीए, विद्यापीठ अनुदान आयोग, मुक्त विद्यापीठे, एआयसीटीई, एनसीटीई, आयटीआय, एनसीव्हीटी, आयएमसी इत्यादी.
शिक्षण :
संकल्पनात्मक अभ्यास : मानव संसाधन विकासाचे आणि सामाजिक बदलाचे साधन म्हणून शिक्षणाचा विचार, भारतातील शिक्षण प्रणाली (पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण), मुलींकरिता शिक्षण, सामाजिकदृष्टय़ा व आर्थिकदृष्टय़ा गरीब वर्ग, अधू, अल्पसंख्य, कौशल्य शोध इत्यादी, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, शिक्षणाचे व्यवसायिकीकरण, दर्जावाढ, गळतीचे प्रमाण इत्यादी समस्या आणि प्रश्न, ई-अध्ययन, जागतिकीकरण आणि खासगीकरण याचा भारतीय शिक्षणावरील परिणाम.
पारंपरिक अभ्यास : राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण व संशोधन आयोग, आयआयटी, आयआयएम, एनआयटी. अनौपचारिक, औपचारिक आणि प्रौढ शिक्षणाचा प्रसार विनियमन आणि संनियंत्रण करणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्था, शासनाची शैक्षणिक धोरणे, योजना व कार्यक्रम.
व्यावसायिक शिक्षण :
संकल्पनात्मक अभ्यास : मानव संसाधन विकासाचे साधन म्हणून व्यावसायिक शिक्षणाचा विचार, समस्या, प्रश्न व त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न.
तथ्यात्मक अभ्यास : व्यावसायिक / तंत्र शिक्षण – भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सद्य:स्थिती.
पारंपरिक अभ्यास : शिक्षणप्रणाली व प्रशिक्षण, व्यावसायिक आणि तंत्र शिक्षणाचा प्रसार, विनियमन करणाऱ्या आणि अधिस्वीकृती देणाऱ्या संस्था. शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम.
आरोग्य :
संकल्पनात्मक अभ्यास : मानव संसाधन विकासाचा अत्यावश्यक आणि प्रमुख घटक म्हणून आरोग्याचा विचार, जीवनविषयक आकडेवारी, भारतामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या आणि त्यावर मात करण्यासाठीचे प्रयत्न.
पारंपरिक अभ्यास : भारतामध्ये आरोग्यविषयक काळजी घेणारी यंत्रणा, शासनाची आरोग्यविषयक धोरणे, योजना आणि कार्यक्रम, जननी-बाल सुरक्षा योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान. जागतिक आरोग्य संघटना-उद्देश, रचना, काय्रे व कार्यक्रम.
ग्रामीण विकास :
संकल्पनात्मक अभ्यास : ग्रामपंचायत आणि ग्रामविकासातील पंचायत राज व्यवस्थेची भूमिका, पंचायत राज व्यवस्थेला अधिकार प्रदान करणे.
तथ्यात्मक अभ्यास : ग्रामीण क्षेत्रातील पायाभूत विकास उदा. ऊर्जा, परिवहन, गृहनिर्माण व दळणवळण.
पारंपरिक अभ्यास : जमीन सुधारणा व विकास, ग्रामविकासातील सहकारी संस्थांची भूमिका, ग्रामविकासामध्ये अंतर्भूत असणाऱ्या वित्तीय संस्था, ग्रामीण रोजगार योजना, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
मानवी हक्क :
पारंपरिक अभ्यास : आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना : संयुक्त राष्ट्रे आणि तिची विशेषीकृत अभिकरणे – यूएनसीटीएडी, यूएनडीपी, आयसीजे, आयएलओ, युनिसेफ, युनेस्को, यूएनसीएचआर, ईयू, ऑपेक, एशियन, ओपेक, ओएयू, सार्क, नाम, राष्ट्रकुल राष्ट्रे (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) आणि युरोपियन युनियन. जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र (यूडीएचआर १९४८), मानवी हक्काची आंतरराष्ट्रीय मानके, त्याचे भारताच्या संविधानातील प्रतिबिंब, भारतातील मानवी हक्क चळवळ, भारतात मानवी हक्क राबविण्याची आणि त्याचे संरक्षण करण्याची यंत्रणा.
तथ्यात्मक अभ्यास : मानवी विकास निर्देशांक, बालमृत्यू प्रमाण, लिंग गुणोत्तर.
संकल्पनात्मक अभ्यास : लोकशाही चौकटीत मानवी हक्क आणि मानवी सभ्यतेचे पालन करण्यासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, मूल्ये व नीतितत्त्वे : कुटुंब, धर्म, शिक्षण, प्रसारमाध्यमे इत्यादींसारख्या औपचारिक व अनौपचारिक संस्थांमार्फत सामाजिक मानके, मूल्ये, नीतितत्त्वे यांची जोपासना करणे.
विश्लेषणात्मक अभ्यास :
मानवी हक्कापासून वंचित असलेल्यांच्या समस्या जसे गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी, सामाजिक-सांस्कृतिक-धार्मिक प्रथा, हिंसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, कामगारांचे शोषण, हवालतीतील गुन्हेगारी इत्यादी. जागतिकीकरण आणि त्याचा विभिन्न क्षेत्रांवरील परिणाम.
बाल विकास : समस्या – अर्भक मृत्यूसंख्या, कुपोषण, बालकामगार, मुलांचे शिक्षण इत्यादी.
महिला विकास : समस्य – स्त्री-पुरुष असमानता, महिलांविरोधी हिंसाचार, स्त्री अर्भक हत्या / स्त्रीभ्रूण हत्या, महिलांचे सबलीकरण इत्यादी – सबलीकरणासाठीच्या योजना व कार्यक्रम, आशा.
युवकांचा विकास : समस्या – बेरोजगारी, असंतोष, अमली पदार्थाचे व्यसन इत्यादी.
आदिवासी विकास : समस्या – कुपोषण, अलिप्तता, एकात्मीकरण व विकास इत्यादी. आदिवासी चळवळ
अ.जा., अ.ज., वि.जा./भ.ज., इतर मागासवर्ग इत्यादी सामाजिकदृष्टय़ा वंचित वर्गाचा विकास : समस्या, संधीतील असमानता इत्यादी.
वयोवृद्ध लोकांचे कल्याण : समस्या – वयोवृद्धांच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, विकासविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या सेवांचे उपयोजन.
कामगार कल्याण : समस्या – कामाची स्थिती, मजुरी, आरोग्य आणि संघटित व असंघटित क्षेत्रांशी संबंधित समस्या, साधनसंपत्ती संघटित करून कामी लावणे.
विकलांग व्यक्तींचे कल्याण : समस्या – शैक्षणिक व रोजगार संधी यामधील असमानता इत्यादी.
लोकांचे पुनर्वसन (विकास प्रकल्प व नसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक) : कार्यतंत्र धोरण व कार्यक्रम – कायदेविषयक तरतुदी – आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय इत्यादी निरनिराळ्या पलूंचा विचार, रोजगार व पुनवर्सन यामधील आंतरराष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटनांची भूमिका.
ग्राहक संरक्षण : विद्यमान अधिनियमाची ठळक वैशिष्टय़े – ग्राहकांचे हक्क – ग्राहक विवाद व निवारण यंत्रणा, मंचाचे निरनिराळे प्रकार – उद्दिष्टे, अधिकार, काय्रे, कार्यपद्धती, ग्राहक कल्याण निधी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा